Last Update: 


 
पहिलं पान  >>  नाशिक
नाशिक (nasik) - नाशिकजवळ गुडी आणि पाडळीदरम्यान रेल्वेमार्गावर मालगाडीचे 20 डबे घसल्यामुळे नाशिककडून मुंबईकडे येणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. आज (गुरुवारी) सकाळी साडेसात-आठच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातामुळे उत्तरेकडून मुंबईला येणारया अनेक गाड्या विविध स्थानकात थांबविण्यात आल्या आहेत. दोरांतो एक्सप्रेससह अनेक गाड्या भुसावळ, मनमाड आणि नाशिक स्टेशनमध्ये अडकून पडल्या आहेत.

Friday, January 20, 2012 AT 05:00 AM (IST)

 
नाशिक (nasik) - नाशिकमध्ये वाहनांच्या जाळपोळीचे सत्र सलग दुसऱ्या दिवशीही सुरुच राहिले. मंगळवारी पहाटे द्वारका चौकात उभ्या असणाऱ्या टॅक्सी पहाटे जाळण्यात आल्या. धुळे, मालेगावकडे दररोज प्रवासी वाहतूक करणाऱ्या टॅक्सी द्वारका चौकात रात्री उभ्या होत्या. दोन वाजण्याच्या सुमारास अज्ञात समाजकंटकांनी या टॅक्सी पेटवून दिल्या. काल सिडकोतल्या मुरवाडी परिसरात बांधकाम ठेकेदारांचे तीन टेम्पो जाळण्याच प्रयत्न झाला होता.

Wednesday, January 18, 2012 AT 05:00 AM (IST)

 
नाशिक (nasik) - भुजबळ फाउंडेशन आयोजित नाशिक फेस्टिव्हलचा ग ÷ ॅँड फिनाले रविवारी संध्याकाळी 6 वाजता अनंत कान्हेरे मैदानावर होणार आहे. मकर संक्रांतीची संध्याकाळ नाशिककरांना सेलिबि ÷ टींच्या सहवासात अनुभवायला मिळणार आहे. प्रसिद्ध गायक शान, अभिनेते अनिल कपूर, गोविंदा, समिरा रेड्डी आदी नामवंत मंडळी या कार्यक्रमाच्या निमित्ताने नाशकात अवतरणार आहे. शान यांच्या गाण्यांचा आस्वाद यावेळी नाशिककरांना घेता येणार आहे.

Monday, January 16, 2012 AT 05:00 AM (IST)

 
नाशिक (nasik) - कुसुमाग ÷ ज प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणाऱ्या "गोदावरी गौरव' पुरस्कार विजेत्यांची नावं जाहीर करण्यात आली. लोकसेवेसाठी सय्यदभाई (पुणे), शिल्प प्रकारासाठी सुदर्शन पटनाईक (ओडिशा), विज्ञान क्षेत्रासाठी डॉ. बाळ फोंडके (मुंबई), नृत्य प्रकारात डॉ. पद्मा सुब ÷ मण्यम (तामिळनाडू), क्रीडा प्रकारात धनराज पिल्ले (पुणे) तर चित्रपट क्षेत्रासाठी इसाक मुजावर (कोल्हापूर) यांना हे पुरस्कार जाहीर झाले आहेत.

Monday, January 16, 2012 AT 05:00 AM (IST)

 
नाशिक (nasik) - येथील रेल्वेस्थानकावर भेळ विक्री करून उदरनिर्वाह करणाऱ्या विक्रेत्याचा खून करून, त्याच्याकडील 20 हजार रुपयांची रक्कम लुटल्याची घटना आज (शुक्रवार) सकाळी उघडकीस आली आहे. सुब ÷ तो सृष्टीचरण दास (वय 45 रा. सुंदरनगर) या भेळ विक्रेत्याचा अज्ञात व्यक्तीने खून करून, मृतदेह पुलाखाली टाकला होता. त्यांच्याजवळ 20 हजार रुपयांची रक्कम होती, अशी माहिती त्यांच्या पत्नीने दिली.

