परभणी (parbhani) - तालुक्यातील जांब जिल्हा परिषदेच्या गटात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार ऍड. बाळासाहेब जामकर यांचा दांडग्या जनसंपर्क आहे. त्यामुळेच कॉंग्रेसचे मुरलीधर लोहर व शिवसेनेचे श्रीनिवास रेंगे हे प्रचारात मागे पडले आहेत. जांब जिल्हा परिषदेच्या गटाकडे संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. तालुक्याच्या राजकारणात नेहमीच जामकरांचे नेतृत्व मान्य करण्यात येते. विद्यमान जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष ऍड.
Monday, February 06, 2012 AT 05:00 AM (IST)
परभणी (parbhani) -   येथील जीवनज्योत चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी खा.प्रा.कै.अशोकरावजी देशमुख यांच्या स्मृती दि.02 फेब्रुवारी रोजी भव्य निकाली कुस्तीचे आयोजन करण्यात आले आहे. मोटर सायकल व चांदीच्या गद्देसह एकूण 6 लाखाची रोख परितोषीक विजेत्या पैलवानांना देण्यात येणार आहे, अशी महिती ट्रस्टचे सचिव तथा या स्पर्धेचे मुख्य आयोजक रविराज देशमुख यांच्या वतीने देण्यात आली आहे.
Tuesday, January 31, 2012 AT 05:00 AM (IST)
लातूर  (latur) - ट्रकने एकास रस्ता ओलांडताना चिरडल्याची घटना रविवारी रात्री 9.15 वा. कव्हा नाकाच्या पुढे असलेल्या करीमा हॉस्पिटलसमोर घडली. चिरडल्याने व्यक्ती जागीच ठार झाला. कव्हा नाक्याच्या पुढील बाजूस असलेल्या करीमा हॉस्पिटलसमोर रविवारी रात्री 9.15 वा. ट्रकने (एमएच 24 पीआर 227) रिंगरोड ओलांडताना कमलाकर बाबूराव गुरमे (वय 33, रा. मोतीनगर) यांना चिरडले. त्यामुळे गुरमे यांचा जागीच मृत्यू झाला.
Tuesday, January 31, 2012 AT 05:00 AM (IST)
परभणी (parbhani) - युवक कॉंग्रेसचे सुप्रिमो राहुल गांधी यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीत 30 टक्के युवकांना संधी द्यावी, असे जाहीर केलेले असतांना त्यांच्या या नितीचा परभणी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ.सुरेश देशमुख यांनी अपमान केला आहे, असा सणसणीत आरोप कृउबाचे उपसभापती तथा युवानेते आनंदराव भरोसे यांनी केला.
Tuesday, January 31, 2012 AT 05:00 AM (IST)
परभणी  (parbhani) - जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पात 28.376 दलघमी तर लघु प्रकल्पात 11.607 दलघमी पाणीसाठा उपलब्ध आहे. जिल्ह्यात 2 मध्यम तर 22 लघु असे एकूण 24 प्रकल्प आहेत. मध्यम प्रकल्पाची पूर्ण जल क्षमता 39.236 असून यापैकी मध्यम प्रकल्पात 28.376 दलघमी पाणीसाठा उपलब्ध आहे. ही टक्केवारी 54 आहे. तर लघु प्रकल्पाची पूर्ण जल क्षमता 15.054 असून यापैकी 11.607 दलघमी पाणीसाठा उपलब्ध आहे. ही टक्केवारी 28 आहे.
Tuesday, January 31, 2012 AT 05:00 AM (IST)
पुर्णा (purna) - येथील जिल्हा मध्यवर्ती बॅंक घोटाळ्यातील आरोपी आ. रामप्रसाद बोर्डीकर यांनी आज न्यायालयापुढे शरणागती पत्कारली. त्यांनी अटकपूर्व जामीनासाठी सर्वोच्च न्यायालया पर्यंत धाव घेतली होती पण शेवटी सर्वोच्च न्यायालयातही जामीन फेटाळण्यात आल्याने अखेर त्यांनी आज दिनांक 17 जानेवारी रोजी 1.15 वाजता जिल्हा न्यायाधिश कुलदिपक पवार यांच्या न्यायालयात स्वत: येवुन शरणागती पत्कारली. सदरील प्रकरण हे मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात असल्याने न्या.
Wednesday, January 18, 2012 AT 05:00 AM (IST)
परभणी (parbhani) - येथील काशी दामोधर मंगल कार्यालयात वधु-वर परिचय मेळाव्या निमित्त वीरशैव समाजबांधावांची येत्या गुरूवार 5 जानेवारी रोजी महत्तपुर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. वधु-वर परिचय मेळावा ही काळाची गरज बनली असून या मेळाव्यासाठी गुरूवारी सकाळी 11 वाजता वीरशैव समाज बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन डॉ.बी.एन.एकशिंगे, शिवदास अप्पा महाजन, शरदअप्पा कापसे, संजय फुलझळके, शिवशंकर स्वामी, शिवलिंग अप्पा, खापरे, हनुमंत भालेराव, बंडू पाचलिंग, पी.
Tuesday, January 03, 2012 AT 05:00 AM (IST)
परभणी (parbhani) - तबला व पखवाज ही वाद्ये भारतीय संगीताचा अविभाज्य भाग आहेत. भारतातील अनेक दिग्गज, कलाकरांमुळे आज भारतीय वादन संपूर्ण जगभरात सुप्रसिध्द आहे. भारतीय संगीताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहावा अशा या भव्य महोत्सवात हजर रहाण्याची संधी संगीत रसिकांना चालून आली आहे. आर्ट ऑफ लिव्हींग परिवाराच्या वतीने दि.
Tuesday, January 03, 2012 AT 05:00 AM (IST)
परभणी (parbhani) - येथील प्रियदर्शनी इंदिरागांधी क्रिडा संकुल समोरील रस्त्यावर, वर्षानुवर्ष अतिक्र मण केलेल्या पानटपऱ्या, चहाचे गाडे आज महानगर पलिकेच्या कर्मचाऱ्यंानी हटविले. ग्रामविकास मंत्री जंयती पाटील यांचे सदरहू रस्त्याने आगमन होणार असल्याचा पार्श्वभुमीवर ही अतिक्रमणे काढण्यात आली आहेत. राज्याचे ग्रामविकास मंत्री जयंत पाटील मंगळवारी बहुविध प्रशालेच्या मैदानावर होवू घातलेल्या जि.प.इमारतीच्या भुमीपूजन कार्यक्र मास येणार आहेत.
Tuesday, January 03, 2012 AT 05:00 AM (IST)
परभणी  (parbhani) - राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत फिरत्या वैद्यकीय पथकाचा (मोबाईल व्हॅन) लोकार्पण सोहळा राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री प्रा. फौजिया खान यांच्या हस्ते पार पडला. जिल्हा रुग्णालयात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ. शालिग्राम वानखेडे हे होते. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा कुसूमताई देशमुख, आरोग्य सभापती दिगंबरराव कऱ्हाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी एन.पी. मित्रगोत्री, एन.डी.
Monday, January 02, 2012 AT 05:00 AM (IST)
|
|
|
|