Last Update: 


 
पहिलं पान  >>  संपादकीय विशेष
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्य मंत्री अजित पवार यांनी काल पुन्हा एकदा कॉंग्रेसवर टीकास्त्र सोडले. कॉंग्रेसवर म्हटल्यापेक्षा विलासराव देशमुख यांच्यावर टीकास्त्र सोडले. नेते कॉंग्रेसचे असोत की राष्ट्रवादीचे असोत त्यांनी कधीच तत्वाचे राजकारण केलेले नाही. त्यामुळे या दोन्ही पक्षांच्या नेत्यांना एकमेकांची उणीदुणी काढण्यास भरपूर संधी आहे. तेव्हा परस्परांचे वाभाडे काढण्याची स्पर्धाच लावली तर ती कित्येक महिने चालू शकेल.

Monday, February 06, 2012 AT 05:00 AM (IST)

 
भारतामध्ये स्त्रीयांच्या विरोधातील गुन्ह्यांमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे. महिलांवरील अत्याचार, कामाच्या ठिकाणी होणारे त्यांचे लैंगिक शोषण, दलित महिलांच्या नग्न किंवा अर्धनग्न अवस्थेत काढल्या जाणाऱ्या धिंडी आणि सुशिक्षित समाजात सुद्धा त्यांना मिळणारी विषमतेची वागणूक हे सारे प्रकार वाढत चाललेले आहेत.

Saturday, February 04, 2012 AT 05:00 AM (IST)

 
दोन दिवसांपूर्वी नारायण राणे यांनी आपल्या गावात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वस्त्रहरण करणारा मेळावा घेतला. पण दोनच दिवसांनी आपल्या पक्षाच्या केन्द्रातल्या सरकारचे सर्वोच्य न्यायालयात जाहीर वस्त्रहरण होणार आहे याची त्यांना कल्पना नसावी. सर्वोच्य न्यायालयाने ए. राजा यांच्या काळात 2008 साली मनमानी करून वाटप करण्यात आलेले 2 जी स्पेक्ट्रमचे सारेच्या सारे 122 चुकीचे परवाने रद्द केले आणि या कंपन्यांना जबर दंड ठोठावला.

Friday, February 03, 2012 AT 05:00 AM (IST)

 
केन्द्र सरकारने साखर उद्योगाला सरकारी नियंत्रणातून मुक्त करण्याच्या शक्यतेचा विचार करण्यासाठी एक समिती नेमली असून तिचा अहवाल लवकरच सादर होण्याची शक्यता आहे. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही समिती अनुकूल अहवाल देण्याच्या मनस्थितीत असून साखर धंदा लवकरच सरकारच्या तावडीतून मुक्त होण्याची शक्यता आहे. तशी शक्यता नसली तरीही हा उद्योग नियंत्रणांतून मुक्त झाला पाहिजे कारण तो अजूनही सरकारी नियंत्रणाखाली असल्यामुळे त्याची प्रगती खुुुंटली आहे.

Thursday, February 02, 2012 AT 05:00 AM (IST)

 
महाराष्ट्रात आता जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका होत आहेत. राज्यभर निवडणुकीचा माहोल आहे. या वेळच्या या वातावरणात निवडणुकीपेक्षाही बंडखोरीला अधिक महत्त्व आले आहे. प्रत्येक पक्षात कमी अधिक प्रमाणात बंडखोरी होताना दिसत आहे. मुंबईत तर तिकिटे न मिळालेल्या कार्यकर्त्यांनी प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या कार्यालयात घुसून तोडफोड केली.

Wednesday, February 01, 2012 AT 05:00 AM (IST)

 
पुण्यात एका माथेफिरू एसटी ड्रायव्हरने आपली ड्यूटी नसलेली बस चुकीच्या दिशेने चालवून आठ जणांना मारले आणि 27 जणांना जखमी केले. या प्रकाराने सर्वजणच हादरले आहेत. असा प्रकार यापूर्वी कधी घडला नव्हता आणि घडणारही नाही. पण या निमित्ताने एसटी महामंडळाच्या बेदरकार कारभारावर प्रकाश पडायला लागला आहे. एखाद्या बसमधून प्रवास करताना हळूच बसच्या कंडक्टरशी संवाद सुरू झाला की, महामंडळाचा कारभार कसा चालला आहे याचे नमुने तो आपल्याला ऐकवायला लागतो.

Tuesday, January 31, 2012 AT 05:00 AM (IST)

 
केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी 2014 सालची लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. आपल्यापेक्षा तरुण लोकांना निवडणुका लढविण्याची संधी मिळावी म्हणून आपण हे पाऊल उचलत आहोत, असे त्यांनी ही घोषणा करताना म्हटले आहे. पवारांनी लोकसभा निवडणुका न लढवण्याचा निर्णय घेतला आहे याचा अर्थ ते राजकारणातून निवृत्त होत आहेत किंवा राजकारण सन्यास घेत आहेत असा होत नाही.

Monday, January 30, 2012 AT 05:00 AM (IST)

 
भारतीय प्रजासत्ताकाचा 62 वा वर्धापन दिन साजरा होत आहे. जगात अनेक देश स्वातंत्र्य दिन साजरा करीत असतात पण भारतात स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन असे दोन राष्ट्रीय दिन साजरे होत असतात.  यामागची कारणे लक्षात घेतली पाहिजेत. आपण दोन सण का साजरा करतो हे आधी पाहिले पाहिजे आणि हा दुसरा सण आपण 26 जानेवारीलाच का साजरा करतो हेही पाहिले पाहिजे. आपण केवळ स्वतंत्रच झालो असे नाही तर प्रजासत्ताक देश झालो.

Thursday, January 26, 2012 AT 05:00 AM (IST)

 
नामवंत वादग्रस्त ब्रिटीश लेखक सलमान रश्दी यांचा जयपूर साहित्य संमेलनातला सहभाग वादग्रस्त ठरला. कारण त्यांना भारतात पाय ठेवण्याची अनुमती देऊ  नये अशी मागणी अनेक मुस्लिम नेत्यांनी आणि धर्मगुरूंनी केली होती. सरकारलाही ही मागणी फेटाळता आली नाही कारण शेवटी हा मुस्लिम समाजाच्या भावनांचा आणि परिणामी मतांचा प्रश्न आहे. सरकारने परवानगी नाकारली पण सरळ नाकारली नाही.

Wednesday, January 25, 2012 AT 05:00 AM (IST)

 
देशाचा विकास करायचा असेल तर शिक्षणाचे प्रमाण वाढण्याशिवाय अन्य पर्याय नाही. परंतु भारतामध्ये नेमके शिक्षणाकडे दुर्लक्ष केले जात होते. गेल्या काही वर्षांमध्ये मात्र शिक्षणावर थोडा भर दिला गेला. 1998 ते 2004 अशी सहा वर्षे केंद्रात सत्तेवर असलेल्या रा.लो. आघाडी सरकारने सर्व शिक्षा अभियानाला सुरुवात केली. ग्रामीण भागामध्ये आणि वाड्या-पाड्यांवर शिक्षणाचा प्रसार व्हावा यासाठी या योजनेखाली अब्जावधी रुपयांचे अनुदान दिले गेले.

Tuesday, January 24, 2012 AT 05:00 AM (IST)

 
 
© Copyrights 2010 marathwadaneta.com - All rights reserved.
of
Powered By: