नशीब साथ देत नाही : इशांत शर्मा
Cricket News and Scores
Thursday, January 26, 2012 AT 05:00 AM (IST)
ऍडिलेड (edled) - भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय खेळाडूंच्या वाईट कामगिरीला इशांत शर्माला नशीबाला दोष दिला आहे. 'जस्ट लक इज नॉट फेव्हरिंग अस', असे म्हणत त्याने कसोटी मालिकेतील पराभवाचे खापर नशिबावर फोडले आहे.
इशांत म्हणाला की, 'पुढे काय होणार आहे हे आपल्याला माहित नसते. पण संघातील प्रत्येक खेळाडू सकारात्मक विचार करुन सामन्यातील पुढील तीन दिवसांचा विचार करत आहोत.' 'या विकेटवर धैर्य राखणे अतिशय गरजेचे आहे. त्यामुळे नशीब आम्हाला साथ देईल, अशी आशा मी करतो,' असे इशांत म्हणाला.
त्याचबरोबर राहुल द्रविडचाही त्याने यावेळी बचाव केला. राहुल द्रविडसारखे तंत्र असलेला एकही खेळाडू सध्या नाही. त्यामुळे त्याला काळजी करण्याची काहीही गरज नाही, असे तो म्हणाला.
तर 'भारत रत्न'साठी सचिनच्या नावाची शिफारस झाली नाही. त्यावर तो म्हणाला की, 'या पुरस्करांची मला जास्त माहिती नाही, त्यामुळे मी यावर काहीही प्रतिक्रिया देऊ शकत नाही.'