Last Update: 


 
औरंगाबादमध्ये राष्ट्रगीत गायनाचा विश्र्वविक्रम
Aurangabad News
Thursday, January 26, 2012 AT 05:00 AM (IST)

औरंगाबाद (aurangabad) - देशभक्ती व राष्ट्रनिष्ठेला नवी उंची व नवा आयाम देत औरंगाबादकरांने 'जन-गण-मन'चे समूहगान करण्याचा जागतिक विक्रम नोंदविण्याच्या दृढनिश्चयाला बुधवारी मूर्तरूप आले. लोकमत समूह द्वारा आयोजित कार्यक्रमात एक लाखांहून अधिक रहिवाशांनी दिग्गज्जांसह राष्ट्रगीताचे समूहगान करून एक नवा विश्र्वविक्रम प्रस्थापित केला.
गारखेड्यातील विभागीय क्रीडा संकुलात हा दुर्मिळ व ऐतिहासिक क्षण बुधवारी सकाळी अवतरला. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी औरंगाबादचे हजारो रहिवासी उपस्थित होते. यामध्ये शाळा - कॉलेजचे विद्यार्थी, गृहिणी, चाकरमान्यांबरोबरच शहरातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, औद्योगिक, व्यापारी आदी सर्वच क्षेत्रांतील दिग्गजांचीही लक्षणीय उपस्थिती दिसून आली. या अविस्मरणीय व ऐतिहासिक सोहळ्यास राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे नातू व विचारवंत तुषार गांधी, हुरहुन्नरी अभिनेता प्रशांत दामले, प्रख्यात गायक शंकर महादेवन, स्वप्नील बांदोडकर, वैशाली सामंत, रुपकुमार आणि सोनाली राठोड हेही उपस्थित होते.
विक्रमाच्या दृष्टीने 'गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये आधी विक्रम पाकिस्तानच्या नावावर होता. तेथे गेल्या वर्षी 5,857 नागरिकांनी एकत्र येऊन गायन केले होते.


 
© Copyrights 2010 marathwadaneta.com - All rights reserved.
of
Powered By: