वेरुळ-अजिंठा औरंगाबाद महोत्सव 2012 ची तिकिट विक्री वेगात सुरू ; उत्स्फूर्त प्रतिसाद
Aurangabad News
Monday, January 23, 2012 AT 05:00 AM (IST)
औरंगाबाद (aurangabad) - वेरुळ-अजिंठा औरंगाबाद महोत्सव 2012 चे दिनांक 26 ते 29 जानेवारी 2012 दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाची तिकिट विक्री वेगात सुरू असून तिकिट विक्रीस नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.
वेरुळ-अजिंठा औरंगाबाद महोत्सव 2012 ची तिकिट विक्री तापडिया नाट्य मंदिर, संत एकनाथ रंगमंदिर, जॉईंन्ट कॅफे कॅनॉट प्लेस, सेतु सुविधा केंद्र,महा-ई- सेवा केंद्र, एम टी डी सी, सातारा परिसर अयप्पा मंदिराजवळ, चिश्तिया पोलिस स्टे एन -5, भावसिंगपुरा, बन्सिलालनगर, गारखेडा, बेगमपुरा येथील महा-ई सुविधा केंद्र येथे तसेच ऑनलाईन सुरू असून तिकिट विक्रीस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
तिकिट दर-डोनर- 600 रूपये, सीझन तिकिट- 150 रू, सीझन तिकिट -विद्यार्थी-75 रूपये, रोज-50 रूपये, रोज- विद्यार्थी- 25 रूपये.
वेरुळ-अजिंठा औरंगाबाद महोत्सव 2012 च्या तिकिट विक्री कक्षाचे औपचारिक उद्घाटन जिल्हाधिकारी कुणाल कुमार यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतु सुविधा केंद्रात झाले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ भारत कदम, नायब तहसिलदार पावडे तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी कुणाल कुमार व निवासी उपजिल्हाधिकारी डॉ भारत कदम यांनी वेरुळ-अजिंठा औरंगाबाद महोत्सव 2012 ची तिकिटे खरेदी केली.