Last Update: 


 
पहिलं पान  >>  पश्चिम महाराष्ट्र
सोलापूर (solapur) - हैदराबाद रस्त्यावर नळदुर्गजवळ रविवारी दुपारी ट्रक झाडावर आदळून झालेल्या अपघातात नऊ जण ठार आणि 15 जण जखमी झाले. सोलापूर- नळदुर्गजवळ सोलापूर-हैदराबाद रस्त्यावर रविवारी दुपारी दीडच्या सुमारास ट्रक झाडावर आदळून झालेल्या अपघातात 9 जण ठार आणि 15 जण जखमी झाले. सोलापूरहून कर्नाटककडे एमएच 12 एफ 8839 क्रमांकाचा ट्रक भरधाव जात असताना नळदुर्गपासून तीन किमी अंतरावर ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक झाडावर आदळला.

Monday, February 06, 2012 AT 05:00 AM (IST)

 
पंढरपूर (pandharpur) - माझा व आपला श्वास राहील तोवर गुरूपरंपरेची सेवा परंपरेचे चक्रीभजन व सद्‌गुरू दास वीरनाथ महाराजांनी आपणा सर्वांना दिलेली माघ वारीची साधना निरंतर घडावी हेच मागणं मी विठ्ठल रूक्मीणी मातेच्या चरणी करतो अशी भावना नाथ संस्थानाचे पिठाधिपती सद्‌गुरू गुरूबाबा महाराज औसेकर यांनी व्यक्त केली. माघ शुध्द प्रतिदेस औशाहून प्रस्थान झालेली माघ पायी वारी दिंडी व पालखी आज चंद्रभागेत ऐलतिरावर येऊन स्थिरावली.

Thursday, February 02, 2012 AT 05:00 AM (IST)

 
डिकसळ  (diksal) - नाथ संस्थान येथून माघ वारीनिमित्त निघालेली दिंडी मजल-दरमजल करत लोकांचा उत्स्फूर्ताने स्वागत स्वीकारत स्वीकारत आज पहाटे 5 वाजता पोहंचली. तेथील वाळवंटात वीरनाथ मल्लनाथ माऊलीच्या पालखीसोबत आलेल्या घोड्यांचे गोल रिंगण संपन्न झाले. हे औसेकरांच्या वारीतील घोड्याचे गोल रिंगण पाहण्यासाठी व भोगावतीच्या पात्रातील खेळ-खेळीया बघण्यासाठी डिकसळच्या पंचक्रोशीतील हजारो भाविकांची गर्दी लोटली होती.

Tuesday, January 31, 2012 AT 05:00 AM (IST)

 
सोलापूर (solapur) - सोलापूर कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने दि.24 ते 28 जानेवारी दरम्यान कृषी विज्ञान केंद्राचे प्रक्षेत्र हिरज ता. उ. सोलापूर येथे भव्य कृषी तंत्रज्ञान सप्ताहाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. लालासाहेब तांबडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Friday, January 20, 2012 AT 05:00 AM (IST)

 
सोलापूर (solapur) - अखिल लोहार-गाडी लोहार समाज विकास संस्थेच्या वतीने दि.22 जानेवारी रोजी बाळे येथील श्रीकृष्ण आश्रमात समाजाचा राज्यस्तरीय वधू-वर पालक मेळावा आयोजित केल्याची माहिती मेळाव्याचे प्रमुख संयोजक पुरूषोत्तम पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. या मेळाव्यासाठी कोणत्याही प्रकारची देणगी अथवा शुल्क समाज बांधवाकडून घेतले जाणार नाही.

Friday, January 20, 2012 AT 05:00 AM (IST)

 
सोलापूर (solapur) - सोलापूरचे प्रसिध्द गायक यासीन सय्यद निर्मित देशभक्तीपर गिते असलेल्या गित हिंदुस्थानी या सिडीचे सोशल प्रशालेचे माजी मुख्याध्यापक महेमुद शेख यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या प्रकाशन सोहळ्यास महापौर आरिफ शेख, बी.एच. करजगीकर, गायक यासीन सय्यद, अबुल हसन, सुधीर येवलेकर, संगीतकार जब्बार मुर्शद, जब्बार शेख हे उपास्ंिथत होते. हा कार्यक्रम श्रमिक पत्रकार संघाच्या पत्रकार कक्षात संपन्न झाला.

Friday, January 20, 2012 AT 05:00 AM (IST)

 
सोलापूर (solapur) - सिध्देश्वर यात्रेत एका महिलेची सोनसाखळी चोरणाऱ्या चोरट्यास फौजदार चावडी पोलीसांनी अटक करण्याची कामगिरी केली आहे. फिर्यादी लता चंद्रशेखर रेडी (वय-32, रा. गंगावती, जि. कोपल्ल, कर्नाटक) या आपल्या नातेवाईकासोबत काल रात्रीच्या सुमारास सिध्देश्वर यात्रा पाहण्यासाठी आल्या होत्या.

Friday, January 20, 2012 AT 05:00 AM (IST)

 
सोलापूर (solapur) - के बी असोसिएटस्‌ प्रस्तुत 0 ते 10 वर्ष वयांच्या मुलांच्या पालकांसाठी सुजान पालकतत्व या महत्वाच्या विषयावर रेडियो सिटी 91.1 एफएम च्या वतीने दि.22 जानेवारी रोजी सायंकाळी 5.30 वाजता रंगभवन येथे व्याख्यान आयोजित केल्याची माहिती सत्यजित वझे यांनी पत्रकार परिषदेत दिली. सर्वसामान्य पालकांना मुलांच्या बाबतीत भेडसावणारे अनेक प्रश्नावर प्रसिध्द तज्ञ डॉ.

Friday, January 20, 2012 AT 05:00 AM (IST)

 
पंढरपूर (pandharpur) - विठ्ठलमूर्तीला इपोक्सी लेप देण्याचा मंदिर समितीच्या निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. कोणत्याही खासगी कंपनीकडून मूर्तीला लेप देण्यास वारकऱ्यांनी विरोध दर्शविला असून त्याविरुद्ध मंदिरात ठिय्या आंदोलन सुरु केलं आहे. विठ्ठल मूर्तीची झीज थांबवण्यासाठी मूर्तीला इपोक्सी लेप लावण्याचा निर्णय मंदिर समितीने दोन दिवसांपूर्वी घेतला होता. पुण्याच्या डेक्कन कॉलेजचे प्रमुख गो. ब.

Wednesday, January 18, 2012 AT 05:00 AM (IST)

 
सोलापूर (solapur) - सोलापूर शहर जिल्हा डॉजबॉल संघटना, जिवनदिप प्रतिष्ठान, मध्य रेल्वे इंन्स्टिटयुट यांच्या संयुक्त विद्यमाने कै. विजयराव मुळीक व कै. केशवराव मुळीक यांच्या स्मरणार्थ पाचव्या सब ज्युनिअर व सहाव्या ज्युनिअर जीवनदिप डॉजबॉल राज्य अजिंक्यपद स्पर्धेचे दि.21 ते 22 जानेवारी दरम्यान आयोजन करण्यात आल्याची माहिती स्पर्धेचे स्वागताध्यक्ष अशोक मुळीक यांनी पत्रकार परिषदेत दिली. सदरची स्पर्धा डॉ.

Wednesday, January 18, 2012 AT 05:00 AM (IST)

 
 
© Copyrights 2010 marathwadaneta.com - All rights reserved.
of
Powered By: