नवी दिल्ली (new delhi) - चालू वित्त वर्षात भाज्यांच्या उत्पादनात 5.8 टक्के आरी फळांच्या उत्पादनात 4.8 टक्के वाढ झाली आहे. केंद्रीय कृषी राज्य मंत्री अरुण यादव यांनी राज्यसभेत एका प्रश्नाचे लिखित उत्तर देताना सांगितले की वित्त वर्ष 2010-11 मध्ये भाज्यांच्या उत्पादनात 5.8 टक्के वाढ झाली असून 1,41,350 मीट्रिक टन पोहोचली आहे, जे 2009-10 मध्ये1,33,545 मीट्रिक टन होती. याच प्रकारे चालू वित्त वर्षात फळांच्या उत्पादनात 4.
Sunday, March 06, 2011 AT 05:00 AM (IST)
पुणे (pune) - महाराष्ट्र सरकारने दूध दरवाढीची घोषणा केल्यानंतर आरेने आपल्या नवे सुधारित दर जाहीर केले आहेत. आरेचे एक लिटर गायीचे दूध 26.50 रुपयाला तर अर्धा लिटर दूध 13.25 रुपयाला मिळेल, असे आरेने जाहीर केले आहे. नवीन छापील दराची पॉलिथिन फिल्म उपलब्ध होईपर्यंत जुन्या दराच्या पॉलिथिल फिल्ममधून आरेच्या गायीच्या दुधाचा पुरवठा होईल, असे शासकीय दूध योजनेचे महाव्यवस्थापक हेमंत गडवे यांनी सांगितले.
Tuesday, February 15, 2011 AT 05:00 AM (IST)
नवी दिल्ली (new delhi) - 'बिमा अकाऊन्ट वन' आणि 'बिमा अकाऊन्ट टू' अशी या पॉलिसींची नावे आहेत. दोन्ही पॉलिसींचे मूळ स्वरूप सारखे आहे. गरजेच्यावेळी हाती पैसा मिळणे तसेच किमान उत्पन्न जमा होईल आणि त्याच बरोबर जोखीमीचेही संरक्षण राहील, अशी या पॉलिसींची वैशिष्ट्ये आहेत. याशिवाय महत्त्वाचे म्हणजे विमा पॉलिसी घेताना वैद्यकीय तपासणी होणार नाही.
Sunday, February 06, 2011 AT 05:00 AM (IST)
मुंबई (mumbai) - महाराष्ट्र सरकारच्या सेल्स टॅक्स विभागाच्या एका नोटीफिकेशनमुळे राज्य सरकारला मोठा आर्थिक फटका बसला आहे. एक बनावट सरकारी अधिसूचना सेल्स टॅक्स विभागाच्या वेबसाईटवर लावण्यात आली. ज्या अधिसूचनेत कारचा विक्रीकर पन्नास टक्क्यांनी कमी करण्यात आला होता. ही बनावट अधिसूचना काही दिवसांनी काढूनही टाकण्यात आली. पण या सर्क्युलरच्या आधारावर कार तयार कंपन्यांनी फायदा उठवणे सुरूच ठेवले.
Sunday, February 06, 2011 AT 05:00 AM (IST)
दिल्ली - लंडनस्थित लेगॅटूम या संस्थेने "दी 2010 लेगॅटूम समृद्धी निर्देशांक" प्रसिद्ध केला आहे. यात 110 देशांमये भारताचा क्रमांक 88 वा आहे. आर्थिक प्रगती आणि नागरिकांच्या जीवनाची गुणवत्ता यांचा समावेश निर्देशांक ठरवताना करण्याता आला असून यात शहरी आणि ग ÷ ामीण क्षेत्राचा वेगवेगळा विचार करण्यात आलेला नाही. दरम्यान, नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशनने वापरलेल्या पद्धतीनुसार शहरी गरिबांचे प्रमाण 1993-94 मये 32.
Wednesday, January 26, 2011 AT 05:00 PM (IST)
मुंबई - रिझर्व्ह बॅंकेने आज अखेर अपेक्षेप्रमाणे व्याजदरात वाढ केली. रेपो तसेच रिव्हर्स रेपो दरात प्रत्येकी पाव टक्का वाढ करण्यात आली आहे. रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर डी. सुब्बाराव यांनी आज येथे 2010-11 या आर्थिक वर्षातील तिसऱ्या तिमाहीचा पतधोरण आढावा घेताना वाढत्या महागाईची चिंता व्यक्त केली. मुख्यालयात सकाळी विविध बॅंकप्रमुखांशी चर्चा केल्यानंतर व्याजदरात सरसकट अर्धा टक्का व्याजदरवाढ जाहीर केली.
Wednesday, January 26, 2011 AT 05:00 AM (IST)
मुंबई - भारतीय रिझर्व्ह बॅंकेने जाहीर केलेल्या तिमाही पतधोरणामध्ये अपेक्षेप्रमाणे झालेल्या दरवाढीमुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक मंगळवारी 182 अंकांनी कोसळून 18,969.45 अंकांवर बंद झाला. वाढत्या महागाईला आळा घालण्यासाठी तसेच आयात-निर्यातीमधील तफावत दूर करण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेने महत्त्वाच्या दरांमध्ये वाढ केली आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक अर्थात निफ्टीमध्येही 55.85 अंकांची घसरण होऊन तो 5687.40 अंकांवर बंद झाला.
Wednesday, January 26, 2011 AT 05:00 AM (IST)
नवी दिल्ली - डाळी, गहू आणि बटाट्यांच्या किमती कमी झाल्यामुळे सलग दुसऱ्या आठवड्यात अन्नधान्य महागाई दरात घट झाल्याचे दिसून आले आहे. आठ जानेवारी रोजी संपलेल्या आठवड्यात अन्नधान्य महागाई निर्देशांक 15.52 टक्के नोंदवण्यात आला. या अगोदरच्या आठवड्यात हा दर 16.91 टक्के इतका होता. गुरुवारी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, डाळींचे दर 14.92 टक्क्यांनी कमी झाले आहेत. त्याचप्रमाणे गव्हाच्या दरात 6.11 टक्क्यांनी तर बटाट्याच्या दरात 2.
Friday, January 21, 2011 AT 05:00 AM (IST)
मुंबई - शेअर बाजारात गुरूवारी माफक खरेदी झाली. अन्न चलनवाढीच्या दरात घट झाल्यामुळे गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला. भारतीय रिझर्व्ह बॅंक महागाई रोखण्यासाठी कडक उपाययोजना करण्याची शक्यता त्यामुळे मंदावली आहे. हे लक्षात घेऊन बॅंकांच्या शेअरना जोरदार मागणी होती. सोबत आयटी, टेक, कन्झ्युमर ड्युरेबल्स, पब्लिक सेक्टर, मेटल, हेल्थकेअर, पॉवर यांचीही विचारणा झाली.
Friday, January 21, 2011 AT 05:00 AM (IST)
नवी दिल्ली - जागतिक बाजारपेठेत सोने आणि चांदीचे भाव कमी झाल्याने किरकोळ बाजारातील सोन्या-चांदीचेही भावातही घसरण झाली. सोन्याचा दर 40 रुपयांनी कमी होऊन प्रतितोळा 20 हजार 630 रुपयांवर स्थिरावला. चांदीच्या दरात किलोमागे 410 रुपयांची घट झाली. त्यामुळे किरकोळ बाजारात चांदीचा दर 44 हजार 390 रुपये झाला. या आठवड्याने सोन्याचांदीच्या दरातील मोठा चढ-उतार अनुभवला.
Friday, January 21, 2011 AT 05:00 AM (IST)
|
|
|
|