नवी दिल्ली (new delhi) - आपल्या शैलीदार आणि तडाखेबाज फलंदाजीने क्रिकेट चाहत्यांची मने जिंकणारा युवराज सिंग याला कॅन्सर झाला असून सध्या तो अमेरिकेत उपचार घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे. युवराजचे फिजिओथेरपिस्ट डॉ. जतिन चौधरी यांनीच ही माहिती दिली. 26 जानेवारी रोजी युवराज उपचारासाठी अमेरिकेत रवाना झाला असल्याचे चौधरी यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. साहजिकच युवराजचा आजार गंभीर असू शकतो, या शंकेला त्यामुळे दुजोरा मिळाला आहे.
Monday, February 06, 2012 AT 05:00 AM (IST)
हॉंगकॉंग (hongkong) - आपल्या यशस्वी कामगिरीच्या जोरावर अनेक चाहते निर्माण करणारा शतायु बि ÷ टिश भारतीय ऍथलीटपटू फौजासिंगने हॉंगकॉंगच्या रहिवाशांनाही चकीत करीत आज येथे 10 किलोमीटरची शर्यत पूर्ण केली. "टर्बन्ड तारपीडो" या नावाने प्रसिद्ध असलेल्या फौजा सिंगने सुमारे एक तास आणि 34 मिनिटात हॉंगकॉंग मॅराथन पूर्ण केल्यानंतर सांगितले की, , ""मोसम खूप चांगला होता. मी शर्यतीचा आनंद लुटला.
Monday, February 06, 2012 AT 05:00 AM (IST)
मेलबर्न (melbarn) - फलंदाजांनी नांगी टाकल्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात भारताचा 65 धावांनी पराभव झाला. या पराभवामुळे भारत, ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यादरम्यान सुरु झालेल्या तिरंगी मालिकेतही भारताची पराभवानेच सुरुवात झाली आहे. धडाकेबाज फलंदाजी करणाऱ्या मॅथ्यू वेडला पदार्पणातच 'सामनावीर'च्या पुरस्काराने गौरविण्यात आले.
Monday, February 06, 2012 AT 05:00 AM (IST)
मुंबई (mumbai) - मुंबईचा युवा टेनिसपटू आर्यन गोवियास याला पुढील महिन्यात फिलीपींसच्या मनिला येथे दोन आठवडे चालणाऱ्या आयटीएफ 14 व अंडर गुप एक टेनिस चॅम्पियनशिपसाठी भारताच्या 14 वर्षाखालील संघात निवडण्यात आले आहे. आर्यनने सीनियर गटात किताब जिंकून संघातील आपले स्थान निश्चित केले. या गैरमानांकित खेळाडूने तीन फेब ÷ ुवारी रोजी औरंगाबाद येथे एआयटीए टॅलेंट सीरीज टेनिस स्पर्धेत मुलांच्या 18 वर्षाखालील एकेरीत कर्नाटकच्या बी.एस.
Monday, February 06, 2012 AT 05:00 AM (IST)
नवी दिल्ली (new delhi) - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाबरोबर (बीसीसीआय) झालेल्या वादामुळे भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रायोजक असलेल्या 'सहारा' इंडिया कंपनीने प्रायोजकत्व काढून घेण्याचा निर्णय घेतला असून आयपीएलमधील पुणे वॉरियर्स संघाची मालकी रद्द करण्याचा निर्णयही घेतला आहे. इंडियन प्रिमियर लीगच्या (आयपीएल) पाचव्या मोसमासाठी युवराज सिंगच्या ऐवजी दुसरा खेळाडू मिळावा, ही मागणी सहाराने केली होती.
Sunday, February 05, 2012 AT 05:00 AM (IST)
मेलबर्न (melbarn) - ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा कर्णधार माइकल क्लार्कने आज येथे म्हटले की, त्याचा संघ उद्या येथे सुरू होणाऱ्या त्रिकोणीय मालिका जिंकण्याचा प्रमुख दावेदार आहे परंतु त्याने स्वीकारले की, हे ध्येय प्राप्त करण्यासाठी त्याला आपले सर्वोत्तम प्रदर्शन करावे लागेल. एकदिवसीय मालिकेच्या पूर्व संध्येवर क्लार्कने म्हटले, "आम्हाला भारत व श्रीलंका दोन्ही संघाला पराभुत करण्यासाठी आपले सर्वोत्तम प्रदर्शन करावे लागेल.
Sunday, February 05, 2012 AT 05:00 AM (IST)
दुबई (dubai) - जागतिक एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय फलंदाज विराट कोहलीने तिसरे स्थान मिळविले आहे. तर कर्णधार महेंद्रसिंह धोनी पाचव्या स्थानावर आहे. कोहलीच्या कारकिर्दीतील ही सर्वोत्तम क्रमवारी आहे. आज (शनिवार)आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) प्रसिद्ध केलेल्या आकडेवाडीनुसार पहिल्या दहा गोलंदाजांमध्ये एकही भारतीय गोलंदाजाचा समावेश नाही. गोलंदाजांमध्ये श्रीलंकेचा लसिथ मलिंगा पहिल्या स्थानावर आहे.
Sunday, February 05, 2012 AT 05:00 AM (IST)
मुंबई (mumbai) - 'कोलावरी डी'च्या अभुतपूर्व यशानंतर अभिनेता-गायक धनुष याचे नवीन गाणे लवकरच येत आहे. विशेष म्हणजे हे गीत त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला समर्पित केले आहे. 'यु आर अवर बुस्ट...!' असे या गाण्याचे बोल आहेत. धनुष याला गेल्या काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध शक्तिवर्धक पेय 'बुस्ट' कंपनीकडून प्रस्ताव मिळाला होता. 'बुस्ट' या पेयासाठी त्याने गाणे तयार करावे, अशी कंपनीची डीमांड होती.
Sunday, February 05, 2012 AT 05:00 AM (IST)
बंगळुरू (bengloor) - अनुभवी अंजुम चोप्रा भारताच्या 15 सदस्यीय महिला क्रिकेट संघाचे नेतृत्व करणार आहे. भारत 18 फेब ÷ ुवारीपासून वेस्टइंडीजमध्ये ट्वेंटी-20 आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. अंजुम चोप्राला झूलन गोस्वामीच्या स्थानी कर्णधार करण्यात आले असून मिताली राज उपकर्णधार आहे. भारतीय महिला संघ येथे पाच टी20 आणि तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. कर्णधार पद गमावल्यानंतरही झूलन संघात कायम आहे.
Sunday, February 05, 2012 AT 05:00 AM (IST)
मेलबर्न (melbarn) - भारतीय फलंदाज सुरेश रैनाचे मत आहे की, ऑस्ट्रेलियाविरूद्ध काल ट्वेंटी-20 सामना जिंकल्यामुळे भारताचे मनोबल वाढलेले आहे व आता टीम इंडिया उद्यापासून सुरू होणाऱ्या एकदिवसीय त्रिकोणीय मालिकेत चांगले प्रदर्शन करण्यासाठी उत्साहित आहे. त्रिकोणीय मालिकेत भारत व ऑस्ट्रेलियाच्या व्यतिरिक्त श्रीलंकेचा संघ भाग घेईल. रैनाने म्हटले, "संघाचे मनोबल वाढलेले आहे. प्रत्येक तरूण सध्या त्रिकोणीय मालिकेकडे पाहत आहे.
Sunday, February 05, 2012 AT 05:00 AM (IST)
|
|
|
|