Last Update: 


 
पहिलं पान  >>  लातूर
औराद  (aurad) - न.प. प्रमाणे जि.प. वर पंचायत समितीच्या निवडणुकीत कॉंग्रेसच्या उमेदवारांना विजयी करा, तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी मी वचनबद्ध आहे, अशी ग्वाही औराद येथील जाहीर सभेत माजी मुख्यमंत्री आ.डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी दिली. यावेळा व्यासपीठावर आ. बसवराज पाटील, ऍड. व्यंकटराव बेद्रे, मोहन माने, जि.प. उमेदवार अशोकराव पाटील निलंगेकर, डॉ. शरद पाटील निलंगेकर, सुनिल माने हे होते. अध्यक्षस्थानी नाईकवाडे होते.

Monday, February 06, 2012 AT 05:00 AM (IST)

 
लातूर  (latur) - दि लातूर क्लबचे अध्यक्ष आ. अमित देशमुख यांच्या दूरदृष्टीतून यशस्वीरित्या सादर होत असलेल्या लातूर फेस्टिव्हल 2012 च्या अंतर्गत रंगधारा आर्ट गॅलरीचे आयोजन करण्यात आले आहे.

Monday, February 06, 2012 AT 05:00 AM (IST)

 
आशिव  (asiv) - औसा तालुक्याच्या विकासाचा अनुशेष दूर करण्यासाठी कॉंग्रेस पक्षाला जि.प. आणि पं.स. समिती निवडणुकीत विजयी करा कारण प्रादेशिक पक्ष हे सर्व जातीधर्म व घटकांना घेऊन चालण्यास कमी पडत आहेत. असा आरेाप करून येणाऱ्या काळात औसा तालुक्याच्या विकासाचा वेग वाढविण्यासाठी कॉंग्रेसच्या उमेदवारांना विजयी करावे असे आवाहन माजी मंत्री आ. बस्वराज पाटील यांनी आशिव, अलमला, बुधोडा येथील जाहीर सभेत बोलताना केले.

Monday, February 06, 2012 AT 05:00 AM (IST)

 
रबर स्टॅम्प आमदार, महागाई, भ्रष्टाचार विरोधातील चिड मतपेटीतून व्यक्त करा रेणापूर  (renapur) - मी उमेदवार समजून रेणापूर तालुक्यातील भाजपाच्या 4 जि.प. उमेदवार व 8 पं.स. च्या उमेदवारांना विजयी करा व रेणापूर रबर स्टॅम्प आमदार, महागाई व भ्रष्टाचाराविरूध्दची चिड मतपेटीतून व्यक्त करा, असे आवाहन भाजपाचे नेते खा. गोपीनाथराव मुंडे यांनी केले. रेणापूर तालुक्यातील भाजपाच्या जि.प. व पं.स. उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित विराट सभेत ते बोलत होते.

Monday, February 06, 2012 AT 05:00 AM (IST)

 
रेणापूर  (renapur) - खा. गोपीनाथरावजी मुंडे यांची जाहीर सभा खूपच चांगली झाली. व उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून आजपर्यंत सर्वत्र रेणापूर तालुक्यात एक भाजपमय वातावरण असून आजच्या सभेने चार जि.प. सदस्य व आठ पंचायत समितीच्या सदस्यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाला अशी प्रतिक्रिया दै. मराठवाडा नेताशी बोलतांना रमेशअप्पा कराड यांनी दिली. रेणापूर तालुका हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या भागातील लोकांचे आणि खा.

Monday, February 06, 2012 AT 05:00 AM (IST)

 
लातूर  (latur) - दिनांक 9 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या लातूर फेस्टीव्हल अंतर्गत भव्य सायकल स्पर्धेच आयोजन करण्यात आले आहे. सदरील सायकल स्पर्धा 9 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजता सुरु होणार आहे. या स्पर्धेसाठी वयोगट मर्यादा 12 ते 30 ठेवण्यात आली आहे. सायकल स्पर्धेचा शुभारंभ नवीन रेणापूर नाका येथून होणार आहे. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक रुपये दहा हजार रुपये, द्वितीय पारितोषिक 7 हजार रुपये, तसेच तृतीय पारितोषिक रुपये पाच हजार रोख ठेवण्यात आले आहे.

Monday, February 06, 2012 AT 05:00 AM (IST)

 
लातूर  (latur) - लातूर येथे रविवार दि. 12 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या लातूर फेस्टीव्हल अंतर्गत भव्य श्र्वान प्रदर्शन (डॉग शो) चे आयोजन करण्यात आले असून दुपारी 1 वाजता टाऊन हॉलच्या मैदानावर होणार आहे. या कार्यक्रमात तज्ञ परिक्षकाकडून बक्षीसपात्र श्र्वानांची निवड होणार असून उत्कृष्ट स्मृतीचिन्ह देऊन श्र्वान मालकाचा गौरव करण्यात येणार आहे. तसेच जातीवंत जातीच्या श्र्वानाचे संगोपन-संवर्धन करणाऱ्या श्र्वास पालकाचा सत्कार करण्यात येणार आहे.

Monday, February 06, 2012 AT 05:00 AM (IST)

 
गाधवड (gadwad) - 1995 मध्ये मातोश्रीवर आमदारकीसाठी लोटांगण घालणाऱ्यांनी आम्हाला असंतुष्ट गटाचा पक्ष म्हणणे अगोदर आत्मचिंतन करावे, आम्हाला बोलत असतांना स्वत: राष्ट्रीय नेते म्हणून घ्यायचं आणि मतदारसंघातच घुटमळत राहायचं त्यांनी अगोदर राष्ट्रीय नेत्यासारखं वागावं असं सांगून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा म्हणाले की, आम्ही फिक्सींगच राजकारण करुन कार्यकर्त्यांना उद्धवस्त करत नाही. आम्ही पक्षाच्या कार्यकर्त्याला पूर्ण ताकतीनिशी साथ देतोत.

Sunday, February 05, 2012 AT 05:00 AM (IST)

 
रेणापूर  (renapur) - भाजपाचे जेष्ठ नेते, रेणापूरचे माजी आमदार खा. गोपीनाथरावजी मुंडे यांची आज रेणापूर येथे रेणापूर तालुक्यातील रेणापूर, खरोळा, पोहरेगाव व पानगाव जि.प. व पं.स. निवडणुकीच्या प्रचाराची सभा दुपारी 1 वाजता वा. होणार असून सर्वत्र भाजपमय वातावरण असून 4 जि.प. व 8 पं.स. च्या भाजपाच्या विजयावर शिक्कामोर्तब होणार अशा प्रकारचा अंदाज रेणापूर तालुक्यातील ठिकठिकाच्या आमच्या प्रतिनिधीने व्यक्त केलं आहे.

Sunday, February 05, 2012 AT 05:00 AM (IST)

 
काडगाव  (kadgaon) - सरड्याप्रमाणे पक्ष बदलणाऱ्या उमेदवारांना मतदार धडा शिकवतील असा विश्वास भाजपा लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघाचे प्रभारी रमेशअप्पा कराड यांनी काडगाव येथे जि.प. व पं.स. निवडणुकीच्या प्रचारार्थ सभेत बोलताना व्यक्त केले. यावेळी ऍड. बळवंत जाधव, सुधीर धुत्तेकर हे उपस्थित होते.

Sunday, February 05, 2012 AT 05:00 AM (IST)

 
 
© Copyrights 2010 marathwadaneta.com - All rights reserved.
of
Powered By: