परभणी जिल्ह्यात 108 दिवसात तब्बल 17 खुन
-
Sunday, April 18, 2010 AT 05:00 AM (IST)
परभणी - परभणी जिल्ह्यातील 17 पोलीस ठाण्या अंतर्गत 1 जानेवारी 2010 ते 18 एप्रिल 2010 पर्यंतच्या 108 दिवसात 17 खुन झाले असुन खुनाच्या प्रमाणात वाढ झाली असली तरी खुनाचे सर्वच गुन्हे उघडकीस आले आहेत.
मागील वर्षात एकूण 52 खुन झाले होते त्यापैकी 46 खुन प्रकरणात आरोपी निष्पन्न झाले फक्त सहाच प्रकरणात आरोपींचा शोध पोलीसांना घेता आला नाही यात कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चारठाणा येथील आस्मा शेख हिचा खुन प्रकरण तर नानलपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका वर्षाच्या मुलाचे मुंडके कापुन ईदगाह मैदानात फेकण्याची घटना तर जिंतुर पोलीस ठाणे हद्दीतील सुरेखा नामक महिलेचा अज्ञात व्याक्तिंीकडुन केला गेलेला खुन तर याच ठाण्याच्या हद्दीतील एका अनोळखी इसमाचा खुन याशिवाय पाथरी येथील एका अनोळखी पुरुष जातीच्या इसमाचा खुन तर गंगाखेड येथील अनिल चौधरी यांच्या आखाड्यावर अज्ञात इसमाचा खुन करुन प्रेत टाकण्याची घटना इत्यादींचा तपास मागील वर्षी पोलीसांना लावता आला नाही. चालु वर्षात 108 दिवसात 18 खुनाच्या घटना घडल्या असुन 12 खुन प्रकरणांचा तपास लावण्यात आला असुन 5 खुन प्रकरणाचा तपाव लावता आला नाही. चालु वर्षात जानेवारी महिन्यात 5, फेब÷ुवारी मध्ये 2, मार्चमध्ये 5, एप्रिल महिन्यात 5 खुनाच्या घटना घडल्या आहेत. चालू वर्षात झालेल्या खुन प्रकरणात गंगाखेड पोलीस ठाणे हद्दीत अनुसया गुंडाळे या विवाहितेची सासरच्या मंडळींनी पैशाच्या लोभापायी केलेली हत्या तसेच नानलपेठ पोलीस ठाणे हद्दीत नसीमा बेगम बाबु खुरैशी या महिलेचा पती बाबु खुरैशी याने केलेली हत्या, कालाबावर परिसरातील अहेमद खान या युवकाची झालेली हत्या यांचा समावेश आहे त्याच सोबत पाथरी पोलीस ठाणे हद्दीतील शेख रुखसाना शेख खालेद, सुरय्या शेख नुर या दोघा महिलांची सासरच्या मंडळीकडुन झालेली हत्या या सोबत सुशिला अंबादास काळे या महिलेची ज्या सोबत तिचे अनैतिक संबंध होते त्याच इसमाने दागिन्यासाठी तिचा केलेला खुन तसेच द्रोपदा गंगाधर भोसले या महिलेचा तिच्या पतीने चारित्र्याच्या संश्यावरुन केलेली हत्या, बामणी पोलीस ठाणे हद्दीतील जनाबाई या महिलेचा घेण्यात आलेला हुंडाबळी याच सोबत नानलपेठ पोलीस ठाणे हद्दीत मुकादम शेख फेरोज शेख जिलानी याने केलेला मजुर शेख अफजल याचा खुन तर गंगाखेड पोलीस ठाणे हद्दीतील भारत अर्जुन मिसाळे या इसमाचा खुन करुन धारखेडा येथील मोंगळे यांच्या शेतात फेकण्याची घटना व बोरी पोलीस ठाणे हद्दीतील संदीप धोंडीराम याचा दगडाने ठेचुन करण्यात आलेला खुन व याच ठाण्याअंतर्गत सिताबाई विष्णू चव्हाण या महिलेचा पती व दिराने मिळुन केलेली हत्या या सोबत पुर्णा येथील विटभट्टीचालक महेबुब खान नजरखान याची अज्ञात मारेकऱ्याने केलेली हत्या या घटनांचा समावेश आहे. पुर्णा येथील प्रकरणानंतर ना. फौजिया खान यांनी पोलीस निरीक्षक काळे यांच्या विरोधात वरिष्ठ पातळीवर तक्रार केल्याने त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. आता पर्यंत झालेल्या या वर्षातील खुन प्रकरणात सर्वाधिक खुन महिला अत्याचार व हुंडाबळी या कारणानेच घडले असुन उर्वरित काही खुन चारित्र्याच्या संशयावरुन घडले आहेत.