नळदुर्ग  (naldurga) - नळदुर्ग येथे राष्ट्रीय महामार्गावर दि. फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास सोलापूरहून हैद्राबादकडे जाणारा मालट्रक झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातामध्ये 8 जण ठार तर 11 जण गंभीर जखमी झाले आहेत. मयत आणि जखमी आंध्रप्रदेशातील असून ते पंढरपूरची माघीवारी करून गावी परतत असताना काळाने त्यांच्यावर झडप घातली. मृतामध्ये दोन लहान बालक तीन महिला व तीन पुरूषांचा समावेश आहे.
Monday, February 06, 2012 AT 05:00 AM (IST)
मुरूम  (murum) - उस्मानाबाद जिल्ह्यातील कॉंग्रेस प्रतिकूल परिस्थितीवर मात करून कॉंग्रेसचा झेंडा फडकवत असताना त्यांना साथ देण्यासाठी खात्री देण्यासाठी मी आज येथे आलेलो आहे. असे सांगून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, देशात महाराष्ट्र क्र. 1 वर येण्यासाठी जि.प. व पं.स. च्या निवडणुकीत कॉंग्रेसला मत द्या. विकासाला साथ द्या. या सभेच्या अध्यक्षस्थानी उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मधुकरराव चव्हाण होते.
Sunday, February 05, 2012 AT 05:00 AM (IST)
मुरुम  (murum) - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीरावजी चव्हाण हे आज 4 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजता मुरुम येथे येणार आहे. मुरुम, लोहारा, उमरगा जि.प., पंचायत समितीच्या प्रचारार्थ त्यांची सभा आहे. तरी जास्तीत जास्त मतदारांनी उपस्थित राहावे, अशी कॉंग्रेस पक्षाच्यावतीने विनंती करण्यात आलेली आहे. या सभेचे अध्यक्षस्थान पालकमंत्री मधुकरराव चव्हाण भूषवतील तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री आ. बसवराज पाटील हे उपस्थित राहणार आहेत.
Saturday, February 04, 2012 AT 05:00 AM (IST)
उस्मानाबाद (osmanabad) - बंगलोरहून औरंगाबादकडे प्रेत घेवून जाणा-या रूग्णावाहिकेची बसबरोबर समोरासमोर धडक बसल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात चार जागीच ठार तर एक रूग्णालयात मरण पावला,त्याचबरोबर दोन्ही वाहनांतील एकूण सातजण जखमी झाले आहेत.दुदैव असे की, या अपघातात मयताची पत्नीही ठार झाली आहे.उस्मानाबाद - तुळजापूर रस्त्यावर शहरापासून आठ कि.मी.अंतरावर असलेल्या वडगाव गावाजवळ गुरूवारी सकाळी पावने सात वाजता हा अपघात घडला.
Friday, February 03, 2012 AT 05:00 AM (IST)
नवी दिल्ली (new delhi) -- महाराष्ट्राने देशाला दिलेल्या रोजगार हमी योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी देश पातळीवरील दोन यशस्वी प्रयोगांना गुरूवारी नवी दिीत पंतप्रधानांच्याहस्ते सन्मानित करण्यात आले. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्र ामीण रोजगार हमी योजनेतंर्गत जलसंधारणाच्या कार्यासाठी नांदेड जिल्हा तर गावपातळीवर उत्कृष्ट योजना राबविण्यासाठी भंडारा जिल्ह्यातील बीड (सितेपार) ग्रम पंचायतला आज सन्मानित करण्यात आले.
Friday, February 03, 2012 AT 05:00 AM (IST)
पाऊले चालती पंढरीची वाट तुळजापूर  (tuljapur) - श्री सद्गुरू वीरनाथ मल्लनाथ महाराज संस्थानची माघ पायी वारी दिंडी पालखी व सद्गुरू गुरूबाबा व प.पू. गहिनीनाथ महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली मजल दरमजल करीत अळजापूर, मिरझनपूर, सारोळा, काठी (सावरगाव), सावंतवाडी मार्गे शेळगाव येथे मुक्कामासाठी आज 29 रोजी पोहोचली. तत्पूर्वी केशेगावहून तुळजापूर नगरीत काल दिंडी पालखीसह ठीक 3 वा. आली.
Monday, January 30, 2012 AT 05:00 AM (IST)
तुरोरी  (turori) - स्वैर मनाने केलेला विचार कुविचाराला जन्म देतो, पण बुध्दीतून आलेला विचार सुविचार जागृत करून निती, सद्विचार, सदाचारातून परमार्थिक जीवनात स्थीत करण्यात उपयोगी ठरतो, धर्म कुठलाही असेल, संप्रदाय कोणताही असो प्रत्येकास गुरू हवाच! आई मनुष्य जीवला जन्म देते पण भगसागरातून मुक्ती लाभण्यासाठी गुरूची नितांत गरज असते! वारकरी सांप्रदायात म्हणून गुरूउपासनेची दिव्य परंपरा आहे असे प्रतिपादन नाथसंस्थानचे सद्गुरू गहिनीनाथ महाराज औसेकर य ...
Thursday, January 05, 2012 AT 05:00 AM (IST)
मुरुम  (murum) - पालिका निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाकडून चार प्रभागात 17 उमेदवार उभे आहेत. या सर्व उमेदवारांना निवडून द्या व पुन्हा एकदा कॉंग्रेसची सत्ता पालिकेवर आणू द्या. विकासाचे पर्व पुन्हा सुरु करु या, अशा विधायक कामासाठीच आपली मतदानरुपी ताकत कॉंग्रेस पक्षाच्या पाठीशी उभी करा असे आवाहन मतदारांना औशाचे आ. बसवराज पाटील यांनी केले. पालिका निवडणूकीतील कॉंग्रेस उमेदवारांच्या प्रचार सभेप्रसंगी ता. 30 बुधवारी अण्णाभाऊ साठे चौकात ते बोलत होते.
Friday, December 02, 2011 AT 05:00 AM (IST)
उमरगा  (omarga) - शेती मालावर प्रक्रिया करणारे उद्योगधंदे उभारले तरच ग्रामीण भागाचा विकास शक्य आहे. शेतकरी सभासदांच्या सहकार्याने विठ्ठलसाई साखर कारखाना यशस्वीपणेसुरू आहे. मराठवाड्यात सहकार चळवळीला जन्म देणाऱ्या किल्लारी कारखान्यास गतवैभव मिळवून देऊन हा कारखाना कर्जमुक्त करण्यात येणार असल्याची ग्वाही औशाचे आमदार बसवराज पाटील यांनी दिली. आकाश (दादा) शिंदे मित्रमंडळ व शेतकरी सभासदांतर्फे आमदार श्री.
Friday, November 04, 2011 AT 05:00 AM (IST)
माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण यांना वाढदिवसानिमीत्त शुभेच्छा देताना दै. मराठवाडा नेता चे संपादक रामेश्वर बद्दर 2. माजी मंत्री आ. राणाजगजितसिंह पाटील यांना शुभेच्छा देताना दै. मराठवाडा नेता चे संपादक रामेश्वर बद्दर, सत्यजित बद्दर, माजी नगरसेवक व राष्ट्रवादी कॉंग्रेस जिल्हा सरचिटणीस राजा मणियार, आप्पा मुंडे, लातूर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस तालुकाध्यक्ष मदन काळे, राहूल माकणीकर आदी (छायाचित्र शाम भट्टड)
Monday, October 31, 2011 AT 09:12 AM (IST)
|
|
|
|