Last Update: 


 
पहिलं पान  >>  पुणे
पुणे (pune) - तमिळ चित्रपट आणि जाहिरात क्षेत्रातील एका प्रसिद्ध अभिनेत्रीला आणि तिच्या व्यवस्थापकाला वेश्याव्यवसाय करताना पुण्यातील एका पंचतारांकित हॉटेलात पोलिसांनी रंगेहात ताब्यात घेतले आहे. अभिनेत्री कॅरोलिन मारिया असान (वय-22, रा.सईदापेठ, चेन्नई) आणि तिचा व्यवस्थापक एम. राजकुमार (वय-32) याला पुणे पोलिसांनी विमान नगरातील एका पंचतारांकित हॉटेलमधून अटक केले. कॅरोलिन असानने 'रेन', 'वादा चेल्लन' अशा तमिळ चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Monday, February 06, 2012 AT 05:00 AM (IST)

 
पुणे (pune) - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग ÷ ेस पक्षाच्या प्रचाराचा नारळ प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांच्या हस्ते फोडण्यात येणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, पक्ष निरीक्षक किशोर पाटील उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, राष्ट्रवादीचे पिंपरी-चिंचवड शहरात किमान 100 नगरसेवक निवडून आणण्यासाठी पवारांनी चंग बांधला, त्यांच्या प्रयत्नांना यश येत असल्याचे चित्र आहे.

Monday, January 30, 2012 AT 05:00 AM (IST)

 
पुणे (pune) - स्वारगेट परिसरात बेफाम एसटी चालवून आठ नागरिकांचे बळी घेणारा संतोष माने या बसचालकाला येरवडा येथील प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मानेचा अहवाल दोन फेब ÷ ुवारी रोजी न्यायालयात सादर केला जाईल अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. व्ही. आर. भैलुमे यांनी दिली. गुन्हे शाखेच्या कोठडीत असलेल्या मानेला शनिवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले होते.

Monday, January 30, 2012 AT 05:00 AM (IST)

 
पुणे (pune) - सामाजिक बांधीलकी मानणारे तसेच कार्यक्षम व नेतृत्त्वगुण असणारे लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने निवडून यावेत, अशी मतदारांची अपेक्षा असेल तर मतदानाची टक्केवारी शंभर टक्क्यापर्यन्त वाढण्याची आवश्यकता असल्याचे मत विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी व्यक्त केले. जिल्हा प्रशासनातर्फे येथील कौन्सिल हॉल येथे "राष्ट्रीय मतदार दिवसाचे " आयोजन विभागीय आयुक्तांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते. या प्रसंगी केलेल्या भाषणात ते बोलत होते.

Thursday, January 26, 2012 AT 05:00 AM (IST)

 
पुणे (pune) - शहरातील वाहतूक सुरळीत व सुरक्षित चालण्याच्या दृष्टीने हिंजवडी वाहतूक विभागात बदल करण्यात येणार असून याबाबत नागरिकांनी आपल्या सूचना पोलीस उपआयुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा,साधु वासवाणी रोड, पुणे-1 येथे दिनांक 7 फेब ÷ ुवारी 2012 पर्यंत लेखी पाठवावयाच्या आहेत. हिंजवडी वाहतूक विभागांतर्गत हिंजवडी बाजूने वाकड बाजूकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना सकाळी 8 ते 10 च्या दरम्यान वाकड चौकातील ओव्हर ब ÷ ीजवरुन जाण्यास बंदी करण्यात येणार आहे.

Thursday, January 26, 2012 AT 05:00 AM (IST)

 
पुणे (pune) - पुणे शहरातील समर्थ वाहतूक विभागांतर्गत रास्तापेठ केईएम ते दारुवाला पुलापर्यंत मुख्य वाहिनी टाकावयाची असल्याने तेथील वाहतूकीत दिनांक 16 फेब ÷ ुवारी 2012 पर्यंत बदल करण्यात येणार आहेत. या विभागांतर्गत अपोलो थिएटर चौक ते दारुवाला पुल चौकापर्यंतच्या एकेरी वाहतूकीच्या रस्त्यावर सर्व वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत आहे.

Thursday, January 26, 2012 AT 05:00 AM (IST)

 
पुणे (pune) - शिवसेनेचे खासदार भारतकुमार राऊत यांच्या गाडीला खंडाळ्याजवळ अपघात झाला असून त्यांना पुण्यातील लोकमान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राऊत यांच्या डोक्याला दुखापत झाली असून मेंदुमध्ये रक्तस्त्राव झाला आहे. त्यामुळे त्यांना आयसीयुमध्ये दाखल करण्यात आले आहे. रुग्णालय प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार खासदार राऊत यांची प्रकृती स्थिर आहे.

Monday, January 23, 2012 AT 05:00 AM (IST)

 
पुणे (pune) - येथील एका व्यक्तीने आपली पत्नी, दोन मुले यांना औषध गोळ्या देऊन मारले व त्यानंतर स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. अरूण काशीनाथ पालकर (वय 42, रा. श्री समर्थ वंदन सोसायटी, गणेश नगर, धायरी) यांनी त्यांच्या कुटुंबासह आज (रविवार) औषधाच्या गोळ्या घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यात त्यांची पत्नी अनिता अरूण पालकर (वय 41) आणि दोन मुले, ओंकार अरूण पालकर (वय 11) व ओमप्रकाश अरूण पालकर (वय 6) या तिघांचा मृत्यू झाला आहे.

Monday, January 23, 2012 AT 05:00 AM (IST)

 
पुणे (pune) - राज्यातील महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या छायाचित्रांचा वापर केल्यास फौजदारी कारवाई करण्यात येईल, हा इशारा म्हणजे 'अण्णांचा फतवा' आहे आणि तो आपण मानणार नाही, अशी भूमिका एका अपक्ष उमेदवाराने घेतली आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील अपक्ष नगरसेवक मारुती भापकर यांनी अण्णांच्या आदेशाचे उल्लंघन करणार असल्याचे म्हटले आहे. अण्णा आणि त्यांच्या टीमने माझ्याविरोधात फौजदारी कारवाई करावी.

Monday, January 23, 2012 AT 05:00 AM (IST)

 
पुणे (pune) - पुणे शहरात विविध पक्ष, संघटनाकडून आंदोलने, निदर्शने होत आहेत. तसेच पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकांची निवडणूक आचारसंहिता लागू झाली आहे. यासाठी पुणे शहर पोलीस आयुक्तालयामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी दिनांक 28 जानेवारी 2012 पर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37 (1) व (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आला आहे, असे पोलीस सह-आयुक्त संजीवकुमार सिंघल यांनी पत्रकान्वये कळविले आहे.

Saturday, January 21, 2012 AT 05:00 AM (IST)

 
 
© Copyrights 2010 marathwadaneta.com - All rights reserved.
of
Powered By: