नाशिक (nasik) - नाशिकजवळ गुडी आणि पाडळीदरम्यान रेल्वेमार्गावर मालगाडीचे 20 डबे घसल्यामुळे नाशिककडून मुंबईकडे येणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. आज (गुरुवारी) सकाळी साडेसात-आठच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातामुळे उत्तरेकडून मुंबईला येणारया अनेक गाड्या विविध स्थानकात थांबविण्यात आल्या आहेत. दोरांतो एक्सप्रेससह अनेक गाड्या भुसावळ, मनमाड आणि नाशिक स्टेशनमध्ये अडकून पडल्या आहेत.
Friday, January 20, 2012 AT 05:00 AM (IST)
नाशिक (nasik) - नाशिकमध्ये वाहनांच्या जाळपोळीचे सत्र सलग दुसऱ्या दिवशीही सुरुच राहिले. मंगळवारी पहाटे द्वारका चौकात उभ्या असणाऱ्या टॅक्सी पहाटे जाळण्यात आल्या. धुळे, मालेगावकडे दररोज प्रवासी वाहतूक करणाऱ्या टॅक्सी द्वारका चौकात रात्री उभ्या होत्या. दोन वाजण्याच्या सुमारास अज्ञात समाजकंटकांनी या टॅक्सी पेटवून दिल्या. काल सिडकोतल्या मुरवाडी परिसरात बांधकाम ठेकेदारांचे तीन टेम्पो जाळण्याच प्रयत्न झाला होता.
Wednesday, January 18, 2012 AT 05:00 AM (IST)
नाशिक (nasik) - भुजबळ फाउंडेशन आयोजित नाशिक फेस्टिव्हलचा ग ÷ ॅँड फिनाले रविवारी संध्याकाळी 6 वाजता अनंत कान्हेरे मैदानावर होणार आहे. मकर संक्रांतीची संध्याकाळ नाशिककरांना सेलिबि ÷ टींच्या सहवासात अनुभवायला मिळणार आहे. प्रसिद्ध गायक शान, अभिनेते अनिल कपूर, गोविंदा, समिरा रेड्डी आदी नामवंत मंडळी या कार्यक्रमाच्या निमित्ताने नाशकात अवतरणार आहे. शान यांच्या गाण्यांचा आस्वाद यावेळी नाशिककरांना घेता येणार आहे.
Monday, January 16, 2012 AT 05:00 AM (IST)
नाशिक (nasik) - कुसुमाग ÷ ज प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणाऱ्या "गोदावरी गौरव' पुरस्कार विजेत्यांची नावं जाहीर करण्यात आली. लोकसेवेसाठी सय्यदभाई (पुणे), शिल्प प्रकारासाठी सुदर्शन पटनाईक (ओडिशा), विज्ञान क्षेत्रासाठी डॉ. बाळ फोंडके (मुंबई), नृत्य प्रकारात डॉ. पद्मा सुब ÷ मण्यम (तामिळनाडू), क्रीडा प्रकारात धनराज पिल्ले (पुणे) तर चित्रपट क्षेत्रासाठी इसाक मुजावर (कोल्हापूर) यांना हे पुरस्कार जाहीर झाले आहेत.
Monday, January 16, 2012 AT 05:00 AM (IST)
नाशिक (nasik) - येथील रेल्वेस्थानकावर भेळ विक्री करून उदरनिर्वाह करणाऱ्या विक्रेत्याचा खून करून, त्याच्याकडील 20 हजार रुपयांची रक्कम लुटल्याची घटना आज (शुक्रवार) सकाळी उघडकीस आली आहे. सुब ÷ तो सृष्टीचरण दास (वय 45 रा. सुंदरनगर) या भेळ विक्रेत्याचा अज्ञात व्यक्तीने खून करून, मृतदेह पुलाखाली टाकला होता. त्यांच्याजवळ 20 हजार रुपयांची रक्कम होती, अशी माहिती त्यांच्या पत्नीने दिली.
Saturday, January 14, 2012 AT 05:00 AM (IST)
नाशिक (nasik) - आज (रविवारी) दुपारी सुरगाणा तालुक्यात बोरगाव येथील शासकीय वसतिगृहात राहणाऱ्या 52 मुलींना विषबाधा झाल्याची घटना घडली. जेवणात मुगाच्या डाळीची आमटी आणि वाटाण्याची उसळ खाल्यानंतर या मुलींना मळमळ तसेच उलट्यांचा त्रास होऊ लागला. त्यानंतर 72 पैकी 52 मुलींना अधिक त्रास झाल्याने त्यांना सुरगाणा तसेच नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
Monday, January 09, 2012 AT 05:00 AM (IST)
नाशिक (nasik) - बलात्काराच्या दोन घटनांनी आज नाशिक शहर हादरले. शहरातील एका युवतीवर झालेला सामूहिक बलात्कार आणि अल्पवयीन मुलीवर एका वृद्धाने केलेला बलात्कार यामुळे नाशिककर सुन्न झाले आहेत. शहरामधील मखमलाबादजवळ राहणाऱ्या एका मुलीला रविवारी मध्यरात्री काही जणांनी पळवून नेले. त्यानंतर तवलेचा डोंगर आणि भूत बंगला परिसरात नेऊन तिच्यावर मध्यरात्री सामूहिक बलात्कार करण्यात आला.
Thursday, January 05, 2012 AT 05:00 AM (IST)
मुंबई (mumbai) - एका टीव्ही निर्मात्याने शाहरूख खानवर त्याची कथा चोरल्याचा आरोप ठेवला आहे. शाहरूखच्या आगामी 'रा.वन' या चित्रपटाची कथा त्याच्याकडूनच चोरली असल्याचा दावा या निर्मात्याने केला आहे. या चित्रपटाचे प्रदर्शित करण्यात येऊ नये या मागणीसाठी त्याने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. हा चित्रपट दिवाळीच्या मुहुर्तावर 26 ऑक्टोबरला प्रदर्शित होतोय. या निर्माता-लेखकाचे नाव आहे यश पटनायक.
Saturday, October 22, 2011 AT 05:00 AM (IST)
नाशिक (nasik) - नाशिक मध्यवर्ती कारागृहातील 300 कैद्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचाराने प्रेरीत होऊन गांधीजींच्या जीवनावर आधारित घेण्यात आलेली परीक्षा दिली. सर्वोदय मंडळातर्फे प्रत्येक वर्षी ऑॅक्टोबर महिन्यात राज्यातील 18 मध्यवर्ती कारागृहात या परीक्षेचे आयोजन करण्यात येते. शनिवारी झालेल्या परिक्षेचे आयोजन मुंबई येथील 'सर्वोदय मंडळ' आणि 'गांधी संशोधन केंद्र' यांच्या वतीने करण्यात आले होते.
Monday, October 10, 2011 AT 05:00 AM (IST)
नाशिक (nasik) - नाशिक आणि नगर जिल्ह्यातल्या थकबाकीदारांना वीज वितरण कंपनीने दणका दिला आहे. कंपनीने तब्बल 44 हजार थकबाकीदार गाहकांचा वीज पुरवठा खंडित केला आहे. थकबाकी वसुलीसाठी सुरु केलेल्या मोहिमेंतर्गत गेल्या आठवड्याभरात ही कारवाई करण्यात आली असून वीज कंपनीच्या या मोहिमेमुळे थकबाकीदार गाहकांचे धाबे दणाणाले आहे.
Monday, September 19, 2011 AT 05:00 AM (IST)
|
|
|
|