Last Update: 


 
लोणार येथे नाभीक कर्मचारी महासंघाचे पहिल्या राज्यव्यापी अधिवेशनाची जय्यत तयारी
-
Saturday, April 24, 2010 AT 05:00 AM (IST)
Tags: parbhani,   marathwada

स्वागताध्यक्ष भगवान वाघमारे
परभणी : महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळाद्वारे नाभिक कर्मचाऱ्यांचे राज्यव्यापी अधिवेशन बुलढाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध लोणार सरोवर येथील कै. कु. दुर्गा क. बनमेरू विज्ञान महाविद्यालय लोणार येथे दि. 24 एप्रिल, शनिवार रोजी आयोजित करण्यात आले आहे. अधिवेशनाची जय्यत तयारी पूर्ण झाली असून या अनुषंगाने आयोजित पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. पत्रकार परिषदेत महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे अध्यक्ष कल्याण दळे, स्वागताध्यक्ष भगवान वाघमारे व आयोजक प्राचार्य डॉ. प्रकाश बनमेरु यांनी पत्रकारांना संबोधित केले.
याप्रसंगी महाराष्ट्र नाभीक महामंडळाचे अध्यक्ष कल्याण ढळे यांनी या अधिवेशनात नाभीक समाजाच्या विविध समस्या मांडल्या. नाभिक समाजाच्या समस्यांाबबत शासन उदासिन असून दुर्लक्षीला गेला आहे. तसेच नाभिक समाजाबरोबर बारा बलुतेदारांच्याही याच व्यथा आहेत. या सर्वांसाठी शासनाने स्वतंत्र महामंडळाची स्थापना करावी तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ नाभिक समाजाला मिळाला पाहिजे या प्रमुख मागण्या असल्याचे सांगितले. नाभिक समाजाला अनुसूचित जातीमध्ये समावेश करावा, असा केंद्र शासनाने घेतलेल्या निर्णयाचा देशातील सतरा राज्यात अंमलबजावणी झालेली असून त्याचा लाभ नाभिक समाजाला मिळत आहे. असे असतानाही महाराष्ट्र शासनाने या निर्णयाची अंमलबजावणी केलेली नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे. या निर्णयाचाही त्वरित अंमलबजावणी व्हावी यासाठी शासनास वारंवार पाठपुरावा करण्यात आला असून राज्यकर्त्यांच्या उदासीनतेमुळे याची अमलबजावणी झालेली नाही. याच संदर्भात निवेदन राष्ट्रपतींना नुकतेच दिले असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच नाभिक समाजाविषयीच्या समाजातील भावनेत बदल व्हावा व त्यांना सन्मानाची वागणूक दिली जावी यासाठी ऍट्रासिटी कायद्याच्या धर्तीवर कायदा व्हावा असेही ते म्हणाले. विविध शासकीय योजनाचा लाभ मिळत नाही, नोकरीमध्ये तसेच पदोन्नती देताना डावललेले जाते. ओबीसी आर्थिक महामंडळ स्थापन झाल्यापासून असून पाचशेही नाभिक व्यवसाय करणाऱ्या युवकांनाही कर्ज दिले गेलेले नाही, यास वाचा फोडण्यासाठी व संपूर्ण नाभिक समाजाला एकत्र आणण्यासाठी या अधिवेशनाचे आयोजन केले आहे.
पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या अधिवेशनासाठी उपस्थित राहणाऱ्या मान्यवरांची माहिती देताना स्वागताध्यक्ष भगवान वाघमारे यांनी अधिवेशनाच्या तयारी बाबत माहिती दिली. या राज्यव्यापी अधिवेशनाचे उद्‌घाटन महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी विशेष उपस्थिती म्हणून गृहमंत्री ना. आर.आर. पाटील तसेच प्रमुख पाहुणे म्हणून ना.राजेश भैया टोपे (उच्च व तंत्र शिक्षणमंत्री), विरोधी पक्षनेते आ. एकनाथराव जहरो, ना. मनोहर नाईक (पालकमंत्री बुलढाणा जिल्हा संस्था अन्न व औषधी प्रशासन), ना. लक्ष्मणराव ढोबळे (पाणीपुरवठा व स्वच्छता), ना. गुलाबराव देवकर (राज्यमंत्री कृषि पशुसंवर्धन, इतर मागासवर्गीयच खाते), खा. प्रतापराव जाधव (बुलढाणा जिल्हा), आ. संजय रावमुलकर (मेहकर मतदारसंघ), आ. राजेंद्र भिंगणे (माजी मंत्री), आ. सुरेशदादा देशमुख (विज्ञान परिषद सदस्य, परभणी), आ. डी.