जात प्रमाणपत्र पडताळणी प्रस्ताव 21 जानेवारीपर्यंत दाखल करावे
Aurangabad News
Friday, January 20, 2012 AT 05:00 AM (IST)
औरंगाबाद (aurangabad) - औरंगाबाद महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 28 व 67 या राखीव प्रभागातून पोटनिवडणुकीसाठी उभे राहण्यास इच्छुक उसलेल्या उमेदवारांचे जाती प्रमाणपत्राच्या पडताळणीसाठीचे अर्ज दिनांक 21 जानेवारी 2012 पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात स्विकारण्यात येतील. तरी महानगरपालिकेच्या पोटनिवडणुकीसाठी या प्रभागातून राखीव जागेवर निवडणूक लढविणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी आपले जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात दिनांक 21 जानेवारी पर्यंत दाखल करावेत, असे जिल्हाधिकारी, औरंगाबाद यांनी कळविले आहे.