Last Update: 


 
वेरुळ-अजिंठा महोत्सवाची तयारी पूर्ण ; नागरिकांना मेजवानीची संधी
Aurangabad News
Thursday, January 26, 2012 AT 05:00 AM (IST)

औरंगाबाद (aurangabad) - औरंगाबाद येथे दिनांक 27 ते 29 जानेवारी 2012 या कालावधीत वेरुळ-अजिंठा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.या महोत्सवाची तयारी पूर्ण झाली असून सर्वाचीच उत्कंठा वाढविणारा हा महोत्सव समीप आला आहे.
गेल्या तीन वर्षाच्या खंडानंतर यावर्षी हा महोत्सव होत आहे. यंदा प्रथमच सोनेरी महल व कलाग÷ाम या दोन्ही ठिकाणी हा महोत्सव होणार आहे. या महोत्सवाच्या पूर्वसंध्येला दिनांक 26 जानेवारी रोजी सायं 6 ते रात्री 10 वाजेपर्यत सोनेरी महल येथे प्रसिध्द गायक अवधूत गुप्ते यांच्या प्रमुख उपस्थितीत स्थानिक कलावंतांना प्रोत्सान देण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर दिवशीचा कार्यक्रम सर्वासाठी मोफत राहणार आहे.
राज्याचे मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड यांच्या हस्ते दिनांक 27 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता या महोत्सवाचे उदघाटन होणार आहे. याप्रसंगी पर्यटन विभागाचे प्रधान सचिव आनंद कुलकर्णी अध्यक्षस्थानी राहणार आहेत तर प्रमुख पाहूणे म्हणून विभागीय आयुक्त भास्कर मुंढे यांची उपस्थिती राहणार आहे.
यानंतर सुप्रसिध्द अभिनेत्री हेमामालिनी या ईशा व आहना देओलसोबत 'परंपरा' बॅले सादर करणार आहेत. तसेच डॉ. राजा, राधा रेड्डी व शालू जिंदाल हे कुचीपुडी नृत्य सादर करणार आहेत.
दिनांक 28 रोजी शास्त्रीय व सुगम संगीताचे कार्यक्रम होणार आहेत उस्ताद राशीद खान यांचे शास्त्रीय गायन व आरती अंकलीकर यांचे शास्त्रीय गायक, पंडित रोणू मुजुमदार यांचे बासरीवादन व सुगातो भादुरी यांचे 'मेंडोलीन' वादन होणार आहे.
दिनांक 29 रोजी प्रसिध्द सिनेगायक कैलास खेर याचा सुफी संगीताचा आदि कार्यक्रम होणार आहे.
या तीन दिवसाच्या महोत्सवात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कलावंत सहभागी होणार असल्याने नागरिकांना चांगली मेजवानी मिळणार आहे.
यावर्षी प्रथमच या महोत्सवाच्या निमित्ताने कलाग÷ाम येथे सकाळी 10 ते सायं 5 वाजेपर्यत स्थानिक कलावंताचा लोकोत्सव 2012 चे आयोजन करण्यात आले आहे. याबरोबरच या ठिकाणी हस्तकला साहित्याचे प्रदर्शन जत्रा पुरातन वस्तुंचे प्रदर्शनासाठी ' जतन' खाद्योत्सवासाठी ' पंगत ' व लोककला महोत्सवासाठी ' जलसा ' अशी चार दालने करण्यात आली आहेत.
कलाग÷ाम येथून सोनेरी महल येथे जाण्यासाठी बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाधिकारी कुणाल कुमार यांनी केले आहे.


 
© Copyrights 2010 marathwadaneta.com - All rights reserved.
of
Powered By: