दुबई (dubai)  - ऑस्ट्रेलियात चाललेल्या तिरंगी मालिकेमध्ये विजयी खेळी करणाऱ्या भारताचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या क्रमवारीत सुधारणा झाली आहे. धोनी सहाव्या स्थानावरून चौथ्या स्थानी पोहचला आहे. धोनीच्या क्रमवारीत सुधारणा झाली असली तरी धडाकेबाज फलंदाज वीरेंदर सेहवाग मात्र क्रमवारीत घसरला आहे. सेहवाग चार स्थानांनी घसरून 18 व्या स्थानावर गेला आहे. चालू मालिकेत सेहवाग सातत्याने अपयशी ठरत असल्याने त्याच्या फलंदाजीत घसरण झाली आहे.
Thursday, February 23, 2012 AT 05:00 AM (IST)
मुंबई (mumbai) - ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील भारतीय संघात दुफळी असल्याच्या वृत्ताचे बीसीसीआयकडून बुधवारी खंडन करण्यात आले. ""भारतीय संघात दुफळी नाही. या संदर्भात आम्ही संघव्यवस्थापनाशी चर्चा केली,'' असे बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी सांगितले. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनीदेखील श्रीनिवासन यांच्याशी सहमती दर्शवली. ""सेहवागच्या विधानाचा विपर्यास केला गेला. संघात कसलेही मतभेद नाहीत. प्रसारमाध्यमांनी उठवलेले हे वादळ आहे.
Thursday, February 23, 2012 AT 05:00 AM (IST)
नवी दिल्ली (new delhi) - श्रीलंकेच्या डावातील 40 व्या षटकात फिरकीपटू आर.अशषवनने थिरीमनेस विनू मंकड स्टाईलने धावबाद केले. अशषवन चेंडू टाकण्यापूर्वीच थिरीमने क्रीजबाहेर जायचा. त्यामुळे विचलित झालेल्या अश्र्विनने पुढचा चेंडू टाकण्यापूर्वीच त्याच्या यष्टया उडवून पंचांकडे धावबादाचे अपिल केले. मैदानावरील पंचांनी यासाठी तिसऱ्या पंचांची मदत घेण्यापूर्वीच कर्णधार सेहवागने सचिन तेंडुलकरच्या सांगण्यावरून हे अपिल मागे घेतले.
Thursday, February 23, 2012 AT 05:00 AM (IST)
कोल्हापूर (kolhapur)  - कुस्तीमधली सर्वोच्च मानली जाणारी हिंदकेसरी स्पर्धा कोल्हापूरात होणार आहे. मात्र हिंदकेसरी कुस्तीसाठी महाराष्ट्रात तुल्यबळ मल्ल सापडत नाही. त्यामुळे हिंदकेसरीची गदा परराज्यात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तयारी नसल्याने अनेक मल्ल मैदानात उतरण्यास तयार नाहीत तर महाराष्ट्रातील मल्ल चांगली लढत देतील अशी आशा कुस्ती प्रशिक्षकांनी व्यक्त केली आहे.
Thursday, February 23, 2012 AT 05:00 AM (IST)
दुबई (dubai) - केविन पीटरसनच्या सलग दुसऱ्या शतकाच्या जोरावर इंग्लंडने चौथ्या आणि अंतिम एकदिवसीय क्रिकेट सामन्यात चार गडी राखून विजय मिळवीत पाकिस्तानला 4-0 असा क्लीनस्वीप दिला. पीटरसनने 153 चेंडूत आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट 130 धावांची खेळी केली आणि नववे एकदिवसीय शतक पूर्ण केले. इंग्लंडने पाकिस्तानचे 238 धावांचे आव्हान 49.2 षटकांत 6 गडी गमावून साध्य केले. इंग्लंडची अवस्था एकवेळ 4 बाद 68 अशी झाली होती.
Thursday, February 23, 2012 AT 05:00 AM (IST)
दुबई (dubai) - ऑस्ट्रेलियात चाललेल्या तिरंगी मालिकेमध्ये विजयी खेळी करणाऱ्या भारताचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या क्रमवारीत सुधारणा झाली आहे. धोनी सहाव्या स्थानावरून चौथ्या स्थानी पोहचला आहे. धोनीच्या क्रमवारीत सुधारणा झाली असली तरी धडाकेबाज फलंदाज वीरेंदर सेहवाग मात्र क्रमवारीत घसरला आहे. सेहवाग चार स्थानांनी घसरून 18 व्या स्थानावर गेला आहे. चालू मालिकेत सेहवाग सातत्याने अपयशी ठरत असल्याने त्याच्या फलंदाजीत घसरण झाली आहे.
Thursday, February 23, 2012 AT 05:00 AM (IST)
नवी दिल्ली (new delhi) - सचिनने वनडे क्रिकेटमधून निवृत्त व्हावे असे मत कपिल देव यांनी व्यक्त केल्यानंतर आता गांगुलीनेही वनडेबाबत सचिन तेंडुलकरने पुनर्विचार करावा असे मत व्यक्त केले आहे.सचिनच्या आठ-नऊ महिन्यांनी वनडे संघात खेळण्याने त्याला स्वत:ला किंवा संघाला फायदा होत नसेल तर त्याने वनडे क्रिकेटबद्दल विचार करावा असेही गांगुलीने नमूद केले. 'वनडे क्रिकेट खेळणे कितपत योग्य आहे यावर सचिनने विचार करावा.
Thursday, February 23, 2012 AT 05:00 AM (IST)
लंडन (landon) - बि ÷ टिश खासदार बॅरी गार्डिनर यांनी डाउ केमीकल कंपनीला ऑलिंपिक 2012 चे प्रायोजक करण्याची प्रक्रिया "दिखावा" असल्याचे म्हटले आहे. संसदेच्या वेस्टमिनिस्टर हॉलमधील चर्चेत भाग घेताना गार्डिनर यांनी आरोप केला की, कंपनीच्या बाजूने यासंबंधीत प्रक्रियेत गैरव्यवहार झाला आहे. प्रायोजत्व रद्द करण्यात आले नाही तर आगामी ऑलिंपिकवरही संशयाचे ढग कायम राहतील, असे ते म्हणाले.
Thursday, February 23, 2012 AT 05:00 AM (IST)
नवी दिल्ली (new delhi) - ऑलिंपिक पात्रता हॉकी स्पर्धेत बुधवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या सामन्यात भारतीय महिला संघाला पराभव स्वीकारावा लागला. दक्षिण आफ्रिकेने भारताचा 5-2 अशा गोलने पराभव केला. येथील मेजर ध्यानचंद मैदानावर सुरु असलेल्या लंडन ऑलिंपिक पात्रता हॉकी स्पर्धेत भारतीय महिला संघाला प्रथमच पराभवाचा सामना करावा लागला. पहिल्या पूर्वार्धात भारतीय संघ 2-1 अशा पिछाडीवर होता. त्यानंतर आफ्रिकेच्या संघाने 5-2 अशी आघाडी घेत विजय मिळवला.
Thursday, February 23, 2012 AT 05:00 AM (IST)
वॉशिंग्टन (wasingtan) - भारताचा धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवागची युवराजसिंगने टि्वटरवर प्रतिक्रिया देऊन पाठराखण केली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या सेहवागची सध्या कामगिरी खालावली आहे. त्यामुळे सेहवागला टीकेला सामोरे जावे लागत आहे. त्याला संघातून काढून टाकण्याचीही मागणी होत आहे. कर्णधार महेंद्रसिंह धोनीने गंभीर, सेहवाग व सचिनला आळशी खेळाडू म्हटले होते. युवराजसिंगला कॅन्सर झाला असून, त्याच्यावर येथे उपचार सुरू आहेत.
Thursday, February 23, 2012 AT 05:00 AM (IST)
|
|
|
|