Last Update: 


 
पहिलं पान  >>  मुंबई
मुंबई (mumbai) - लोकसभा, विधानसभा तसेच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतदाराची ओळख पटविण्यासाठी शिधापत्रिकेचा वापर करण्यास भारतीय निवडणूक आयोगाने व राज्य निवडणूक आयोगाने अनुमती दिली आहे. यासंदर्भात शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग ÷ ाहक संरक्षण विभागाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, दि. 5 जुन 2010 च्या परिपत्रकानुसार मतदारांना ओळख पटविण्यासाठी शिधापत्रिकेचा वापर करण्यास प्रतिबंध करण्यात आला होता.

Monday, February 06, 2012 AT 05:00 AM (IST)

 
मुंबई (mumbai) - मागील कित्येक वर्षापासून वादाचा विषय ठरत असलेल्या गणेशमूर्तीच्या उंचीबाबत शनिवारी अखेर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमधील गणेशमूर्ती 18 फूट उंचीपर्यंतच असाव्यात, असा ठराव करण्यात आला. बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती आणि मूर्तिकार संघ यांनी आयोजित केलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यंदाच्या गणेशोत्सवापासूनच या निर्णयाची अमलबजावणी होईल.

Monday, February 06, 2012 AT 05:00 AM (IST)

 
मुंबई (mumbai) - लंडनच्या मॅडम तुसाद संग्रहालयात बॉलीवुड अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या मेणाच्या प्रतिमाचे मार्चमध्ये अनावरण केले जाईल. लंडनच्या मॅडम तुसादमध्ये सात मार्चपासून धकधक गर्लची मेणाची प्रतिमा बॉलीवुडचे इतर कलावंताच्या प्रतिमांसोबत उभी असलेली दिसेल. माधुरीने टि्‌वटरवर लिहले की, मॅडम तुसादमध्ये सात मार्च 2012 ला प्रतिमेचे अनावरण होणार आहे. माधुरीची मेणाची प्रतिमा लावण्याची घोषणा यावर्षी जानेवारीच्या प्रारंभी करण्यात आली होती.

Monday, February 06, 2012 AT 05:00 AM (IST)

 
मुंबई (mumbai) - मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटमध्ये शनिवारी मध्यरात्री मोठ्या प्रमाणात आग लागली. आगीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. अग्निशामन दलाच्या जवानांमुळे आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. या आगीची माहिती मिळताच अग्निशामन दलाच्या जवानांनी घटनास्थळी येत आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश मिळविले आहे. मात्र, आगीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आग कोणत्या कारणामुळे लागली, याचे कारण समजू शकलेले नाही.

Monday, February 06, 2012 AT 05:00 AM (IST)

 
मुंबई (mumbai) - कॉंग्रेस सरचिटणीस राहुल गांधींचे भिक मागणाऱ्या वक्तव्यानंतर निर्माण झालेला वाद थांबलाही नव्हतो की, राहुल गांधीने अजुन एक वादग्रस्त वक्तव्य दिले. उत्तर प्रदेशाच्या सिद्धार्थनगरमध्ये राहुलने म्हटले की, महाराष्ट्रात शिवसेना यूपीवाल्यांना बुट मारते. राहुलच्या या वक्तव्यानंतर उत्तर प्रदेशापासून महाराष्ट्रापर्यंत खळबळ माजली. राहुल गांधीने सिद्धार्थनगरमध्ये म्हटले की, महाराष्ट्र व इतर प्रदेशात उत्तर प्रदेशाचे लोक मेहनतीचे काम करतात.

Monday, February 06, 2012 AT 05:00 AM (IST)

 
मुंबई (mumbai) - राज्यातील 27 जिल्हा परिषद आणि 309 पंचायत समितींच्या निवडणुकीच्या प्रचार तोफा आज थंडावणार आहेत. राज्यभरात सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर डागलेल्या टीकास्त्रामुळे प्रचारात रंगत आली होती. पण विकासाचे मुद्दे नेहमीप्रमाणे या वेळीही मागे पडले असल्याचे दिसत आहे. मतमोजणीची उत्सुकता लांबणीवर जिल्हा परिषदेची 8 फेब ÷ ुवारी रोजी होणारी मतमोजणी आता 17 फेब ÷ ुवारीला होणार आहे.

Monday, February 06, 2012 AT 05:00 AM (IST)

 
मुंबई (mumbai) - शिवाजी पार्कवर 13 ला कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यासाठी परवानगी मागणारा राज ठाकरे यांचा अर्ज उच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळला. महापालिका निवडणुकांच्या पार्श्र्वभुमीवर कार्यकर्त्यांच्या मेळाव्याच्या निमित्ताने सभा घेण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महापालिकेकडे परवानगी मागितली होती. मात्र निवडणूक काळातील सभांसाठी मैदान उपलब्ध नसल्याचे कारण देत पालिकेने परवागी नाकारली होती.

Saturday, February 04, 2012 AT 05:00 AM (IST)

 
मुंबई (mumbai) - शिवाजी पार्कवर 13 फेब ÷ ुवारीला कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यासाठी परवानगी मागणारा राज ठाकरे यांचा अर्ज उच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळला. महापालिका निवडणुकांच्या पार्श्र्वभुमीवर कार्यकर्त्यांच्या मेळाव्याच्या निमित्ताने सभा घेण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महापालिकेकडे परवानगी मागितली होती. मात्र निवडणूक काळातील सभांसाठी मैदान उपलब्ध नसल्याचे कारण देत पालिकेने परवागी नाकारली होती.

Saturday, February 04, 2012 AT 05:00 AM (IST)

 
मुंबई (mumbai) - "बांबू सिंफनी" हा निसर्गात गुंतणाऱ्या संजिताचे चित्रण करणारा माहितीपट मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवल 2012 (मिफ्फ) उद्घाटन प्रसंगी दाखविण्यात आला. "मुला पादूम रावू" या नावाने भारतीय लोक संगीताला एकत्र आणणारा उपक्रम त्रिशूर, केरळ येथील उन्नीकृष्णन पक्कानर यांनी स्थापन केला. संगीताचे मूळ निसर्गात आहे म्हणून कोणतीही कलाकृती ही पर्यावरण स्नेही असली पाहिजे या सूत्रावर हा चित्रपट आधारीत आहे.

Saturday, February 04, 2012 AT 05:00 AM (IST)

 
मुंबई  (mumbai) - सर्वोच्च न्यायालयाने दूरसंपर्क कंपन्यांना वाटण्यात आलेल्या टू-जी स्पेक्ट्रमसंबधी 122 परवाने रद्द केल्यामुळे संबंधीत कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या 25 हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या संकटात आल्या आहेत. स्पेक्ट्रम घोटाळ्या प्रकरणी न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे दूरसंपर्क कंपन्यांबरोबरच यामध्ये काम करणारे कर्मचाऱ्यापुढे संकट निर्माण झाले आहे. न्यायालयाने ट्रायला टू-जी स्पेक्ट्रम परवाना वाटपासाठी नवीन शिफारशी देण्यास सांगितले आहे.

Saturday, February 04, 2012 AT 05:00 AM (IST)

 
 
© Copyrights 2010 marathwadaneta.com - All rights reserved.
of
Powered By: