युवराजसिंग सहा महिने क्रिकेटपासून दूर?
Cricket News and Scores
Thursday, January 26, 2012 AT 05:00 AM (IST)
नवी दिल्ली (new delhi) - सध्या अनफिट असलेला भारताचा तडाखेबंद फलंदाज युवराजसिंग आगामी आयपीएलच्या पाचव्या मोसमाला मुकणार आहे. युवराजला फुफ्फुसाच्या तक्रारी जाणवत असून यामुळे जवळपास सहा महिने तो क्रिकेटपासूनच दूर राहण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. युवराज पुणे वॉरियर्स संघाचा कर्णधार आहे.
सध्या युवराज अमेरिकेत उपचार घेत असून गरज भासल्यास त्याच्यावर शस्त्रक्रियाही होईल. युवीशी संबंधित सुत्रांनी सांगितले की, 'युवराज काही महिने इंग्लंडला होता. त्यानंतर तो अमेरिकेला रवाना झाला. युवराजवरचा वैद्यकीय अहवाल बघूनच तज्ज्ञ त्याला शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे की नाही ते ठरवतील. पण तो आयपीएलला मुकणार हे नक्की'. एकूणच चार एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आयपीएलमध्ये युवराज खेळणार नाही हे नक्की.