Last Update: 


 
पहिलं पान  >>  कोकण
रत्नागिरी (ratnagiri) - दोन दुचाकींची समोरा समोर टक्कर झाल्यानंतर एक दुचाकी समोरुन येणा-या डंपरवर आदळल्याने झालेल्या अपघातात दोनजण जागेवरच ठार तर दोन जण जखमी झाले आहेत. खेड-मंडणगड मार्गावरील चिंचघर गावाजवळ मंगळवारी हा अपघात झाला. खेड येथील कामे उरकून मंडणगड कडे निघालेले प्रदीप रक्ते आणि संतोष चव्हाण हे दोघे या अपघातात ठार झाले. हे दोघे दुचाकीने खेडला आले होते.

Thursday, January 12, 2012 AT 05:00 AM (IST)

 
रत्नागिरी (ratnagiri) - रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीच्या किनाऱ्यावर संशयस्पदरित्या उतरलेल्या हेलिकॉप्टरचा फोटो काढून जगरुकता दाखवल्याबद्दल वाजिद खान या तरुणाला तब्बल 10 लाखांचे बक्षीस जाहीर झाले आहे. राज्याचे गृहमंत्री आर आर पाटील यांनी या संदर्भात घोषणा केली आहे. याआधी पोलिसांनी 10 हजारांचे बक्षिस देऊन त्याचा सन्मान केला होता. वाजिद खानने जर या हेलिकॉप्टरचा फोटो काढला नसता तर या हेलिकॉप्टरचे गूढ कायम राहिले असते.

Tuesday, October 11, 2011 AT 05:00 AM (IST)

 
रत्नागिरी (ratnagiri) - जिल्ह्यातील दापोलीजवळच्या हर्णे गावात शनिवारी संध्याकाळी एक हेलिकॉप्टर उतरले. या हेलिकॉप्टरची छायचित्र घेणाऱ्या वाजिद खानला त्याच्या सतर्कतेबद्दल 10 हजारांचे बक्षिस देण्यात आले आहे. हेलिकॉप्टरमधून उतरलेली लोक संशयास्पद दिसून आली होती. छोट्याशा हर्णे गावात हेलिकॉप्टरने संशयास्पदरित्या उतरलेल्या व्यक्तींची माहिती मिळून आली असल्याचे सांगण्यात येत आहे. या लोकांचा कोस्टगार्डच्या मदतीने शोध घेण्यात आला.

Monday, October 10, 2011 AT 05:00 AM (IST)

 
रत्नागिरी (ratngiri) - दापोली तालुक्यातील हर्णे-पाळंदे किनाऱ्यावर शनिवारी साडेचारच्या सुमारास ग्लोबल व्हेस्ट्रा या कंपनीचे एक हेलिकॉप्टर अचानक उतरल्याने एकच गोंधळ निर्माण झाला. पांढऱ्या रंगाच्या हेलिकॉप्टरमधून उतरलेल्या दोन व्यक्तींनी परिसराची पाहणी केल्याचे स्थानिकांनी सांगितले. काही छायाचित्रे काढल्यानंतर हे हेलिकॉप्टर दहा मिनिटांतच परिसरातून उडाले होते.

Monday, October 10, 2011 AT 05:00 AM (IST)

 
रत्नागिरी (rtanagiri) - कोकण रेल्वे तब्बल 4 दिवसांनी पुन्हा एकदा तात्पुरती सुर करण्यात यश आले आहे. कारण पोमेंडीच्या ट्रॅकवर आलेली माती, चिखल आणि पाणी हटवण्यात यश आले आहे. पण याचा अर्थ कोकण रेल्वे सुरळीत झाला असा मात्र नाहीये. फक्त मुंबईकडे येणारी मत्सगंधा आणि गोव्याकडे जाणारी मत्सगंधा पोमेंडी रेल्वे ट्रॅकवरुन रवाना झाल्याहेत. दरम्यान रेल्वे सेवा सुरळीत करण्यासाठी दोन तासांचा मेगाब्लॉक जारी करण्यात आला आहे.

Monday, September 05, 2011 AT 05:00 AM (IST)

 
रत्नागिरी (ratnagiri) - मुंबई-गोवा हायवे पूर्णपणे ठप्प झाला आहे. कशेडी घाटात पहाटे चारच्या सुमारास दरड कोसळल्याने वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. हायवे ठप्प झाल्याने कोकणवासियांच्या मार्गात अडथळ्यांची शर्यत सुरु झाली आहे. त्याआधी पेण जवळच्या वडखळ नाक्यावर ट्रेलर उलटल्याने काहीकाळ वाहतूक ठप्प होती. पण आता दरडी कोसळल्या ही वाहतूकही बंद झाली आहे. दरम्यान महामार्ग पोलिसांनी ही वाहतूक महाडच्या नातूनगरहून वळवल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.

Monday, September 05, 2011 AT 05:00 AM (IST)

 
रत्नागिरी (ratnagiri) - पोमेंडीजवळ रुळावर माती आणि चिखल साचून राहील्याने कोकण रेल्वेची वाहतूक शुक्रवारी पुन्हा ठप्प झाली आहे. त्यामुळे कोकण रेल्वेमागे लागलेले विघ्न संपता संपेना अशी परिस्थीती निर्माण झालेली आहे. दोनच दिवसांपूर्वी पोमेंडीजवळ संरक्षक भिंत कोसळल्याने रेल्वे वाहतूक काही काळ ठप्प होती. यामुळे गणेशोत्सवसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमानी रेल्वेतच आडकले होता. त्यामुळे कोकण रेल्वेच्या मार्गातील विघ्न काही केल्या कमी होत नाही.

Saturday, September 03, 2011 AT 05:00 AM (IST)

 
रत्नागिरी (ratnagiri) - रत्नागिरीजवळील पोमेंडी येथे संरक्षक भिंत कोसळल्याने कोकण रेल्वे ठप्प झाली आहे. मंगळवारी पहाटेच्या सुमारास संरक्षक भिंत कोसळून माती आणि दगड मोठ्या प्रमाणात ट्रॅकवर जमल्याने येथील ट्रॅकवर दोन फूट पाणी साचले आहे. पोमेंडीजवळ संरक्षक भिंत कोसळण्याची वर्षातील ही तिसरी वेळ आहे. सायंकाळपर्यंत कोकण रेल्वेची वाहतूक पूर्ववत होईल असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Wednesday, August 31, 2011 AT 05:00 AM (IST)

 
रत्नागिरी (rathngiri) - अण्णा हजारे कृती समितीच्या मशाल फेरीला दोन दिवसांपूर्वी अभूतपूर्व प्रतिसाद मिळाल्यानंतर आता बुधवारपासून (ता. 24) साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सक्षम जन लोकपाल विधेयक जोपर्यंत मंजूर होत नाही तोपर्यंत साखळी उपोषण केले जाणार असल्याची माहिती कृती समितीचे अभिजित हेगशेट्ये यांनी पत्रकारांना दिली. अण्णा हजारे कृती समितीला जिल्ह्यातून प्रतिसाद मिळत आहे.

Wednesday, August 24, 2011 AT 05:00 AM (IST)

 
रत्नागिरी (ratnagiri) - हरिहरेश्र्वर येथे धार्मिक कार्यासाठी आलेले पुणे आणि निगडी येथील दोन तरुण मंदिराच्या पाठीमागील समुद्रात बुडाल्याची घटना रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध सुरू होता. भूषण पुराणिक (27, रा. निगडी, पुणे) आणि गोपाल सिंग राजपूत (26, रा. चिखली, पुणे) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्यासोबत आणखी दोघे जण होते.

Monday, August 08, 2011 AT 05:00 AM (IST)

 
 
© Copyrights 2010 marathwadaneta.com - All rights reserved.
of
Powered By: