Last Update: 


 
आहो आश्चर्यम... नगराध्यक्षांनी घेतली चक्क रविवारीच सफाई संबंधी बैठक
-
Monday, July 05, 2010 AT 05:00 AM (IST)
Tags: parbhani,   marathwada

परभणी - एैरवी पालीकेमध्ये विशेष सभेतच पालीकेत हजेरी लावणाऱ्या नगराध्यक्षा जयश्री खोबे यांनी रविवार दिनांक 4 जुलै रोजी सफाई संबंधी बैठक घेतल्याने शहरात आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.
परभणी नगरा पालीकेच्या नगराध्यक्षपदी विराजमान झाल्यापासुन अवघे काही तासच पालीकेत हजेरी लावणाऱ्या नगराध्यक्षांच्या विरोधात सर्वत्र नाराजगी होत होती. पावसाळ्या पुर्वीची साफ-सफाईची कामे न झाल्याने शहरात सर्वत्र घाणीचे सामाज्य पसरले होते. त्यातच मागील चार दिवसात शहरात मुसळधार पाऊस झाल्याने शहरातील बहुतांश भागात घाणीचे साम÷ाज्या पसरले होते यामुळे जन सामान्यांना मोठा त्रास सोसावा लागला. शहरात स्वच्छतेची कोणतीच कामे न झाल्याने तसेच नाल्याची सफाई न झाल्याने नाल्यातील कचरा व घाण रस्त्यावर आली होती. यामुळे रस्त्या-रस्त्यावर दुर्गंधी पसरुन नागरी वस्त्यात रोगांचा पसार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या संदर्भात वर्तमानपत्रांनी रकानेच्या रकाने भरुन वृत्त प्रकाशित केल्याने शेवटी नगराध्यक्षा जयश्री खोबेंनी चक्क रविवारी नगर पालीकेत या संदर्भात बैठक बोलावली. मुख्याधिकारी रवी पवार यांच्यासह स्वच्छता निरीक्षक व इतर अधिकारी व कर्मचारी यावेळी उपास्ंिथती होती. नगराध्यक्षांनी स्वच्छते बाबत अचानक घेतलेल्या या बैठकीमुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान या बैठकीनंतर तरी शहरात ठिकठिकाणी पसरलेली घाण साफ होईल अशी आशा नागरिक व्यक्त करीत आहेत.


 
© Copyrights 2010 marathwadaneta.com - All rights reserved.
of
Powered By: