हिंगोली (hingoli) - शनिवारी रात्री काही चोरट्यांनी शहरातील जुन्या पोलिस वसाहतीत पोलिस उपनिरिक्षकाचे घर फोडून सर्व्हिस रिव्हॉल्व्हर व दहा जिवंत काडतुसे पळविल्याची घटना उघडकीस आली. रिव्हॉल्व्हर चोरी करणाऱ्या टोळीतील तिघांना आज (रविवार) सकाळी पकडण्यात आले असून, रिव्हॉल्व्हर आणि काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. जुन्या पोलिस वसाहतीमध्ये हिंगोलीमधील वाचक शाखेत कार्यरत असलेले उपनिरीक्षक रमाकांत नागरगोजे यांचे घर आहे.
Monday, January 30, 2012 AT 05:00 AM (IST)
हिंगोली (hingoli) - आखाडा-बळापूर ते बोलडा मार्गावर भरधाव ऑॅटोरिक्षा उलटून झालेल्या अपघातात तीन ठार, तर तीन जण जखमी झाले. गुरुवारी मध्यरात्री हा अपघात घडला. वंदना बाळू सोनटक्के (वय 23), शुभम बाळू सोनटक्के (वय 2 वर्षे), सुरेश देवरा राऊत (वय 19) असे अपघातात मरण पावलेल्यांची नावे आहेत. तर, जखमींमध्ये चालक बाळू सोनटक्के याच्यासह ध ÷ ुपदाबाई सोनटक्के आणि ज्ञानेश्वर सोनटक्के यांचा समावेश आहे. त्यांच्यावर नांदेड शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Saturday, January 14, 2012 AT 05:00 AM (IST)
हिंगोली (hingoli) - अण्णा हजारे यांनी जनलोकपाल विधेयकासाठी पुकारलेल्या उपोषणाला देशातील विविध स्तरातून पाठींबा मिळत आहे. जनता वेगवेगळ्या मार्गाने अण्णांना पाठिंबा देत आहे. अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यातील हिंगोली येथे अग ÷ वाल सेवा दलाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या रक्तदान शिबिरात महिलांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान केले.
Sunday, August 28, 2011 AT 05:00 AM (IST)
हिंगोली (hingoli) - येथील विशेष लेखापरीक्षक कार्यालयातील उपलेखापरीक्षकाला 5 हजार रुपयांची लाच घेताना आज (बुधवारी) दुपारी पावणेचार वाजण्याच्या सुमारास हिंगोली बसस्थानक परिसरात रंगेहाथ पकडण्यात आले. उपलेखापरीक्षक मिर्झा करार अली यांना त्यांनी गोरेगाव येथील सुदर्शन ग ÷ ामीण बिगरशेत पतसंस्थेच्या लेखापरीक्षणातील दोष दूर करून लेखापरीक्षण अहवाल देण्यासाठी ही लाच स्वीकारली. लाचलुचपतविरोधी खात्याचे उप-अधीक्षक भारत काकडे, जमादार शंकर देवकर, डी. जी.
Thursday, June 30, 2011 AT 05:00 AM (IST)
हिंगोली (accident) वाशिम मार्गावर वडदपाटीजवळ उभ्या असलेल्या ट्रकवर क्रुझर जीप आदळून झालेल्या अपघातात चार जण जागीच ठार झाले तर सात जण गंभीर जखमी झाले आहेत. आज (शुक्रवारी) पहाटे तीन वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. सुखसिंग बावरी, दीपाकौर बावरी, रणजीतसिंग टाक, मत्सकौर टाक यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. तर जखमींमध्य अनिताकौर टाक, सुमिताकौर टाक, रोहनसिंग बावरी, रितूकौर बावरी, जीवनसिंग राजकुमार शिंदे यांचा समावेश आहे.
Saturday, June 11, 2011 AT 05:00 AM (IST)
हिंगोली (hingoli) - रामदास आठवले यांचा शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय वैयक्तिक आहे. आठवले म्हणजे संपूर्ण भीमशक्ती असू शकत नाही, असे स्पष्ट मत 'रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया'चे माजी खासदार जोगेंद्र कवाडे यांनी व्यक्त केले. कवाडे म्हणाले की, 'रिपब्लिकन डाव्या लोकशाही आघाडी'च्या सदस्यांनाही आठवले यांनी आपल्या निर्णयाची कल्पना दिलेली नाही. त्यामुळे आता ते रिडालोसमध्ये आहेत की नाहीत याची आम्हाला शंका आहे.
Friday, May 20, 2011 AT 05:00 PM (IST)
हिंगोली (hingoli) - वसमत येथे एका शेतमजुराचा उष्माघातामुळे मृत्यू झाला असून या प्रकरणी आज (बुधवार) वसमत पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. भागातील उष्माघाताचा हा पहिलाच बळी आहे. तालुक्यातील मुडी येथील सटवाजी शेजुळे (वय 60) हे मंगळवारी वसमत येथे आठवडे बाजारासाठी आले होते. दुपारी कडाक्याच्या उन्हामुळे चक्कर येऊन ते रस्त्यात कोसळले. रात्री उशिरा या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली.
Thursday, May 19, 2011 AT 05:00 AM (IST)
हिंगोली (hingoli) - आज (शनिवार) औंढा तालुक्यातील दुघाळा येथे एका वनमजूराने आत्मदहन करून घेतल्याची घटना घडली. वनविभागाकडे व्यंकटी सोपान आगाशे या वनमजूराने कायमस्वरूपी नियुक्ती मिळावी अशी मागणी केली होती. 14 मे पर्यंत कायमस्वरूपी नियुक्ती न मिळाल्यास कधीही आत्मदहन करून घेण्याचा इशाराही आगाशे यांनी दिला होता. यासंदर्भात 9 तारखेला वनविभागाकडे आगाशे यांनी पत्र पाठवले होते. आगाशे हे गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता होते.
Sunday, May 15, 2011 AT 05:00 AM (IST)
हिंगोली (hingoli) - आज (शुक्रवारी) पहाटे सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथे एका पोलीस कर्मचाऱ्याच्या वडिलांनी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली. किसन गिरे (वय 70) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव असल्याचे गोरेगाव पोलिसांनी सांगितले. अर्धांगवायूच्या आजाराला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
Saturday, April 23, 2011 AT 05:00 AM (IST)
हिंगोली (hingoli) - आज (बुधवारी) सकाळी सेनगाव तालुक्यातील कोळसा येथील अध्यापक विद्यालयात द्वितीय वर्षात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने महाविद्यालयातच विषारी औषध प्राशन केल्याची घटना घडली आहे. विजय करे असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. त्याला तातडीने हिंगोलीतील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती गंभीर असल्याचे रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. आकाश कुलकर्णी यांनी सांगितले.
Thursday, April 21, 2011 AT 05:00 AM (IST)
|
|
|
|