औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस यांना अभिवादन
Aurangabad News
Tuesday, January 24, 2012 AT 05:00 AM (IST)
औरंगाबाद (aurangabad) - थोर देशभक्त नेताजी सुभाषचंद्र बोस यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात आज अभिवादन करण्यात आले. विभागीय आयुक्त भास्कर मुंढे यांनी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. उपायुक्त पी.टी. वायचळ, धनराज केंद्रे, विजयकुमार पवार, अनिल राठोड यांच्यासह विभागीय आयुक्त कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती.