पोलिसांच्या कारवाईला घाबरत नाही : राज ठाकरे

raj thakre00मुंबई (mumbai) – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली होती, याविषयी राज ठाकरे आपली भूमिका दोन तारखेच्या सभेत स्पष्ट करणार असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
अजित पवार यांच्यावरील टीका राष्ट्रवादीला चांगलीच जिव्हारी लागली आहे. मंगळवारी रात्री त्यावरून राज यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी लक्ष केले. राज यांच्या ताफ्यावर नगर शहरात दगडफेक करण्यात आली. त्यानंतर मनसेचे कार्यकर्ते प्रचंड खवळले असून राज्यात ठिकठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यालयांवर हल्ले सुरू आहेत. राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही माघार घ्यायला तयार नाहीत. त्यामुळे राज्यात वातावरण चांगलेच तापले आहे. त्यात आता राज यांनी थेट पोलिसांवरच आरोप करून आपला संताप व्यक्त केला आहे.
‘ नगरमध्ये ज्यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली तेव्हा मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त होता. मात्र पोलिसांनी बघ्याची भुमिका घेत काहीही कारवाई केली नाही, ‘ असा थेट आरोप करतानाच ‘ आम्ही पोलिसांना घबरत नाही ‘ , असा इशाराच राज यांनी दिला. मला आता यावर जास्त बोलायचे नाही. माझे उत्तर मी 2 तारखेच्या सभेतच देईन, असेही ते म्हणाले.
महाराष्ट्रातील तणावासंदर्भात आपण काहीही करू शकत नाही.
माझ्या कार्यकर्त्यांनी काय केलं ते मला माहित आहे. आम्ही पोलिसांच्या कारवाईला घाबरत नसल्याचंही राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.
माझ्या ताफ्यावर दगडफेक झाली तेव्हा पोलिस उपस्थित होते. पण ते काहीही करू शकले नाहीत, जर पोलिस तिथे उपस्थित राहिले नसते, तर आणखी काही बरं वाईट झालं असतं, असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <strike> <strong>