जालना (jalna) - चौपदरी रस्त्यांच्या बांधकामाबाबत मराठवाड्यावर मोठा अन्याय झाला असून यासंदर्भात आपण संसदेत आवाज उठविणार असल्याची माहिती संसदेतील विरोधी पक्षउपनेते आणि भाजपचे वरिष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी आज (मंगळवार) दिली. जालना जिल्ह्यातील अंबड येथे झालेल्या दुर्घटनेत 11 वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर संतप्त जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोन ठार तर चार जखमी झाले.
Wednesday, July 27, 2011 AT 05:00 AM (IST)
जालना (jalna) - जालन्यातील पारनेर फाट्यावर झालेल्या भीषण अपघातानंतर अंबड शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सोमवारी झालेल्या अपघातात 14 वारकऱ्यांचा मृत्यू आणि पोलिसांच्या गोळीबारात दोन जणांचा बळी गेला होता. या घटनांच्या पार्श्र्वभूमीवर खबरदारीसाठी पोलिसांनी संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे.
Wednesday, July 27, 2011 AT 05:00 AM (IST)
जालना    : जालना जिल्ह्यातील अंबड-बीड मार्गावरील पारनेर फाटा येथे भरधाव वेगातील कंटेनर गजानन महाराजांच्या दिंडीत शिरून झालेल्या भीषण अपघातामध्ये 16 वारकरी तर कंटेनर अडवण्यासाठी गेलेला एक ग ÷ ामस्थ जागीच ठार झाले. या अपघातामध्ये अनेक जण जखमी असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. अपघातानंतर संतप्त जमावाने कंटेनर पेटवून दिला असून चालक फरार झाला आहे.
Tuesday, July 26, 2011 AT 05:00 AM (IST)
जालना (jalna) - जालना जिल्ह्यातील तालुकास्तरावरील विविध समित्या पालकमंत्री राजेश टोपे यांनी जाहिर केल्या असून या समित्यांचे नियुक्त अध्यक्ष आणि सदस्य खालीलप्रमाणे आहेत. सदर सर्व समित्या या बदनापूर तालुक्यातील आहेत. संजय गांधी निराधार योजना :- कैलास मदन रा. केळीगव्हाण अध्यक्ष, अ.जा-अ.ज. सदस्य मनोहर रत्नपारखे-रा. बावनेपांगरी, महिला अशासकीय प्रतिनिधी गणी भिकन पटेल-रा.
Friday, May 20, 2011 AT 05:00 AM (IST)
जालना (jalna) - सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सकारात्मकदृष्टीने काम करावे, असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी अंबड येथे केले. जालना जिल्ह्यातील अंबड तहसील कार्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन टोपे यांच्या हस्ते झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक"माच्या अध्यक्षस्थानी विभागीय आयुक्त भास्कर मुंढे होते.
Tuesday, May 10, 2011 AT 05:00 AM (IST)
जालना (jalna) - गावाचा विकास होण्यासाठी गावाला जोडणारे रस्ते असणे महत्वाचे आहेत, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी केले. जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील हिवरा रोषणगाव येथे 80.63 लाख रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरण कामाचे भूमिपुजन प्रसंगी ते बोलत होते. टोपे म्हणाले की, गावाचा विकास करावयाचा असेल तर गावाला जोडणारे दळणवळणाचे साधन असले पाहिजेत.
Friday, March 04, 2011 AT 05:00 AM (IST)
जालना (jalna) - आपल्या वादगस्त विधानाने प्रसिद्ध झालेल्या अजित दादांच्या निषेधार्थ आज ठिकठिकाणी पत्रकारांनी निषेध मोर्चे काढून आपला रोष व्यक्त केला. जालना जिल्ह्यातील पत्रकारांनी ही तोंडावर काळ्या फिती लावत दंडुकेशाहीची भाषा करणाऱ्या उपमुख्यमंत्र्यांच्या निषेध म्हणून दंडुके घेऊनच मोर्चा काढला. हाती दंडुके घेत शहरातील गांधी चमन भागातून निघालेला हा मोर्चा थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला.
Thursday, February 17, 2011 AT 05:00 AM (IST)
जालना (jalna) - मंठा येथील गामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्याचा मृतदेह शुक्रवारी सकाळी छल्लानी वसाहत परिसरातील विहीरीत सापडला.डॉ.अनिल शंकरराव वेव्हाळ (27वर्षे) असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. वेव्हाळ यांच्या मृत्युमागचे कारण अद्याप समजू शकले नाही.पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्युची नोंद केली आहे. याबाबत अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
Saturday, February 12, 2011 AT 05:00 AM (IST)
जालना (jalna) - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे)अध्यक्ष राज ठाकरे यांना पाच वेगवेगळ्या घटनांत दाखल झालेल्या गुन्ह्यांबाबत येथील प्रथमवर्ग न्यायालयाने आज (बुधवार) वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. मनसेच्या कार्यकर्त्यांनी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले होते. या घटनेनंतर 2009 मध्ये राज ठाकरे यांनी अटक झाली होती. आज झालेल्या याचिकेवर येथील न्यायालयात साडेसात हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.
Thursday, February 10, 2011 AT 05:00 AM (IST)
जालना (jalna) - जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातल्या राजा टाकळी गावात यमाजी माने या व्यक्तीनं आपल्या तीन चिमुकल्यांसह विहीरीत उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. भैय्या माने (वय 6), आबा माने (वय साडेचार), करण माने (वय 3) अशी या चिमुकल्यांची नावे आहेत. यमाजी माने हा कालपासून आपल्या तीन मुलांसह बेपत्ता होता. त्यासंदर्भातील तक्रारही त्याच्या पत्नीनं पोलिसात दिली होती.
Thursday, February 03, 2011 AT 05:00 AM (IST)
|
|
|
|