Last Update: 


 
रेल्वेच्या आंध्राबंडी अधिकारी-कर्मचाऱ्यांचा मुजोरपणा वाढला
-
Monday, May 24, 2010 AT 05:00 AM (IST)
Tags: parbhani,   marathwada

परभणी - सध्या मराठवाड्यातील रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आंध्राबंडी असलेल्या तेलगु अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मुजोरपणाला तोंड द्यावे लागत असुन हे अधिकारी आपल्या अधिकार व पदाचा गैरवापर करत मराठवाड्यातील जनतेवर प्रांतवादी भावनेतुन अन्याय करीत असल्याचा प्रत्यय मराठी माणसाला प्रवास करतांना नेहमीच येत आहे.
बीड वगळता मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातील रेल्वे स्थानकावर तेलगु असेलेले अधिकारी व कर्मचारी मराठवाड्यातील जनतेच्या मानगुटीवर भुतासारखे ठाण मांडून बसले असुन या तेलगु अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सध्या मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांचा अक्षरश: छळ सुरु केला आहे. मराठी भाषकांना अत्यंत हिन व तुच्छतेची वागणुक दिली जात असुन यातुन रेल्वेत कार्यरत असलेले मराठी अधिकारी व कर्मचारीही सुटलेले नसल्याचे समजते. रेल्वेच्या या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांवर अन्याय करण्याची मालीकाच सुरु केली असुन या छळवणुकीला आता पारावार उरलेला नाही. रेल्वे स्थानकावर साध्या तिकिट खिडकीवर सुध्दा काही विचारणा केल्यास हे अधिकारी व कर्मचारी कुत्र्यासारखे खेकसुन अंगावर धावुन येतात, प्रसंगी मारहाणीचे प्रकारही घडले आहे. अर्वाच्य भाषेत बोलुन हाकलुन लावण्या पर्यंत या मुजोर अधिकाऱ्यांची मजल जात आहे. यामुळे प्रवाशांचा मोठ्या प्रमाणात अपमान होत असुनही या अधिकारी व कर्मचाऱ्यांना कायद्याचा कवचकुंडले असल्याने तोंड दाबुन बुक्क्यांचा मार सहन करावा लागत आहे व याचाच फायदा या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उचलण्यास सुरुवात केली आहे. यामुळे मराठवाड्यातील प्रवाशांत संतापाची लाट उसळत आहे. हा छळ मागील अनेक वर्षापासुन करण्यात येत असुन यात उत्तारोत्तर वाढच होत आहे. आंध÷ा पर्यंत येणाऱ्या सर्व गाड्यांना रेल्वेच्या जास्त सोयी-सुविधा पुरवायच्या मात्र त्या गाड्या मराठवाड्यात प्रवेश करताच त्यांच्या बोगींची संख्या कमी करायची, अस्वच्छ व गलीच्छ बोग्या या रेल्वे गाड्यांना जोडायच्या असा प्रकार सध्या या विभागाकडुन होत आहे. दक्षिण मध्य रेल्वेचा हा विभाग म्हणजे मराठवाड्यातील प्रवाशांवर अन्याय करण्यासाठी उभारलेला तळच असल्याचे दिसुन येत आहे. सुडभावेने मराठवाडी जनतेला त्रास देण्यात हे अधिकारी व कर्मचारी धन्यता मानत असुन सर्व एक्सप्रेस गाड्यांना 18 ते 20 डब्बे जोडण्याचा रेल्वे नियम असतांना 10 मे पासुन मराठवाड्यातुन जाणाऱ्या सर्व गाड्यांच्या डब्बने 8 ते 10 आण्णयात येवुन मराठवाडी जनतेवर अन्याय करण्यात येत आहे विशेष म्हणजे आंध÷ातील तेलगु भाषकांची सोय व्हावी यासाठी शिर्डीला जाणाऱ्या सर्व एक्सप्रेस गाड्यांना 22 ते 24 अशा संख्येने बोग्या जोडण्यात येतात. सध्या पॅसेंजर रेल्वे प्रवास म्हणजे नरकयातना समान प्रवास झाला असुन फक्त 6 ते 7 डब्ब्यातुन हजारोच्या संख्येने प्रवासी जिवघेणा प्रवास करीत आहेत याचे या आंध्रावाल्या अधिकाऱ्यांना सोयरसुतक नाही. दक्षिण मध्य रेल्वे महाव्यवस्थापक जयंत परभणी स्थानकाची तपासणी करण्यासाठी येतांना 8 ए.सी. डब्बयांची सुविधा असलेल्या गाडीमधुन फेरफटका मारुन जातो तर सामान्यांसाठी मात्र सहाच ए.सी. डब्बे हा कुठला नियम आहे असा प्रश्न उपास्िथत होत आहे. मराठवाड्यातुन जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यात नागरी सुविधांचा अभाव असुन याकडे शासनाने लक्ष देणे गरजेचे असतांना मात्र तसे होतांना दिसत नाही. यावर उपाय म्हणजे नांदेड विभागा अंतर्गत येणारा सर्व भाग दक्षिण मध्य रेल्वेतुन काढुन मध्य रेल्वेला जोडणे आता गरजेचे झाले असुन मराठवाड्यातील रेल्वे स्थानकावर मराठी अधिकाऱ्यांची नेमणुक करण्यात यावी यामुळे या तेलगु अधिकारी व कर्मचाऱ्यांची मुजोरी कमी होण्यास मदत होणार आहे.
या प्रकारामुळे संतप्त होवुन राजकीय पक्षांनी दक्षिण मध्य रेल्वेच्या या मुजोरीपणा विरुध्द आवाज उठविला असुन येत्या पंधरा दिवसात मागण्या मान्य न झाल्यास आंध्रातील रेल्वेला महाराष्ट्रात प्रवेश करु देणार नसल्याचा इशारा दिला आहे.


 
© Copyrights 2010 marathwadaneta.com - All rights reserved.
of
Powered By: