हॉंगकॉंग (hongkong) - आपल्या यशस्वी कामगिरीच्या जोरावर अनेक चाहते निर्माण करणारा शतायु बि ÷ टिश भारतीय ऍथलीटपटू फौजासिंगने हॉंगकॉंगच्या रहिवाशांनाही चकीत करीत आज येथे 10 किलोमीटरची शर्यत पूर्ण केली. "टर्बन्ड तारपीडो" या नावाने प्रसिद्ध असलेल्या फौजा सिंगने सुमारे एक तास आणि 34 मिनिटात हॉंगकॉंग मॅराथन पूर्ण केल्यानंतर सांगितले की, , ""मोसम खूप चांगला होता. मी शर्यतीचा आनंद लुटला.
Monday, February 06, 2012 AT 05:00 AM (IST)
मुंबई (mumbai) - मुंबईचा युवा टेनिसपटू आर्यन गोवियास याला पुढील महिन्यात फिलीपींसच्या मनिला येथे दोन आठवडे चालणाऱ्या आयटीएफ 14 व अंडर गुप एक टेनिस चॅम्पियनशिपसाठी भारताच्या 14 वर्षाखालील संघात निवडण्यात आले आहे. आर्यनने सीनियर गटात किताब जिंकून संघातील आपले स्थान निश्चित केले. या गैरमानांकित खेळाडूने तीन फेब ÷ ुवारी रोजी औरंगाबाद येथे एआयटीए टॅलेंट सीरीज टेनिस स्पर्धेत मुलांच्या 18 वर्षाखालील एकेरीत कर्नाटकच्या बी.एस.
Monday, February 06, 2012 AT 05:00 AM (IST)
वॉशिंग्टन (wasingtan) - अमेरिकेची अर्थव्यवस्था मजबूत होत असून, त्यामध्ये झपाट्याने वाढ होत असल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी म्हटले आहे. ओबामा म्हणाले, ''देशाच्या अर्थव्यवस्था मजबूत होत असताना बेरोजगारांच्या संख्येच्या दरातही घट झाली आहे. सध्या बरोजगारांचा दर 8.3 टक्क्यांवर पोचला आहे, तर जानेवारीमध्ये 2.4 लाख नव्या नोकऱ्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
Sunday, February 05, 2012 AT 05:00 AM (IST)
काबूल (kabul) - अफगाणिस्तानमधील युद्धात गेल्या वर्षभरात सुमारे 3 हजार नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. युद्धात सामान्य नागरिकांचा बळी जाण्याची संख्या गेल्या 5 वर्षांपासून वाढतच असल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाने आपल्या अहवालात म्हटले आहे. या अहवालामुळे पाश्चिमात्य देश आणि अफगाणिस्तान सरकार यांच्यातील तणाव आणखी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
Sunday, February 05, 2012 AT 05:00 AM (IST)
इस्लामाबाद (islamabad) - तालिबानी दहशतवाद्यांनी आज (शुक्रवार) पहाटे पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवरील कुर्रम आदिवासी पट्ट्यातील शिदानो दंड येथील चौकीवर केलेल्या हल्ल्यात आठ पाकिस्तानी सैनिक आणि 18 दहशतवादी ठार झाले. या वेळी दहशतवाद्यांनी पाच सैनिकांचे अपहरणही केल्याची बातमी वृत्तवाहिन्यांनी दिली. याच ठिकाणी काही दिवसांपूर्वी झालेल्या हल्ल्यात 14 सैनिक आणि 80 हून अधिक दहशतवादी मृत्युमुखी पडले होते.
Saturday, February 04, 2012 AT 05:00 AM (IST)
मेलबर्न (melbarn) - पापुआ न्यू गिनीजवळ गुरुवारी 350 प्रवाशांसह बुडालेल्या जहाजातील 120 पेक्षा अधिक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती शुक्रवारी ऑस्ट्रेलियन अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. पापुआ न्यू जिनिआच्या उत्तरेकडील तटाजवळ 350 प्रवाशांना घेऊन जाणारे एक जहाज बुडाले होते. त्यातील 238 प्रवाशांना बचाव पथाकाने वाचवले होते. मात्र, अजूनही 120 प्रवासी बेपत्ता असून त्यांना जलसमाधी मिळाल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
Saturday, February 04, 2012 AT 05:00 AM (IST)
इस्लामाबाद (islamabad) - पाकिस्तानचे लष्कर आपल्या खोड्या बंद करणार नाही. पाक लष्करावर दहशतवादी संघटनाची मदत करणे व समर्थन देण्याचा आरोप खुप कालावधीपासून लावल्या जात आहे. यासाठी त्याचे जगभरात खुप फजीतीही झाली आहे परंतु तो बदलणार नाही. पाक लष्कर अफगानिस्तानमध्ये तालिबानला अजुनही प्रत्यक्ष रूपाने मदत करीत आहे. इतकेच नव्हे तर पाकिस्तानला तालिबान नेत्यांच्या ठिकाणाची माहिती आहे. बीबीसीने नाटोच्या एक गुप्त अहवालाच्या हवाल्याने ही बाब म्हटली आहे.
Friday, February 03, 2012 AT 05:00 AM (IST)
इस्लामाबाद (islamabad) - न्यायालयाच्या अवमानप्रकरणी पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रजा गिलानी यांना सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली असून 13 फेब ÷ ुवारी रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. गिलानी न्यायालयात उपस्थित झाल्यानंतर त्यांच्यावर अधिकृतरित्या आरोपपत्र दाखल करण्यात येईल व त्यानंतर त्यांच्यावर अवमानप्रकरणी खटला चालवण्यात येईल असे संकेतही न्यायालयाने दिले आहेत.
Friday, February 03, 2012 AT 05:00 AM (IST)
वॉशिंग्टन (wasingtan) - अमेरिकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाकडून सर्वात बळकट दावेदार मानले जाणारे मिट रोमनी यांच्या वादग्रस्त वक्तव्याने खळबळ माजली आहे. त्यांनी म्हटले की, त्यांचे आपल्या देशातील गरींबावर लक्ष नसून मध्यमवर्गीय कुटुंबाच्या दुर्दशामुळे ते चिंतीत आहेत. निवडणुक स्थितीत गरीबांवर केलेल्या त्यांच्या या टिप्पणीचा उपयोग विरोधक त्यांच्याविरूद्ध शस्त्राप्रमाणे करत आहेत.
Friday, February 03, 2012 AT 05:00 AM (IST)
इस्लामाबाद (islamabad) - पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतामध्ये अज्ञात बंदूकधारी व्यक्तींनी एका हिंदू व्यापाऱ्याचे अपहरण केल्याची घटना घडली आहे. पाकिस्तानात हिंदू नागरिकांची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली असल्याचा हा पुरावा म्हणावा लागेल. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजयकुमार शाम, असे अपहरण झालेल्या व्यापाऱ्याचे नाव असून बंदूकधारी व्यक्तींनी त्यांच्या घरात प्रवेश करून त्यांचे अपहरण केले.
Friday, February 03, 2012 AT 05:00 AM (IST)
|
|
|
|