नवी दिल्ली (new delhi) - 'ऍडव्हर्टाईसिंग स्टॅंडर्ड काउंसिल ऑफ इंडिया'ने (एएससीआय) टीव्हीवर प्रसारीत करण्यात येणाऱ्या अनेक जाहिरांतींना रात्री 11 ते सकाळी 6 या कालावधीत दाखविण्यात यावे, अशी शिफारस केंद्र सरकारकडे केली आहे. या जाहिराती अलि असल्याचा निर्वाळा देऊन अशा जाहिराती मुलांना दाखविण्यात येऊ नये, यादृष्टीनेही पावले उचलण्यात येत आहेत. माहिती व प्रसारण मंत्रालयाने यासंदर्भात गंभीर दखल घेतली आहे.
Thursday, May 17, 2012 AT 05:00 AM (IST)
नवी दिल्ली (new delhi) - लोक जनशक्ती पक्षाचे रामविलास पासवान यांनी नोकर्यांसाठी मुलाखत देण्यासाठी गुजरातला गेलेल्या दोन बिहारच्या तरूणांना तेथे चालत्या रेल्वेतुन फेकण्याचा मुद्दा आज राज्यसभेत उठताच अपघातात ठार झालेल्या तरूणाला राज्य सरकारकडून २० लाख रुपये भरपाई देण्याची मागणी करण्यात आली.
Thursday, May 17, 2012 AT 05:00 AM (IST)
नवी दिल्ली (new delhi) - रेल्वे प्रशासनाने 'जनरल' कोट्याऐवजी प्रवाशांना 'तत्काल' कोट्यात प्रवाशांना आरक्षणात प्राथमिकता देण्याची तयारी केली आहे. त्यामुळे प्रवाशांची डोकेदुखी वाढणार आहे. याबाबत रेल्वेच्या सर्व 16 विभागांना आदेश देण्यात आले आहे. रेल्वे बोर्डाचे उपसंचालक ट्रॅफिक कमर्शियल (जी-2) संजय मनोचा यांच्याकडून यासंदर्भात 15 मे रोजी परिपत्रक पाठविण्यात आले आहे. यात वेटिंग लिस्ट क्लियर करण्यासाठी नवी पद्धत अंमलात आणली जाणार आहे.
Thursday, May 17, 2012 AT 05:00 AM (IST)
नवी दिल्ली (new delhi) - संपाबाबत गेल्या काही दिवसांपासून ताठर भूमिका घेतलेल्या वैमानिकांनी सरकारने आम्हांला चर्चेसाठी निमंत्रण द्यावे असा पवित्रा घेत बुधवारी मवाळ भूमिका घेतली. दरम्यान, एअर इंडिया प्रशासनाने आपत्कलीन यंत्रणा कार्यान्वित केली असून त्या अंतर्गंत युरोप आणि अमेरिकेची उड्डाणे एअर इंडियाने बुधवारी पुन्हा सुरू केली. बोईंग विमानांच्या प्रशिक्षणावरुन गेल्या आठवड्यापासून संपावर एअर इंडियाचे वैमानिक संपावर गेले आहेत.
Thursday, May 17, 2012 AT 05:00 AM (IST)
कोलकाता (kolkata) - आगामी २० मे ला मुख्यमंत्री खुर्चीवर एक वर्ष पूर्ण करणार्या तृणमूल कॉंग्रेस नेत्या ममता बॅनर्जी यांनी दावा केला की, त्यांची सरकार जंगलमहल भागात शांती कायम करण्यात यशस्वी झाली आणि यावर्षी आतापर्यंत त्या भागातून एकही व्यक्ती ठार झाल्याचे वृत्त नाही.
Thursday, May 17, 2012 AT 05:00 AM (IST)
नवी दिल्ली (new delhi) - संसदेला साठ वर्षपूर्ण झाल्याच्या निमित्ताने खासदारांसाठी आयोजित करण्यात आलेल्या, फोटो शूटसाठी अर्थमंत्री प्रणव मुखर्जी अनुपस्थित होते. वेळेवर निरोप न मिळाल्याने प्रणवदा यावेळी गैरहजर राहिल्याचे सांगण्यात येत आहे. पण लोकसभेच्या महासचिवांच्या कार्यालयातील सूत्रांनी ही माहिती चूकीची असल्याचे सांगितल. प्रणव मुखजींर्च्या कार्यालयात गेल्या तीन दिवसापासून दररोज याविषयीची माहिती सतत पाठवण्यात येत होती.
Thursday, May 17, 2012 AT 05:00 AM (IST)
नवी दिल्ली (new delhi) - अध्यात्मिक गुरू निर्मलबाबांविरुद्ध बुधवारी दिल्ली उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली. जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत निर्मलबाबांना प्रतिवादी करण्याचे ही आदेश न्यायालयाने दिले. तसेच या याचिकेनुसार न्यायालयाने केंद्र आणि दिल्ली सरकारला नोटीस बजावली.
Thursday, May 17, 2012 AT 05:00 AM (IST)
जयपूर (jaipur) - अभिनेता आमिर खानच्या ’सत्यमेव जयते’मुळे एकीकडे देशभरात सामाजिक बदलाचे वारे वाहत असतानाच राजस्थानच्या आरोग्य मंत्र्यांने मात्र या कार्यक्रमावर कडाडून टीका केली आहे. राजस्थानचे आरोग्य मंत्री राजकुमार शर्मा यांनी आमिर खान हा सामाजिक विषयांसाठी काम करत नसून पैशांसाठी काम करत असल्याचा आरोप केला आहे, असे आमिर खानच्या ’सत्यमेव जयते’ या कार्यक्रमाबद्दल बोलताना शर्मा बोलत होते.
Thursday, May 17, 2012 AT 05:00 AM (IST)
नवी दिल्ली (new delhi) - मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला राज्यसभेची शपथ कशी द्यावी, असा प्रश्न दिल्ली हायकोर्टाने केंद्र सरकारला आज विचारला असून या संदर्भात नोटीस जारी केली आहे. सचिनच्या खासदारकीवर आक्षेप घेणाऱ्या याचिकेची दखल घेत कोर्टाने केंद्राला ही नोटीस बजावली आहे. या नोटिशीला उत्तर देण्यासाठी केंद्राला पाच जुलैपर्यंतची मुदतही देण्यात आली आहे. कला, साहित्य आणि समाजसेवेशी जोडल्या गेलेल्या व्यक्तींनाच खासदारकी देता येते.
Thursday, May 17, 2012 AT 05:00 AM (IST)
नवी दिल्ली (new delhi) - टू जी स्पेक्ट्रम वाटप घोटाळ्यात अडकलेल्या माजी दूरसंचार मंत्री ए.राजा यांनी संसदेत हजेरी लावली. गेली 15 महिने राजा तिहारच्या जेलमध्ये होते.मंगळवारी त्यांची जामिनावर सुटका झाली होती. राजा यांना विशेष सीबीआय न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला होता. राजा यांच्या जामिनाला सीबीआयने विरोध केला होता. मात्र न्यायालयाने त्यांना सशर्त जामीन मंजूर केला आहे.
Thursday, May 17, 2012 AT 05:00 AM (IST)
|
|
|
|