Last Update: 


 
पहिलं पान  >>  हास्यरंग
रुग्ण - डॉक्टर, मला एक त्रास आहे. डॉक्टर - कसला? रुग्ण - लक्षात राहात नाही. डॉक्टर - कधीपासून आहे हा त्रास? रुग्ण - कसला त्रास?

Tuesday, May 15, 2012 AT 05:00 AM (IST)

 
अनिल : मूर्खपणाची उंची किती असू शकते? सुनिल : तुमची उंची किती आहे?

Monday, May 07, 2012 AT 05:00 AM (IST)

 
सारीका : माझे पती वाघाप्रमाणे शूर, चित्याप्रमाणे चपळ आणि हत्तीप्रमाणे डोलत जाणारे आहेत. रेखा : असं, त्यांना बघण्यासाठी किती रुपयाचं तिकीट काढावं लागणार.

Monday, March 05, 2012 AT 05:00 AM (IST)

 
गुरुजी - तुम्ही एखादं सत्कार्य केलेलं सांगा बरं? विद्यार्थी - पळण्याच्या शर्यतीत मी एका हरणाऱ्या मित्राला जिंकून दिलं. गुरुजी - ते कसं काय? विद्यार्थी - त्याच्या मागे कुत्रा सोडून.

Friday, April 27, 2012 AT 05:00 AM (IST)

 
शिक्षक - इतिहासात नसलेले गड कोणते? विद्यार्थी - कलिंगड.

Monday, April 23, 2012 AT 05:00 AM (IST)

 
बंडू : पुढील वर्षापासून मी हुंडाबंदी आंदोलनात भाग घेणार आहे. खंडू : मग यंदापासून का नाही? बंडू : यंदा माझे लग्न आहे. खंडू : आणि पुढच्यावर्षी. बंडू : माझ्या बहिणीचे.

Saturday, April 21, 2012 AT 05:00 AM (IST)

 
एकदा एक माणूस जीव द्यायला चालला होता वाटेत त्याला त्याचा मित्र भेटला व विचारला, "अरे कुठे चाललास?' माणूस : "जीव द्यायला' मित्र : मग हातात जेवणाचा डबा कशासाठी? माणूस : रेल्वेला यायला उशीर झाला भूक लागली तर काय करू? उपाशी मरू.

Tuesday, April 17, 2012 AT 05:00 AM (IST)

 
सल्ला मागायला आलेल्या एका पेशंटला डॉक्टर म्हणाले, तुम्ही यापुढे मुळीच दारू प्यायची नाही. यावर काही न बोलता पेशंट चालू लागतो, तसे डॉक्टर म्हणतात, अहो, माझ्या सल्ल्याचे पैसे? पेशंट मागे वळून म्हणतो, तो मी कुठे ऐकला?'

Monday, April 16, 2012 AT 05:00 AM (IST)

 
पती : हे बघ, मी जर एकदा चिडलो ना, तर सगळ्या जगाला आग लावून ठेवीन! पत्नी : घरातला स्टोव्ह बंद पडलाय, त्याला तेवढी आग लावून दाखवा.

Friday, April 13, 2012 AT 05:00 AM (IST)

 
एकदा आई आपल्या मुलाला आशीर्वाद देत म्हणाली, तू प्राण्यांचा मोठा डॉक्टर होशील. मुलगा : मग मी तुमच्या सर्वांचा इलाज फुकट करून देईन.

Monday, April 09, 2012 AT 05:00 AM (IST)

 
 
© Copyrights 2012 marathwadaneta.com - All rights reserved.
of
Powered By: