उल्हासनगर (ulahasnagar) - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ग ÷ ंथांचे संकलन करून त्यांचे खंड प्रसिद्ध करणारे डॉ. वसंत मून यांच्या कन्या अंजली साळवे यांना कॉंग ÷ ेसने पॅनल 35मधून उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या पॅनलमध्ये चुरस निर्माण झाली आहे. राज्य सरकारतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे लिखाण आणि त्यांची भाषणे 20 खंडांत प्रकाशित करण्यात आली आहेत. या खंडांचे संकलन आणि वर्गवारी करून त्यांचे संपादन करण्याचे मोठे काम डॉ. वसंत मून यांनी केले होते.
Monday, February 06, 2012 AT 05:00 AM (IST)
पोलादपूर (poladpur) - कोणताही विकास न करता केवळ जातीचे राजकारण करून विरोधकांनी मतदारांना फसविले आहे. त्यामुळे तालुक्यात सत्तापरिवर्तन निश्र्चित आहे असा दावा माजी आमदार कॉंग्रेस प्रदेश सरचिटणीस माणिकराव जगताप यांनी कापडे बुद्रुक येथे शेकापक्षाचे देवळे जि.प.उमेदवार दिनकर चांदे, गोवेले पं.स उमेदवार चंद्रकांत सणस आणि देवळे पं.स.उमेदवार प्राजक्ता सलागरे यांच्या प्रचारसभेत केला.
Monday, February 06, 2012 AT 05:00 AM (IST)
मुंबई (mumbai) - लोकसभा, विधानसभा तसेच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतदाराची ओळख पटविण्यासाठी शिधापत्रिकेचा वापर करण्यास भारतीय निवडणूक आयोगाने व राज्य निवडणूक आयोगाने अनुमती दिली आहे. यासंदर्भात शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग ÷ ाहक संरक्षण विभागाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, दि. 5 जुन 2010 च्या परिपत्रकानुसार मतदारांना ओळख पटविण्यासाठी शिधापत्रिकेचा वापर करण्यास प्रतिबंध करण्यात आला होता.
Monday, February 06, 2012 AT 05:00 AM (IST)
मुंबई (mumbai) - मागील कित्येक वर्षापासून वादाचा विषय ठरत असलेल्या गणेशमूर्तीच्या उंचीबाबत शनिवारी अखेर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमधील गणेशमूर्ती 18 फूट उंचीपर्यंतच असाव्यात, असा ठराव करण्यात आला. बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती आणि मूर्तिकार संघ यांनी आयोजित केलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यंदाच्या गणेशोत्सवापासूनच या निर्णयाची अमलबजावणी होईल.
Monday, February 06, 2012 AT 05:00 AM (IST)
पुणे (pune) - तमिळ चित्रपट आणि जाहिरात क्षेत्रातील एका प्रसिद्ध अभिनेत्रीला आणि तिच्या व्यवस्थापकाला वेश्याव्यवसाय करताना पुण्यातील एका पंचतारांकित हॉटेलात पोलिसांनी रंगेहात ताब्यात घेतले आहे. अभिनेत्री कॅरोलिन मारिया असान (वय-22, रा.सईदापेठ, चेन्नई) आणि तिचा व्यवस्थापक एम. राजकुमार (वय-32) याला पुणे पोलिसांनी विमान नगरातील एका पंचतारांकित हॉटेलमधून अटक केले. कॅरोलिन असानने 'रेन', 'वादा चेल्लन' अशा तमिळ चित्रपटांमध्ये काम केले आहे.
Monday, February 06, 2012 AT 05:00 AM (IST)
चाळीसगाव (chalisgaon) - चाळीसगाव-धुळे रस्त्यावर दसेगाव फाट्याजवळ रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास ट्रक आणि ट्रॅक्टरमध्ये झालेल्या अपघातात दोन जण ठार आणि तिघे जण जखमी झाले. चाळीसगाव तालुक्यातील करगाव तांडा येथून ट्रॅक्टरचा चालक कैलास चव्हाण आणि विनोद चव्हाण, प्रवीण बाबूराव चव्हाण व सागर चव्हाण हे चाळीसगावकडे येत होते. त्यावेळी दसेगाव फाट्याजवळ समोरून येणाऱ्या ट्रकने ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली.
Monday, February 06, 2012 AT 05:00 AM (IST)
मालेगाव (malegaon) - मुस्लिम बांधवांची हजरत मोहम्मद पैगंबर साहेब यांचा जन्मदिवस (ईद-ए-मिलाद)ची मिरवणूक आज मोठ्या उत्साहात संपन्न झाली. ईद-ए-मिलादच्या मिरवणूकीला दोन दिवसापूर्वी विरोध दर्शविणारे पत्रक शहरातील पूर्व भागात वाटण्यात आल्याने तणाव पसरला होता. त्यामुळे मुस्लिम बांधवाच्या दोन समाजात तेढ निर्माण झाली होती. पोलिसांनी सावधगिरी बाळगत पत्रके वाटणाऱ्यांना ताब्यात घेतले आहेत. यामुळे आजच्या मिरवणुकीवरील तणावाचे सावट मावळले आहे.
Monday, February 06, 2012 AT 05:00 AM (IST)
मुंबई (mumbai) - लंडनच्या मॅडम तुसाद संग्रहालयात बॉलीवुड अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या मेणाच्या प्रतिमाचे मार्चमध्ये अनावरण केले जाईल. लंडनच्या मॅडम तुसादमध्ये सात मार्चपासून धकधक गर्लची मेणाची प्रतिमा बॉलीवुडचे इतर कलावंताच्या प्रतिमांसोबत उभी असलेली दिसेल. माधुरीने टि्वटरवर लिहले की, मॅडम तुसादमध्ये सात मार्च 2012 ला प्रतिमेचे अनावरण होणार आहे. माधुरीची मेणाची प्रतिमा लावण्याची घोषणा यावर्षी जानेवारीच्या प्रारंभी करण्यात आली होती.
Monday, February 06, 2012 AT 05:00 AM (IST)
मुंबई (mumbai) - मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटमध्ये शनिवारी मध्यरात्री मोठ्या प्रमाणात आग लागली. आगीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. अग्निशामन दलाच्या जवानांमुळे आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. या आगीची माहिती मिळताच अग्निशामन दलाच्या जवानांनी घटनास्थळी येत आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश मिळविले आहे. मात्र, आगीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आग कोणत्या कारणामुळे लागली, याचे कारण समजू शकलेले नाही.
Monday, February 06, 2012 AT 05:00 AM (IST)
बुलडाणा (buldhana) - बुलडाणा जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणूक दिनांक 7 फेब ÷ ुवारी 2012 रोजी झालेल्या मतदानाची मतमोजनी दिनांक 8 फेब ÷ ुवारी 2012 ऐवजी 17 फेब ÷ ुवारी 2012 रोजी सकाळी 10 वाजेपासून होणार आहे. याची सर्व नागरीकांनी नोंद घ्यावा असे जिल्हाधिकारी बी.जी. वाघ यांनी कळविले आहे.
Monday, February 06, 2012 AT 05:00 AM (IST)
|
|
|
|