चंद्रपूर (chandrapur) - वाजत गाजत निघालेल्या ग ÷ ंथडिंडीने आज 85 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाला सुरुवात झाली. चंद्रपूरमधल्या राजीव गांधी आभियांत्रिकी महाविद्यालयात हे संमेलन भरत आहे. आझाद बागेजवळून निघणारी साहित्य दिंडी संमेलनस्थळी पोहचल्यानंतर संमेलनाचे पूर्वाध्यक्ष उत्तम कांबळे यांच्या हस्ते ग ÷ ंथप्रदर्शनाचे उद्धाटन होईल.
Saturday, February 04, 2012 AT 05:00 AM (IST)
नागपूर (nagpur) - नागपूर येथील एका औषधी कंपनीमध्ये काम करणाऱ्या अजय गजभिये या अधिकाऱ्याला त्याच्या मैत्रिणीचे मोबाइलमध्ये अशलील चित्रण करून सोशल नेटर्वकिंग साइटवर प्रसारित केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केल्याची घटना शनिवारी घडली. अजयने त्यांच्या सहकारी मैत्रिणीला जवळच्या एका रिसॉर्टमध्ये नेले. त्यानंतर तिला शीतपेयामधून गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध केले. त्यानंतर त्याने तिचे अशलील चित्रण करून सोशल साइटवर प्रसारित केले.
Monday, January 30, 2012 AT 05:00 AM (IST)
नागपूर (nagpur) - नागपूरमध्ये स्टार बसच्या 16 बसेसची तोडफोड करण्यात आली आहे. स्टार बसच्याच कर्मचाऱ्यांनी ही तोडफोड केली आहे. नोकरीवरुन काढल्याच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांनी आज 16 स्टार बसेस फोडल्या. गेल्याच महिन्यात जवळपास 100 कर्मचाऱ्यांना कामावरून बडतर्फ करण्यात आले होते. त्यानंतर या कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. मात्र आज या आंदोलनाला हिंसक वळण लागत तोडफोडीचा प्रकार घडला.
Wednesday, January 18, 2012 AT 05:00 AM (IST)
नागपूर (nagpur) - गर्भवती महिलेच्या मृत्यूनंतर तिच्या पोटातून अर्भकाला जिवंत बाहेर काढण्याचा करिष्मा नागपुरातील डॉक्टरांनी करून दाखवला आहे. गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्यास तिच्या पोटातील बाळही वाचत नाही. मात्र नागपुरातील डॉक्टरांनी हे शक्य करुन दाखवले. मुलाचा प्राण वाचवणारे डॉ. दंदे हे खऱ्या अर्थाने किमयागार ठरले आहेत. नागपुरमध्ये 31 डिसेंबर रोजी मृत महिलेच्या पोटातून जिवंत बाळ बाहेर काढण्याची यशस्वी शस्त्रक्रिया डॉ.
Wednesday, January 04, 2012 AT 05:00 AM (IST)
नागपूर (nagpur) - शासन आणि जनता यातील महत्त्वाचा दुवा म्हणून ओळखले जाणारे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने बदलत्या काळानुसार हायटेक होण्याकडे पावले उचलली आहेत. अधिकाऱ्यांना हायटेक प्रशिक्षणाबरोबरच लॅपटॉप, महान्यूज व लोकराज्यसाठी फेसबुक पेज, मंत्रालय वार्ताहर कक्षासाठी वायफाय कनेक्शन आणि ऑनलाईन मॅगझिन असे माहिती तंत्रज्ञानाशी निगडित 18 निर्णय महासंचालक तथा माहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव राजेश अग ÷ वाल यांनी येथे घेतले.
Friday, December 23, 2011 AT 05:00 AM (IST)
नागपूर (nagpur) - उद्धव ठाकरेंबरोबर कोणताही वाद नाही, आमचे दोन वेगवेगळे पक्ष आहेत त्यामुळे दोन वेगळे विचार आहेत, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले आहे. एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात त्यांनी उद्धव ठाकरेंबरोबरच्या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. यावेळी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरीही मंचावर उपस्थित होते. 'बेळगाव-कारवार सीमावासीयांच्या प्रश्नावरुन महाराष्ट्रातील मराठी नेते राजकारण करत आहेत.
Thursday, December 22, 2011 AT 05:00 AM (IST)
नागपूर (nagpur) - निधीची उपलब्धता करुन घेणे व त्याचा विनियोग योग्य प्रकारे आणि जनकल्याणासाठी करणे हे कल्याणकारी राज्याचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. अर्थसंकल्पाच्या माध्यमातून हे उद्दिष्ट साध्य होत असल्याचे प्रतिपादन विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी केले. 41 व्या राष्ट्रकुल संसदीय अभ्यासवर्गात ' अर्थसंकल्प : कल्याणकारी राज्य निर्मितीचे महत्त्वपूर्ण साधन ' या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
Thursday, December 22, 2011 AT 05:00 AM (IST)
नागपूर (nagpur) - राज्यातील सिंचनाविषयी जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांना समाधानकारक उत्तरे देता न आल्याने विरोधी पक्षाच्या आमदारांनी विधानसभेत जोरदार गोंधळ घातला. त्यामुळे आज (बुधवार) हिवाळी अधिवेशनात दिवसभरासाठी विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. राज्यातील सिंचनाच्या प्रश्नावरून विधानसभेत मंगळवारपासून चर्चा सुरु होती. या चर्चेदरम्यान विरोधी पक्षाच्या आमदारांनी सुनील तटकरे यांना विविध प्रश्न विचारले होते.
Thursday, December 22, 2011 AT 05:00 AM (IST)
नागपूर (nagpur) - बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर जवळ झालेल्या अपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशांच्या वारसांना तीन महिन्यात विमा कंपनीकडून मदत मिळावी यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जातील, अशी माहिती गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी विधानसभेत प्रश्नात्तराच्या तासात दिली. सदस्य विजयराज शिंदे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात अल्पसूचना मांडून मेहकर येथे झालेल्या दोन लक्झरी बसच्या टक्करीत 14 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता.
Thursday, December 22, 2011 AT 05:00 AM (IST)
नागपूर  (nagpur) - गेवराई शहरातील तपासणी करण्यात आलेल्या पाण्याचे सर्व नमुने पिण्यास योग्य असल्याबातचा अहवाल शासकीय प्रयोग शाळेने दिला आहे, अशी माहिती पाणीपुरवठा आणि स्वच्छता राज्यमंत्री रणजीत कांबळे यांनी विधानपरिषदेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना दिली. सदस्य उषाताई दराडे, विक्रम काळे, हेमंत टकले, रमेश शेंडगे यांनी हि लक्षवेधी सूचना दिली होती.
Wednesday, December 21, 2011 AT 05:00 AM (IST)
|
|
|
|