ठाणे (thane) - फोडाफोडीच्या धक्क्यातून सावरण्यापूर्वीच ठाण्यात शिवसेनेला मंगळवारी आणखी एक धक्का सहन करावा लागला आहे. पंधरवड्यापूर्वी मोठा गाजावाजा करीत मातोश्रीवर जाऊन सेनेत प्रवेश केलेल्या राष्ट्रवादीच्या कळवा खारेगावातील माजी नगरसेविका सुरेखा पाटील यांनी सेनेत तिकीट मिळण्याच्या आशा अंधूक बनल्याने अखेर मंगळवारी पुन्हा स्वगृही राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. टेंभीनाक्यावरील आनंद मठात सेनेच्या इच्छुकांच्या मुलाखती सुरु असताना आ.
Thursday, January 26, 2012 AT 05:00 AM (IST)
ठाणे (thane) - भगवान जगन्नाथ यात्रेनिमित्त 22 ते 29 जानेवारी दरम्यान ठाण्यात इस्कॉनने हरेकृष्ण फेस्टिव्हलचे आयोजन केले आहे. 26 जानेवारीला न्यु इंग्लीश स्कूलच्या मैदानावरून दुपारी 2 वाजता जगन्नाथ यात्रेला सुरुवात होणार आहे. अशी माहिती इस्कॉनच्या ठाणे प्रमुख नारायणी यांनी दिली आहे. ठाण्यामध्ये संपन्न होणारी ही पाचवी भगवान यात्रा असून या यात्रेत ठाणे व मुंबई परिसरातील वीस हजार भक्तगण सामिल होणार आहेत.
Saturday, January 21, 2012 AT 05:00 AM (IST)
ठाणे (thane) - महाराष्ट्र एस.टी. महामंडळातील कर्मचाऱ्यांचे 200 कोटी थकीत वेतन आणि कायद्यानुसार मिळणारे निर्धारीत वेतन 31 जानेवारीपर्यंत देण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र एस.टी. वर्कर्स कॉंग ÷ ेस संघटनेने केली आहे. मागणी मान्य झाली नाही तर न्यायालयात धाव घेणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष आमदार जयप्रकाश छाजेड यांनी दिली. एस.टी महामंडळाच्या आडमुठी धोरणामुळे व मान्यताप्राप्त कामगार संघटनेच्या विरोधामुळे एस.टी.
Friday, January 20, 2012 AT 05:00 AM (IST)
ठाणे (thane) - ठाण्यात शिवसेनेने राष्ट्रवादीचे अनेक मोहरे टिपून खिंडार पाडल्यानेच राष्ट्रवादीने कॉंग्रेस बरोबर आघाडीसाठी नरमाईची भूमिका घेतली असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी केला आहे. राष्ट्रवादीचे नगरसेवक हरीष वैती यांनी आज राष्ट्रवादीला आणखी एक धक्का देत नगरसेवकपदाचा राजीनामा देऊन शिवसेनेत प्रवेश केला आहे. बसपाचेही दोन नगरसेवक पक्षांतराच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे.
Friday, January 20, 2012 AT 05:00 AM (IST)
ठाणे (thane) - ठाणे महापालिका निवडणुकीचे मतदान व मतमोजणी एकाच दिवशी करणारी राज्यातील पहिली महापालिका ठरणार आहे. या निवडणुकीत ठाणे पालिका जिओ ग ÷ ाफीक्स इनफॉर्मेशन सिस्टमचा वापर करणार असल्याने मतदार व मतमोजणीत होणाऱ्या खर्चात 50 लाखाची बचत होणार असल्याची माहिती पालिका आयुक्त आर. ए. राजीव यांनी पत्रकार परिषदेत दिली. मतदानादिवशी मतदान कार्यालयावर कार्यरत अधिकाऱ्याला मोबाईल ह्यात जी आयएस प्रणालीचे सिम कार्ड देण्यात येणार आहे.
Friday, January 20, 2012 AT 05:00 AM (IST)
ठाणे (thane) - उपमुख्यमंत्री अजित पवारांना क्लिन चिट दिल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर कडाडून टीका केली आहे. आयोगाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना अजित पवारांना क्लिन चिट कशी देण्यात आली, असा सवाल राज ठाकरे यांनी केला आहे. राज ठाकरे यांनी ठाण्यामध्ये इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. त्यावेळी त्यांनी निवडणूक आयोगावर पुन्हा टीका केली. ते म्हणाले, अजित पवारांना क्लिन चिट कशी देण्यात आली.
Thursday, January 19, 2012 AT 05:00 AM (IST)
ठाणे (thane) - परीक्षा दिल्याशिवाय मनसेच्या कोणत्याही कार्यकर्त्याला उमेदवारी मिळणार नसल्याचे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. इच्छुक मनसे कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेण्यासाठी राज ठाकरे आज ठाण्यामध्ये आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना राज यांनी आपण मनपा निवडणुकांसाठी आधी आपल्याच पक्षातल्या कार्यकर्त्यांचा विचार करु, इतर पक्षांतल्या बंडखोरांचा नाही, असेही सांगितले.
Wednesday, January 18, 2012 AT 05:00 AM (IST)
ठाणे (thane) - उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर पुण्यात शिवाजीनगर येथील उड्डाणपूलाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याप्रकरणी दिलगिरी व्यक्त केल्याचे राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी आज सांगितले. हा विषय संपल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्या बोलत होत्या. शिवाजीनगरातील उड्डाणपुलाचे 3 जानेवारी रोजी पवार यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले होते.
Wednesday, January 18, 2012 AT 05:00 AM (IST)
ठाणे (thane) - उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवडणूक आयोगाकडून दिलासा मिळाला आहे. कारण आचारसंहितेचा भंग केल्याच्या तक्रारीतून त्यांना क्लीन चीट देण्यात आली आहे. राज्याच्या मुख्य निवडणुक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी ही माहिती दिली. अजित पवारांनी निवडणुक आयोगाकडे सादर केलंलं स्पष्टीकरण मान्य केल्याचं नीला सत्यनारायण यांनी ठाण्यात सांगितलं.
Wednesday, January 18, 2012 AT 05:00 AM (IST)
ठाणे (thane) - एकाच दिवशी जिल्हा परिषद आणि महापालिकांचे निकाल लावणे शक्य असताना निवडणूक आयोगाला कशाची घाई झाली आहे, असा सवाल करुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर टीका केली. आयोगावर सरकारचा दबाव असल्याचा आरोपही त्यांनी केला. महानगरपालिका निवडणुकीसाठी मनसेच्या इच्छुक उमदेवारांच्या मुलाखती घेण्यासाठी राज ठाकरे आज ठाण्यात आले आहेत.
Wednesday, January 18, 2012 AT 05:00 AM (IST)
|
|
|
|