पी. सावंत (नांदेड), सुधाकरराव गणगणे (माजी आमदार), प्रकाश सोनवणे (सरचिटणीस), म.प्र. कॉंग्रेस कमिटी, शशिकांत चव्हाण (माजी अध्यक्ष म. नाभिक महामंडळ), बालाजी शिंदे (प्रदेश अध्यक्ष परिट धोबी सेवा मंडळ), चंद्रकांत गवळी (प्रदेश अध्यक्ष सुतार समाज), नगराध्यक्ष (न.प. लोणार) तसेच दहा ते पंधरा हजार नाभिक कर्मचारी उपस्थित राहतील अशी माहिती दिली.
अधिवेशनाचे आयोजक प्राचार्य डॉ. प्रकाश क. बनमेरु (कै.कु. दुर्गा बनमेरु विज्ञान महाविद्यालय लोणार जि. बुलढाणा) यांनी हे अधिवेशन दोन सत्रात होणार असल्याचे सांगितले. सकाळच्या सत्रात या अधिवेशनात समाजाच्या मागण्या जाणून घेण्यासाठी विशेष चर्चा सत्राचे आयोजन 9 वा. श्री संत सोना महाराज सभागृहात पार पडणार आहे. यासाठी कल्याण काळे (अध्यक्ष, महाराष्ट्र नाभिक महामंडळ), जी.एम. कुबडे (न्यायाधीश जिल्हा सत्र व न्यायालय, उस्मानाबाद), विष्णुपंत निंबाळकर (न्यायाधीश जिल्हा व सत्र न्यायालय कोल्हापूर), वसंतराव मुळे (संचालक भूमि अभिलेख औरंगाबाद), बालासाहेब वाघमारे (ग्रंथपाल विधानसभा ग्रंथालय, मुंबई) भास्कर अहिरे (उपसंचालक सामाजिक वनीकरण), अविनाश सुर्वे (अधिक्षक अभियंता पाटबंधारे विभाग, नाशिक), शरद ढोबळे (कार्यकारी अभियंता, यवतमाळ), विजय सोनवणे (तांत्रिक सल्लागार एम.एस.सी.बी.), श्रीमती माया जयकर (सेवानिवृत्त पोलीस अधिक्षक, ठाणे), शशिकांत चव्हाण (माजी अध्यक्ष), मारोतराव गायकवाड, शंकरराव द्रवेकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
अधिवेशनाचा उद्‌घाटन सोहळा दुपारी 1.30 वा. कै. कु. दुर्गा क. बनमेरु विज्ञान महाविद्यालय येथे मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. या राज्यव्यापी अधिवेशनात समाज बांधवाच्या समस्या, समाजावर होणारे अत्याचार, समाजातील सामान्य जनतेचे होणारे शोषण, समाजासाठी प्रगतीच्या दिशा इ. विषयावर शासनाचे लक्ष वेधणार आहे. तसेच समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी नाभिक समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समावेश करावा, दारिद्रय रेषेखालील बांधवांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा. उच्च शिक्षणासाठी आर्थिक तरतूद यासह विविध मागण्यांसाठी समाज बांधवांनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे अध्यक्ष कल्याण ढळे, कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष भगवान वाघमारे, अधिवेशनाचे आयोजक प्राचार्य डॉ. प्रकाश क. बनमेरु, (कै. कु.दुर्गा बनमेरु विज्ञान महाविद्यालय लोणार जि. बुलढाणा) यांनी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केले आहे.
यावेळी नाभिक महामंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. सोबत हे अधिवेशन यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे उपाध्यक्ष दामोदर बिडवे तसेच विभागीय अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष लोणार येथील महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचारी तसेच संस्थेचे सचिव डॉ. संतोष क. बनमेरु अहोरात्र मेहनत आहे. अधिवेशनास हजारोच्या संख्येने येणाऱ्या कार्यकर्त्यांनी चांगली व्यवस्था करण्याचा लोणार येथील समाज बांधव प्रयत्न करीत आहेत.



 
© Copyrights 2010 marathwadaneta.com - All rights reserved.
of
Powered By: