सायगाव  (saigaon) - मराठवाड्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रीय एकात्मताच एक ज्वलंत व जागृत केंद्रबिंदू म्हणून पाहिलं जात असलेल सादीकबाबा यांचा ऊर्स 11 मे पासून सुरु झालेला आहे.
Wednesday, May 16, 2012 AT 05:00 AM (IST)
अंबाजोगाई  (ambajogai) - भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या अंबाजोगाई येथील खोलेश्वर महाविद्यालयात मराठी विभागाचे प्रमुख संत साहित्याचे गाढे अभ्यासक असलेले प्रा. हरिहर नागोराव मातेकर वय ८३ यांचे स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात सायंकाळी ७ च्या सुमारास हृदयविकाराने निधन झाले. प्रा. मातेकर यांना प्रकृति अस्वस्थामुळे दोन-तीन दिवसाआधी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
Wednesday, May 16, 2012 AT 05:00 AM (IST)
अंबाजोगाई  (ambajogai) - अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याची गेल्या सहा वर्षापासून यशस्वी वाटचाल केवळ राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या आशिर्वादामुळेच व कारखान्याचे संचालक मंडळ व कामगार यांच्या समन्वयामुळे साध्य झाले असल्याचे प्रतिपादन कारखान्याचे चेअरमन ऍड. मेघराज आडसकर यांनी अंबा साखर कारखान्याचे कामगार युनियनचे उपाध्यक्ष कॉ. आत्माराम निंबाळकर यांच्या निरोप समारंभप्रसंगी केले.
Wednesday, May 16, 2012 AT 05:00 AM (IST)
अंबाजोगाई  (ambajogai) - स्वामी रामानंद तिर्थ रुग्णालयात पाणी नाही म्हणून शवविच्छेदन करण्यासाठी तीन तास विलंब झाला. या घटनेबद्दल संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या. राज्यात सर्वत्र पाण्याची टंचाई असली तरी चक्क शवविच्छेदनासाठी पाणी नसल्याची घटना अंबाजोगाई रुग्णालयात घडली. व रुग्णालयातील प्रशासनाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Wednesday, May 16, 2012 AT 05:00 AM (IST)
परळी वैजनाथ  (parali) - परळी नगर परिषदेच्या नागापूरस्थित पाणी पुरवठा यंत्रणेविषयी काही वृत्तपत्रात माजी नगराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया यांनी उपस्थित केलेले मुद्दे सर्वथा चुकीचे व जनतेची दिशाभूल करणारी आहेत. वास्तविक त्यांच्याच कारकीर्दीत झालेल्या चुकीच्या निर्णयामुळे सतत तांत्रिक दोष निर्माण होत आहेत, असे प्रतिपादन पाणी पुरवठा सभापती वैजनाथ बागवाले यांनी केले.
Tuesday, May 15, 2012 AT 05:00 AM (IST)
लातूर  (latur) - जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत वर्ग 3 व 4 च्या कर्मचाऱ्यांच्या बदल्याबाबत ग्रामविकास मंत्रालय, महाराष्ट्र शासन, मुंबई यांच्या दिनांक 20 एप्रिल 2012 च्या आदेशास मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आज अंतरिम आदेश देत दिनांक 14 मे 2012 ची परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे निर्देश दिले. महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास मंत्रालयाने दिनांक 20 एप्रिल 12 रोजी बदल्यांचा आदेश जारी करुन जि.प./पं.स.
Tuesday, May 15, 2012 AT 05:00 AM (IST)
बीड  (beed) - माजी मंत्री आमदार व बीड-लातूर-उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाचे आघाडीचे उमेदवार आ. दिलीपरावजी देशमुख यांनी आज बीड येथे प्रमुख नेत्यांच्या गाठीभेटी घेवून चर्चा केली. ज्यात ना. जयदत्तअण्णा क्षिरसागर, ना. प्रकाशदादा साळुंके, डॉ. भारतभूषण क्षिरसागर, रमेशराव आडसकर सह प्रमुख कार्यकर्त्यांच्या त्यांनी गाठी भेटी घेतल्या. आ.
Monday, May 14, 2012 AT 05:00 AM (IST)
अंबाजोगाई  (ambajogai) - केज विधानसभा मतदार संघाची पोट निवडणूक ही स्व.आ.डॉ. विमलताई मुंदडा यांच्या अस्तित्वाची निवडणूक असून या निवडणुकीच्या विजयासाठी स्व.ना.डॉ.सौ. विमलताई मुंदडा यांचे विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कार्यकर्त्यांनी आजपासूनच कामाला लागावे असे आवाहन युवा नेते अक्षय मुंदडा यांनी केले.
Sunday, May 13, 2012 AT 05:00 AM (IST)
परळी  (parali) - शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नागापूर येथील वाण धरणात मुलबक पाणीसाठा असून पुढील दोन तीन महिने परळीकरांना पाणी पुरवठा होऊ शकतो परंतु न.प.च्या दुर्लक्षामुळे मागील 15 दिवसापासून अशुद्ध पाणी पुरवठा होत असल्याचे माजी नगराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया यांनी निदर्शनास आणून दिले.
Sunday, May 13, 2012 AT 05:00 AM (IST)
बीड  (beed) - आपल्या मनासारखे पत्नी वागत नाही या कारणावरुन तिच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून देणाऱ्या पतीला न्यायालयाने दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. ही घटना शहर पोलिस ठाण्याच्या पाठीमागील भागात दि. 12 मार्च 2011 रोजी घडली होती. या प्रकरणी न्यायाधीशांनी पतीला दोषी ठरवत त्याला जन्मठेपेची शिक्षा दिली. याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील शहर पोलिस स्टेशन भागत राहत असलेला बाजीराव घोडके हा दि.12 मार्च 2011 रोजी रात्री उशीरा घरी आला.
Saturday, May 12, 2012 AT 05:00 AM (IST)
|
|
|
|