उस्मानाबाद जिल्ह्यातील एक छोटेसे गाव पळसप येथील शेतकरी कुटुंबात जन्मलेली व्यक्ति ही प्राथमिक शाळेपासून ते विद्यापीठातील विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी, असुटीत प्रश्नांच्या संदर्भात अतोनात प्रयत्न करणारा नेता म्हणून वसंतरावजी काळे सर्वांना परिचीत असे व्यक्तिमत्व होते. शासकीय महाविद्यालय औरंगाबादचा गुणी उत्कृष्ट विद्यार्थी, ज्ञानी व चांगला प्रवक्ता, झुंजार नेतृत्व म्हणून मराठवाड्यात परिचीत होते.
Thursday, February 02, 2012 AT 05:00 AM (IST)
आ. वसंतराव काळे आपल्याला तडकाफडकी सोडून गेले. पण यावर कोणाचा विश्वासच बसत नाही. अनेकांना आधार देण्यासाठीच ते जगले. सतत धडपड हा त्यांचा गुणधर्म होता. संपर्क, संवाद आणि संघर्ष या तीन माध्यमांचा त्यांनी आपल्या सार्वजनिक जीवनात उपयोग केला. त्यांनी आपल्या भोवती अनेक मित्र व चाहते जमविले. अनेकांना त्यांनी न्याय मिळवून दिला. मराठवाडाभर त्यांचा मित्र परीवार पसरलेला आहे. संपूर्ण मराठवाडा ही त्यांची कार्यभूमी होती.
Thursday, February 02, 2012 AT 05:00 AM (IST)
इस्लामाबाद (islamabad) - कराची किनाऱ्यालगत पाकिस्तानी सागरी भागात मासे पकडण्याच्या आरोपात 22 भारतीय मासेमारांना अटक करण्यात आली आहे. असोसिएटेड प्रेस ऑफ पाकिस्तानच्या वृत्तानुसार, पाकिस्तानी समुद्री सुरक्षा संस्थेने शनिवारी या मासेमारांना अटक केली. त्यांच्या चार नौकादेखील जप्त केल्या आहेत. भारतीय मासेमारांना पुढील चौकशीसाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
Monday, January 30, 2012 AT 05:00 AM (IST)
ज्ञानोबा तुकाराम ! ज्ञानोबा तुकाराम ! पंढरीनाथ भगवान की जय !! मल्लनाथ गुरु माझे आई-मजला ठाव द्यावा पायी असा श्री विठ्ठल नामाचा व सद्गुरुंचा नामजगजर करीत श्री. संत वीरनाथ मल्लनाथ महाराज संस्थानची परंपरेची माघ वारी दिंडी व पालखी पिठाधिपती सद्गुरु गुरुबाबा महाराज औसेकर यांच्या अधिपत्याखाली व सद्गुरु गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली माघ शु.
Wednesday, January 25, 2012 AT 05:00 AM (IST)
वर्धापन दिन लातूर येथील डॉ. गोसावी यांचे सुनंदा नेत्र चिकित्सालय हे रुग्णालय दुसऱ्या वर्षात यशस्वीरित्या पदार्पण करत आहे. त्यानिमित्ताने त्यांनी 26 जानेवारी 2012 रोजी मोफत नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन केले आहे. तसेच वर्धापन दिन साजरा करण्यात येत आहे. डॉ. गोसावी यांनी गेली अनेक वर्षे विविध चॅरिटेबल नेत्र रुग्णालयात नौकरी करुन हजारो रुग्णांना मोफत नेत्र शस्त्रक्रिया करुन समाजाची सेवा केली आहे. दि.
Wednesday, January 25, 2012 AT 05:00 AM (IST)
12 जानेवारी हा युवक दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने आजच्या तरुणांशी केलेला हा संवाद. --------------------------------------------- युवक-युवतींनो, संपूर्ण जग बदलत असताना तुम्ही तरुण आहात. या अर्थाने तुम्ही भाग्यवान आहात. आमच्या आधीच्या पीढीच्या काळात फक्त रेडियो आला होता. आमच्या काळात टी.व्ही. आणि इंटरनेट आले. तुमच्या काळात काय काय येईल, काहीच सांगता येत नाही. नवे तंत्रज्ञान दिवसागणिक नवी वस्तु साकारत आहे.
Thursday, January 12, 2012 AT 05:00 AM (IST)
निवडणूक सुधारणांची चर्चा सुरू आहे. साध्या मलमपट्टीने बदल होणार नाहीत. भारतीय निवडणूक पद्धतीत अमुलाग्र बदलाची गरज आहे. "खरे' लोकप्रतिनिधी निवडून येण्यासाठी, इंग्लंडच्या "हाऊस ऑफ लॉड्स'च्या पद्धतीची मतदारसंघांची रचना बदलून, प्राधान्यक्रमानुसार मतदानपद्धती आणणे व मतदान प्रक्रियेचा कालवधी वाढविणे निकडीचे आहे, वरवरची मलमपट्टी करून आपल्या लोकशाहीचे दुखणे बरे होणार नाही .................................................................................
Saturday, January 07, 2012 AT 05:00 AM (IST)
""पहले सुख निरोगी काय दुसरे सुख धन-माया'' या ओळी लहानपणी ऐकलेल्या ओळी 21 व्या शतकात झेप घेत असतांना आणखीन खूप खूप नव्हे खूपच सुक्ष्म- चळलीे बनल्या आहेत. पूर्वी ठ.च.झ. डॉक्टर खेड्यात उपचार करत मग इ.अ.च.ड. नंतर च.इ.इ.ड. व डॉक्टर म्हणजे देव असं समजलं जायचं नाडी परीक्षेतून निदान व्हायचं.
Sunday, January 01, 2012 AT 05:00 AM (IST)
औपचारिक संबंध असले तर माणूस तारखा, सनावळ्या लक्षात ठेवतो. डोंगरेसरांच्या बाबतीत तसं कधीच नव्हतं म्हणून त्यांची माझी ओळख कधी झाली हे आज मला नेमके आठवत नाही. विषय निघाला की आठवणी अशा उसळी मारून येतात, कोणती आधीची आणि कोणती नंतरची हे माझेच मला ओळखणे कठीण होऊन जाते. सगळ्याच ताज्या अन् रसरशीत. कोणतीही उचलून पाहिलीतर त्यात डोंगरे नावाचे सळसळणारे रसायण ओतप्रोत भरलेले. गेले वर्षभर सरांची आठवण झाली नाही असा एकही दिवस गेला नाही, असे एक ठिकाण आढळले नाही.
Sunday, December 25, 2011 AT 11:31 AM (IST)
मोबाईलमधून त्याचं नाव "डिलीट' करताना पुन्हा एकदा डोळे भरून आले. तो गेल्यावरही किती तरी दिवस ते तसेच ठेवले होते.काही केल्या "डिलीट'करवेना. देवानं त्याला इतक्या सहजपणे "डिलीट'कसं केलं असेल? त्याचाही हात थरथरला असेल का? की "डिलीट' करणं आणि "सेव्ह' करणं दोन्हीही त्याच्यासाठी फारसं महत्वाचं नसतंच? आपल्यासाठी मात्र त्या नावाची रिंग आता कधीच येणार नाही हे स्विकारायला मन तयार होत नाहीय. त्याचा कॉल आला की "बोला डोंगरे सर' अशी सुरुवात करायची.
Sunday, December 25, 2011 AT 11:28 AM (IST)
|
|
|
|