आता एसएमएसवरुन रेल्वे तिकीट!

SMS copyमुंबई (mumbai) –  ई-तिकिटिंगपाठोपाठ एसएमएसवरून तिकीट मिळण्याची नवीन सुविधा “इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन’ तर्फे (आयआयसीटीसी) देण्यात येणार आहे. मेल/एक्सप्रेसची तिकिटे मोबाइलवरून एसएमएस आणि यूएसएसडीवरून (अनस्ट्रक्चर्ड सप्लिमेंटरी डाटा) मिळण्याची ही यंत्रणा जुलैपासून लागू होणार आहे. मोबाइल बॅंकिंगच्या सहाय्याने प्रवाशांना तिकीट मिळण्याचा मार्ग उपलब्ध झाला आहे.
विशेष म्हणजे, या तिकिटासाठी मेबाइलवर इंटरनेट सुविधेची आवश्यकता नाही. एसएमएसवरून तिकीट बुक करण्यासाठी आधी आयआरसीटीसी आणि बॅंकेत आपला मोबाइल नंबर नोंदवणे आवश्यक आहे. त्यानंतर बॅंकेकडून “मोबाइल मनी आयडेंटिफायर’ आणि “ओटीपी’ (वन टाइम पासवर्ड) मिळाल्यानंतर एका एसएमएसद्वारे मेल/एक्स्प्रेस क्रमांक, प्रवासाचे ठिकाण, प्रवासाची वेळ, दर्जा, प्रवाशांचे नाव नोंदवायचा असून त्यानंतर “आयआरसीटीसी’ कडून ट्रान्सॅक्शन आयडी मिळेल. बॅंकेकडून रक्कम वळती केल्यावर तिकीट मिळेल.
ही सेवा सर्वच मोबाइल सेवापुरवठादारांकडून दिली जाणार असून दोन एसएमएससाठी तीन रु. आणि बॅंकेकडून हजारांपर्यंतच्या रकमेसाठी पाच रुपयांचे शुल्क आकारले जाईल. त्यात, यूएसएसडी पद्धतीत विशिष्ट क्रमांकावरून तिकीट बुकिंगचा पर्याय असेल. त्यात स्टेशन, ट्रेन क्रमांक, प्रवासाची वेळ, वर्ग आदींची माहिती भरावी लागेल. मोबाइल बॅंकिंगवरून रक्कम अदा करण्यासाठी एमपिनची नोंद करून तिकीट काढता येईल. प्रवासादरम्यान तिकीट नोंदणीचा एमएमएस योग्य ओळखपत्रासह ग्राह्य मानला जाईल. यासाठी एजंट वा अन्य कोणतेही दर आकारले जाणार नसल्याचे “आयआरसीटीसी’ ने स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <strike> <strong>