Saturday, January 14, 2012 AT 05:00 AM (IST)

 
नाशिक (nasik) - आज (रविवारी) दुपारी सुरगाणा तालुक्यात बोरगाव येथील शासकीय वसतिगृहात राहणाऱ्या 52 मुलींना विषबाधा झाल्याची घटना घडली. जेवणात मुगाच्या डाळीची आमटी आणि वाटाण्याची उसळ खाल्यानंतर या मुलींना मळमळ तसेच उलट्यांचा त्रास होऊ लागला. त्यानंतर 72 पैकी 52 मुलींना अधिक त्रास झाल्याने त्यांना सुरगाणा तसेच नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

Monday, January 09, 2012 AT 05:00 AM (IST)

 
नाशिक (nasik) - बलात्काराच्या दोन घटनांनी आज नाशिक शहर हादरले. शहरातील एका युवतीवर झालेला सामूहिक बलात्कार आणि अल्पवयीन मुलीवर एका वृद्धाने केलेला बलात्कार यामुळे नाशिककर सुन्न झाले आहेत. शहरामधील मखमलाबादजवळ राहणाऱ्या एका मुलीला रविवारी मध्यरात्री काही जणांनी पळवून नेले. त्यानंतर तवलेचा डोंगर आणि भूत बंगला परिसरात नेऊन तिच्यावर मध्यरात्री सामूहिक बलात्कार करण्यात आला.

Thursday, January 05, 2012 AT 05:00 AM (IST)

 
नाशिक (nasik) - जिल्हा परिषदेच्या शाळेत सकस आहार योजनेतून दिल्या जाणाऱ्या जेवणातून 22 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. नाशिक शहरातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना मंगळवारी दुपारी सकस आहार योजनेअंतर्गंत जेवण देण्यात आले. भात आणि भाजी खाल्यानंतर विद्यार्थ्यांना उलट्या आणि मळमळल्यासारखे होऊ लागले. 22 विद्यार्थ्यांना जास्त त्रास होऊ लागल्याने तातडीने नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

Thursday, November 17, 2011 AT 05:00 AM (IST)

 
नाशिक (nasik) - नाशिक जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांनी ऊस उत्पादकांना 2350 रुपयांची पहिली उचल द्यावी या मागणीसाठी, तसेच खासदार राजू शेट्टी यांनी चालविलेल्या उपोषणाला पाठिंबा दर्शविण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शेतकरी संघटना, तसेच राजकीय पक्षांच्या वतीने आज (शुक्रवार) ठिकठिकाणी आंदोलने, रास्ता रोको करून राज्य सरकारच्या धोरणाचा निषेध करण्यात आला. चांदोरी चौफुलीवर रास्ता रोको चांदोरी चौफुली (ता. निफाड) येथे रास्ता रोको करण्यात आला.

Saturday, November 12, 2011 AT 05:00 AM (IST)

 
नाशिक (nasik) - माणूस गेला की आप्तेष्ट येऊन जुन्या आठवणींना आपल्या हुंदक्यातून, अश्रूतून वाट करून देतात. माणसासाठी माणूस जमतो, अश्रू ढाळतो हे नवीन नाही. मात्र आपल्या भोवताली कधीकधी अशा काही घटना घडतात की त्या अगदी मनात घर करून राहतात. त्यातल्या काही खूपच हृदस्पर्शी असतात. मालेगाव तालुक्यातील चिंचगव्हाण गावातील हभप पंडित सोनू चौधरी (वय 76) यांचे 27 ऑक्टोबरला निधन झाले.

Wednesday, November 02, 2011 AT 05:00 AM (IST)

 
 
© Copyrights 2010 marathwadaneta.com - All rights reserved.
of
Powered By: