Last Update: 


 
पहिलं पान  >>  नांदेड
नांदेड (nanded) - तरोडा भागात नियमबाह्य प्लाटिंग करणाऱ्या पाच जणांविरुद्ध महापालिकेच्या तक्रारीवरून भाग्यनगर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. या पाच जणांनी भूखंडाच्या एका दिशेने वाहणाऱ्या नाल्यात सिमेंटचे खांब रोवून मुरूम भरल्याचे तसेच नैसर्गिक नाल्याचा प्रवाह बदलल्याचे निदर्शनास आले आहे. तरोडा (खु.) येथील मालेगाव रस्त्यावरील गजानन महाराज मंदिर कमानीच्या उत्तरेकडे नैसर्गिक नाला वाहतो.

Monday, February 06, 2012 AT 05:00 AM (IST)

 
नांदेड (nanded) - जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुक 2012 साठी उद्या मतदान पथके मतदान केंद्रावर रवाना होणार आहेत. यासाठी जिल्ह्यातील निवडणूक यंत्रणा सज्ज झालेली आहे. या निवडणूकीसाठी पोलीस बंदोबस्तच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी नांदेड डॉ. श्रीकर परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आज दिनांक 5.02.2012 रोजी दुपारी 3.00 वाजता बैठक पार पाडली.

Monday, February 06, 2012 AT 05:00 AM (IST)

 
नांदेड (nanded) - या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षेबाबत जागृती निर्माण व्हावी तसेच विद्यार्थ्यांना या परीक्षेची माहिती व्हावी या उद्देशाने जिल्हा प्रशासनाच्यावतीने दर महिन्याच्या 5 तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे युपीएससी व एमपीएससीचे राज्यातील विविध मान्यवरांच्या मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात येते.

Saturday, February 04, 2012 AT 05:00 AM (IST)

 
नांदेड (nanded) - तुती लागवड व रेशीम कोष उत्पादन योजनेअंतर्गत तुती लागवड करण्यास इच्छूक शेतकऱ्यांकडून सन 2012-13 च्या खरीप हंगामासाठी दिनांक 30 जून 2012 पर्यंत विहीत नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्जाचा नमुना व इतर माहिती रेशीम संचालनालयाची वेबसाईट ुुु.ारहरीळश्रज्ञ.र्सेीं.ळप वर तसेच जिल्हा रेशीम कार्यालयाकडे उपलब्ध आहे.

Saturday, February 04, 2012 AT 05:00 AM (IST)

 
नांदेड (nanded) - शिवसेना आणि राष्ट्रवादी ह ेदोन्ही पक्ष एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. सत्तेसाठी जातीयवादी पक्षांशी हात मिळविणी करणाऱ्या राष्ट्रवादीसह भाजप- सेनेला धडा शिकवून ग्रामीण भागात विकासाची गंगा पोहचविणाऱ्या कॉंग्रेसच्या सर्व उमेदवारांना विजयी करा असे आवाहन राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी आज हिमायतनगर येथे बोलतांना केले.

Saturday, February 04, 2012 AT 05:00 AM (IST)

 
नांदेड (nanded)  - जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीसाठी कॉंग्रेसने सुरुवातीपासून योग्य आणि चांगले नियोजन केले आहे. जिल्ह्यात सर्वत्र कॉंग्रेसला पोषक वातावरण आहे. त्यामुळे कॉंग्रेसला जिल्हापरिषद पंचायत समिती निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळेल. असा ठाम विश्वास खा. भास्करराव पाटील खतगावकर यांनी केला. पुढे बोलतांना खा. खतगांवकर म्हणाले की, आमच्यावर विरोधक जे कांही आरोप करित आहेत. त्याच्या मागील मुख्यसुत्रधार हे मोहन पाटील टाकळीकर आहेत.

Saturday, February 04, 2012 AT 05:00 AM (IST)

 
नांदेड  (nanded) -  वाहनांचा वापर जसा वाढतोय, तशी इंधनाची कमतरता जाणवत चालली आहे. येत्या दहा वर्षात इंधनाची वाहने वापरणाऱ्यांची संख्या सोन्याप्रमाणे वाढलेल्या महागाईमुळे मोजकीच राहील. तेलाचे साठेदेखील संपत चालले आहेत. तुम्ही सध्या मोटारीने फिरत आहात.

Saturday, February 04, 2012 AT 05:00 AM (IST)

 
नांदेड (nanded) - वाहनांचा वापर जसा वाढतोय, तशी इंधनाची कमतरता जाणवत चालली आहे. येत्या दहा वर्षात इंधनाची वाहने वापरणाऱ्यांची संख्या सोन्याप्रमाणे वाढलेल्या महागाईमुळे मोजकीच राहील. तेलाचे साठेदेखील संपत चालले आहेत. तुम्ही सध्या मोटारीने फिरत आहात.

Saturday, February 04, 2012 AT 05:00 AM (IST)

 
नांदेड  (nanded) - कॉंग्रेस पक्ष कोणासोबतही छुपी युती किंवा आघाडी करत नाही. जे करावयाचे आहे ते स्पष्ट व आमने-सामने भूमिका घेऊन करतो, आगामी काळात राज्यामध्ये कॉंग्रेसची लढाई आता राष्ट्रवादी सोबतच राहणार आहे. असे प्रतिपादन राज्याचे माजी मुख्यंमत्री अशोकराव चव्हाण यांनी केले.मुखेड मतदार संघातील कुरुळा जिल्हा परिषद व पंचायत समिती गणातील कॉंग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या जाहीर सभेत ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

Saturday, February 04, 2012 AT 05:00 AM (IST)

 
नांदेड (nanded)  - शिवाजीनगर भागातील डॉ. सुरेश हणमंते यांच्या मातोश्री शांताबाई यांचा खून करुन अज्ञात आरोपीने हातातील सोन्याच्या बांगड्या व घरातील सोन्याचे दागिणे चोरुन नेले. चोरीच्या उद्देशाने केलेला हा गुन्हा असे चित्र घटनास्थळावर दिसून आले असले तरी माहितीगार व्यक्तीने हा खून केला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. यावरुन शिवाजी नगर पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुध्द गुन्हा नोंदवला आहे. अधिक माहिती अशी की शिवाजीनगर भागात डॉ.

Saturday, February 04, 2012 AT 05:00 AM (IST)

 
 
© Copyrights 2010 marathwadaneta.com - All rights reserved.
of
Powered By: