कतरिनाने राष्ट्रपती बनावं: काटजू

JUDGE MARKANDEY KATJU_1शपथविधीला ‘शीला की जवानी’ गायला हवं: काटजू

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती आणि प्रेस काऊन्सिल ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष मार्कंडेय काटजू यांनी बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफला देशाची राष्ट्रपती बनण्याचा सल्ला दिला आहे. कतरिना कैफला प्रेसिडेंट ऑफ इंडिया बनवावं, असं काटजूंनी त्यांच्या ब्लॉगमध्ये लिहिलं आहे. “काही दिवसांपूर्वी क्रोएशियामध्ये एक सुंदर महिला राष्ट्रपती बनली आहे. आर्थिकदृष्ट्या ढासाळलेलं क्रोएशिया जर मिस ग्रॅबर किटरोव्हिक यांना राष्ट्रपती बनवू शकतं, तर आपण का नाही?,” असा सवाल त्यांनी या ब्लॉगमध्ये विचारला आहे.पण कतरिनाला राष्ट्रपती बनवण्यासाठी त्यांनी एक अट घातली आहे. “राष्ट्रपती बनल्यानंतर शपथविधी सोहळ्यात कतरिनाने तिचं फेमस गाणं ‘शीला की जवानी’ गायला हवं.”

आडतमुक्ती संदर्भात अंबेजोगाईत बैठक

लातूर, दि. 2 :…..आडतमुक्तीच्या स्थगितीला 5 जानेवारी रोजी 15 दिवस पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनेने मराठवाड्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक दि. 5 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजता अंबाजोगाई येथे बाजार समिती सभागृहात आयोजीत केली आहे. या बैठकीत आडतमुक्तीची स्थगिती सरकारने 5 जानेवारी पर्यंत उठविली नाही तर पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी ही बैठक बोलविण्यात आली आहे. तरी या बैठकीला जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन शेतकरी संघटनेच्यावतीने शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार सस्तापुरे, तालुकाध्यक्ष रुपेश शंके, रतन इंद्राळे, हरिश्चंद्र सलगरे, रामचंद्र खंदाडे, बजरंग बिरादार, कालिदास भंडे, मोहन गणगे, नागनाथ अलापुरे, ऍड. संतोष शिंदे, सुदर्शन केदार, सिद्धेश्र्वर बिराजदार, प्रदीप शेंडगे आदींनी केले आहे.

पोलीस दलाचा वर्धापन दिन

उस्मानाबाद, दि. 2 :…..महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त 8 जानेवारी या कालावधीत जिल्हा पोलीस दलाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
तत्कालीन पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र पोलीस दलाचा ध्वज महाराष्ट्र पोलीस दलास अर्पण केला होता. त्यानिमित्त प्रतीवर्षी 2 जानेवारी हा दिवस महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यात कार्यक्रम होणार आहेत. पोलीस ठाण्यास भेट देणार्‌या विद्यार्थ्यांना कामकाजासह शस्त्रास्त्रांची माहिती देणे, वाहतुकीचे नियम, महिला अत्याचार विरोधी कायदे, चित्रकला, रांगोळी स्पर्धा, महिला अत्याचार प्रतिबंधक या विषयावर कार्यशाळा, तपासावरील गंभीर गुन्ह्याबाबत तक्रारदारांना बोलावून गुन्ह्याच्या प्रगतीची माहिती देणे, शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या नियमांची माहिती देणे, सामाजिक प्रसार माध्यमे, इंटरनेट वापराद्वारे आर्थिक व्यवहाराची काळजी घेणे, पोलीस ठाणे स्तरावर किमती मुद्देमालाबाबत मोहीम राबवून कायदेशीर बाबी पूर्ण करून घेणे, मुद्देमाल फिर्यादीस परत करणे, नागरिकांना पोलीस विभागाच्या कामकाजाची माहिती देणे आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. तरी जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी, व्यापारी, नागरिकांनी या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन पोलिस अधीक्षक अभिषेक त्रिमुखे यांनी केले आहे.

माणुसकी हा माणसाचा सर्वश्रेष्ठ गुण : प्रा. लोंढे

लातूर, दि. 2 :…..प्रत्येकजण श्रेष्ठ, महान आहे. जगात शून्य आहे म्हणून संख्येला किंमत आहे. जे जे वाईट आहे, ते चांगल्या गोष्टीमुळे आहे. प्रत्येक महान व्यक्ती ही कष्टातून, गरीबीतून मोठी झालेली आहे. कोणतेही काम हाती घेतांना आधी विचार करा, चिंतन, मनन करा निश्चितच त्यातून चांगले कार्य हाती येईल. विशिष्ट ध्येय बाळगा. गुणवत्ता कमी असू द्या. पण नीट-नीटके, स्वच्छ राहायला शिका. माणसातला सर्वात महत्त्वाचा गुण माणुसकी आहे. तो गुण आपण सर्वांनी विकसीत करायला हवा. खरी प्रगती ही कष्टकऱ्यांची, गरिबांची होत असते. त्यामुळे कोणतेही श्रम हे तुच्छ, हलके मानू नका. श्रमप्रतिष्ठा ही देशाच्या विकासासाठी, खुप आवश्यक आहे असे मौलीक मार्गदर्शन प्रा. दादासाहेब लोंढे यांनी केले. श्रीमती सुशीलाबाई देशमुख महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत नववर्षानिमित्त संकल्प म्हणून स्वच्छतेची शपथ विद्यार्थ्यांना देण्यात आली त्याप्रसंगी ते बोलत होते. विद्यार्थ्यांच्या मनात स्वच्छतेची जाणीव व्हावी. स्वच्छतेची बीजे या तरुणपिढीत रुजली पाहिजेत. हा उद्देश लक्षात घेऊन संकल्प नववर्षाचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.बी.ए. कांबळे यांनी केले. प्राचार्य डॉ. अजय पाटील अध्यक्षीय समारोपात बोलतांना म्हणाले की, नववर्षाचे आपण स्वच्छ भारत – स्वच्छ महाविद्यालय असा संकल्प करुन करु या. केवळ महाविद्यालय परिसर स्वच्छ करुन स्वच्छता होणार नाही तर मनापासून आपण आरोग्यपूर्ण जीवन लाभण्यासाठी स्वच्छता करावी. श्रमाचे महत्त्व लक्षात घेऊन श्रमप्रतिष्ठा विकसीत केली पाहिजे, असे मार्गदर्शन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
याप्रसंगी विद्यार्थ्यांनीही स्वच्छतेसंदर्भात आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शंकर चव्हाण यांनी केले. तर आभार प्रा.डॉ. सुरेखा बनकर यांनी मानले. यावेळी विद्यार्थी-विद्यार्थीनी व प्राध्यापक उपस्थित होते.

पहिल्या मुख्याध्यापिका : सावित्रीबाई फुले

सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यात खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे झाला. खंडोजी नेवसे हे इनामदार पाटील लोकप्रिय खंडोजींच्या पोटी जन्मास आलेल्या सावित्रीबाई च्या जन्माने अवघा गावच आनंदीत झाला. घरातील चांगल्या संस्काराचा परिणाम लहान वयापासूनच सावित्रीवर झाला.
पूर्वी लहान वयातच लग्न करण्याची पद्धत होती. 1840 मध्ये सावित्रीबाईचा विवाह जोतिबांशी झाला तेव्हा जोतिबाचे वय 13 वर्षे आणि सावित्रीबाईंचे वय 9 वर्षे होते. लग्न झाले तेव्हा त्या पूर्ण निरक्षर होत्या. कमी वयातच संसाराचे ओझे त्यांना पेलावे लागले. 19 व्या शतकात तर स्त्रियांना पेशव्याच्या व सरदारांच्या चंगीभंगी चाळ्यांनी समाजात वावरणेही अशक्य झाले होते. स्त्रियांवर खूप अन्याय केल्या जात होता. स्त्रियांची अज्ञान व गुलामगिरीतून मुक्तता करण्यासाठी सावित्रीबाई हयातभर झगडल्या. स्त्री मुक्तीच्या लढ्याची सुरुवात सावित्रीबाई फुले यांनी केली. दारिद्र्य अशिक्षितपणा आणि भोळ्या धर्मसमजुतीचा अंधार नाहीसा करण्यासाठी थोर समाजक्रांतिकारक ज्योतीबा फुलेंनी ज्ञानाचा दिवा लावला. त्या दिव्यातील ज्योत बनले जोतिबा व तेल झाली सावित्रीबाई. या ज्ञानाच्या दिव्याने प्रकाशाचा पहिला किरण स्त्री शुद्रांच्या जीवनात शाळेच्या पहिल्या रुपाने आणला. स्त्रियांच्या शिक्षणाचे व समाजिक जागृतीचे महान कार्य सावित्रीबाईच्या हातून घडले.
सावित्रीबाई धैर्यवान होत्या ते कोणालाही डगमगत नव्हत्या. कोणी वाटेत आलेच तर त्यांच्या कानशिलात लगावत. जोतिबांनी मुलींसाठी काढलेल्या भिडे वाड्यातल्या शाळेत सावित्रीबाई विनावेतन अध्यापनाचे काम करु लागल्या. पण त्या काळी शिक्षिकेचे काम करणे ही साधी सुधी गोष्ट नव्हती. सावित्रीबाई शाळेत जात येत असतांना लोक त्यांना अपमानास्पद भाषा वापरत असे. काही कर्मठ लोक त्यांच्या अंगावर चिखल, शेण फेकीत, त्यांना दगड मारित पण सावित्रीबाईंनी आपले कार्य निष्ठेने चालूच ठेवले. एवढा छळ शांतपणे सोसून त्यांनी आपले शिकविण्याचे काम चालूच ठेवले. बायकांनी शिकणे हे महापाप आणि त्यांना शिकविणे तर महाभयंकर पाप असे त्या काळी सर्व समाज समजत होता. केवळ शिक्षणाच्या शाळा उघडल्याने सावित्रीबाई समाधान नव्हत्या. समाजातल्या बालविधवांचे जिणे, कुमारी मातांची स्थिती त्यांना बेचैन करीत होती. वाट चुकलेल्या स्त्रियांचे स्वत: बाळंतपण केले आणि जन्माला आलेल्या मुलांची नाळ स्वत:च कापून 12 व्या दिवशी त्या मुलाचे नाव यशवंत ठेवले. वाट चुकलेल्या बालविधवांची जी केविलवाणी स्थिती होती त्यावर विचार करुन सावित्रीबाई व जोतीबांनी 28 जानेवारी 1853 रोजी बालहत्त्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. बालहत्त्या प्रतिबंध गृहातल्या मुलांची सावित्रीबाई खूपच काळजी घेत. त्या गृहातल्या मुलांची अविरतपणे वात्सल्याने सेवा करीत त्यांना स्वत:ला अपत्य नव्हते. जोतीबांनी ज्या काशीबाईस वाचवले तिच्या पोटी इ.स. 1873 मध्ये मुलगा जन्मास आला. हे मूल कोणाचे याची काहीही माहिती नसताना या जोडप्याने मुलाला अतिशय प्रेमाने वाढवले व पुढे त्यालाच दत्तक घेतले. आपल्या सामाजिक कार्याचा वसा या मुलाने पुढे चालवावे म्हणून त्याला डॉक्टर केले. ते जातिभेद मानत नव्हते.
स्त्रियांनी तिचे हक्क मिळालेच पाहिजेत याची जाणीव करुन देण्यासाठी शिक्षणाची आवश्यकता आहे. हा जोतिबांचा विचार त्यांनासुद्धा पटलेला होता म्हणून त्यांनी शिक्षणाच्या कार्यास वाहून घेतले.
स्त्रियांना गुलामी व अज्ञान यातून मुक्त करण्यासाठी सनातनी समाजाविरुद्ध स्त्री शिक्षणाची लढाई सुरु करण्याचा निर्णय झाल्यानंतर या लढाईतल्या पहिल्या खंद्य़ा कार्यकर्त्या म्हणून त्यांनी उडी घेतली आणि आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ते वसा मोठ्या धैर्याने व निष्ठेने चालवला. काव्यफुले, बावणकशी, सुबोध रत्नाकर इत्यादी ग्रंथ संपदा होती.
बालपणी वडिलाच्या धाकात, तरुणपणी पतीच्या धाकात व वृद्धपणी मुलाच्या धाकात अशीच स्त्री राहिली पाहिजे ती स्वतंत्र राहण्यास पात्रच नाही अशा विचारसरणीच्या लढ्याच्या आद्य प्रणेत्या म्हणणेच योग्य होईल. सावित्रीबाईनी केलेल्या कार्याचे फलित आज आपल्याला पाहावयास मिळते. आजच्या स्त्रियांनी तिचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कार्य करावे एवढीच अपेक्षा. अशा या महान कार्य केलेल्या स्त्रीय जग विसरु शकत नाही. देशासाठी ज्या स्त्रियांनी कार्य केले त्यामधील सावित्रीबाई ही एक. अशा स्त्रीचा मृत्यू 10 मार्च 1897 रोजी झाला. अशा महान स्त्रिस तिच्या जन्मदिनी कोटी-कोटी प्रणाम !
अशोक गंगाधरराव मोरे
मु.पो. पानशेवडी, ता. कंधार, जि. नांदेड
मोबा. 8275243446

 

बसवेश्र्वराचा शेख स्पर्धेत तृतीय

लातूर, दि. 2 :…..येथील महात्मा बसवेश्र्वरच्या मुसद्दीक शेखला शालेय राज्यस्तरीय किक बॉक्सींग स्पर्धेत सर्वतृतीय क्रमांक प्राप्त झाले.
जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय, सातारा यांच्या वतीने आयोजित शालेय राज्यस्तरीय किक बॉक्सींग स्पर्धेत महाविद्यालयात 12 वी वाणिज्य शाखेचा मुसद्दीक शेख याने तृतीय क्रमांक मिळवत महाविद्यालयाच्या नाव लौकीकात भर टाकली.

महाराष्ट्र भूषण डॉ. अभय बंग यांचे व्याख्यान

लातूर, दि. 2 :…..आपल्या मनातील महाराष्ट्राच्या नकाशात गडचिरोलीची दखल असत नाही. अधिकाऱ्यांना ते काळ्या पाण्यापेक्षा भयाण शिक्षा वाटते. अशा आदिवासी, दरिद्री व दुर्गम भागात, गेल्या 30 वर्षापासून डॉ. अभय व डॉ. राणी बंग हे दाम्पत्य वैद्यकीय सेवा देत आहे. आदिवासी भागात बालपणातील कुपोषणामुळे त्यांच्या आरोग्याची दैना उडते. बालकांची वाढच व्यवस्थित होत नाही, बालपणातच असंख्य रोग जडतात. हे सिद्ध करुन बंग दाम्प्त्यांनी कुपोषणाच्या जीर्ण समस्येला राष्ट्रीय पातळीवर आणले. त्या भागातील सर्वसामान्यांनाच आरोग्यदूत करुन बालमृत्यू रोखण्यासाठी कृती आराखडा अंमलात आणला. त्यांच्या शोधनिबंधाचा जगभर सन्मान झाला. त्यांनी सुचवलेल्या उपाययोजना जागतिक आरोग्य संघटना व युनिसेफ यांनी स्वीकारले आहे.

संपूर्ण देशातील सामाजिक कार्यकर्त्यांसाठी डॉ. अभय व डॉ. राणी बंग यांचं शोधग्राम हे स्फूर्तीस्थान झालं आहे. मी मी आणि केवळ मी मध्ये रममाण होत चाललेल्या तरुणांनी सामाजिक कार्याची जबाबदारी का व कशी घ्यावी याचं प्रशिक्षण देण्याकरिता डॉ. बंग यांनी निर्माण उपक्रम चालू केला आहे. असंख्य राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय गौरवांनी सन्मानित डॉ. अभय बंग हे लातूरात प्रथमच येत आहेत. गुरुवार दि. 8 जानेवारी रोजी सायंकाळी 5.30 वाजता, दयानंद सभागृहात डॉ. अभय बंग हे आपल्याशी संवाद साधणार आहेत. स्वामी लातूरकरांनी आपण अवश्य उपस्थित राहावे असे आवाहन श्रीनिवास लाहोटी, सुमती जगताप, लक्ष्मीरमण लाहोटी व रमेश बियाणी यांनी केले आहे.

मनपासमोर नाथजोगी समाजातील मृतदेहाची विटंबना

* अंत्यसंस्कारासाठी खड्डा खोदण्याचा प्रयत्न
लातूर, दि. 2 :…..नाथजोगी समाजाला स्मशानभूमीसाठी जागा मिळत नसून या समाजातील एका व्यक्तीचे निधन झाले परंतु त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा मिळत नसल्याने या समाजातील पुरुष व नागरिकांनी महापालिकेसमोर आंदोलन करुन मृतदेहाच्या अंत्यसंस्कारासाठी खड्डा खोदण्याचा प्रयत्न केला परंतु पोलीसांनी वेळीच हस्तक्षेप करुन तो थांबविला.
याबाबत अधिक माहिती अशी की, वैजनाथ धोंडीराम हिंगमिरे वय 25 रा. आनंदनगर झिन्नत सोसायटी लातूर याचा गुरुवारी सायंकाळी 4 वाजता आजाराने मृत्यू झाला. हा नाथजोगी समाजाचा व्यक्ती होता. त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी सिद्धेश्र्वर मंदिराच्या बाजूला असलेल्या लिंगायत स्मशानभूमीत खड्डा खोदण्यात आला व त्याच्याच बाजूला मुस्लिम समाजाच्या स्मशानभूमीत खड्डा खोदण्यात आला मात्र दोन्ही खड्डे बुजवून त्या त्या समाजातील लोकांनी याला विरोध केला त्यामुळे हा मृतदेह 27 तास अंत्यसंस्काराविना राहिला.
नाथजोगी समाजातील व्यक्तीला अंत्यसंस्कारासाठी जागा मिळत नसल्याने या समाजातील नागरिकांनी महापालिका उपायुक्त दांडेगावकर यांच्याकडे हा मृतदेह महापालिका आवारात दफन करण्यासाठी परवानगी द्यावी असे निवेदन सादर केले. व खोऱ्या टिकाव घेवून महापालिकेच्या समोरच्या गार्डन भागात मृतदेह दफन करण्यासाठी खड्डा खोदण्याचा प्रयत्न केला मात्र शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिंदे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप केला व हे खड्डा खोदण्याचे थांबविले.
दरम्यान नाथजोगी व वैदू समाजाला स्मशानभूमीसाठी जागा द्यावी याकरिता रिपाइंचे गटनेते चंद्रकांत चिकटे यांनी महापालिकेत प्रयत्न करुन त्यासंदर्भात गेल्या अडीच ते तीन वर्षापासून आंदोलन करीत आहेत. वैदू समाजाच्या स्मशानभूमीसाठी दि. 26.6.2001 व 27.2.2001 ला नगर पालिकेत ठराव झाला होता. नांदेड रोडच्या बाजूला स्मशानभूमीसाठी जागा देण्यात आली होती त्याला त्या भागातील नागरिकांनी कोर्टातून स्टे आणला म्हणून नाथजोगी समाजाच्या स्मशानभूमीचा प्रश्न अद्यापही कायम आहे. याप्रकरणी पोलीसांनी हस्तक्षेप करुन या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. परंतु या घटनेमुळे महापालिकेत वातावरण चांगलेच तापले होते.

विज्ञानातून कल्पनेला वाव, विकासाला गती मिळते

जि.प.सीईओ दिनकर जगदाळे
लातूर, दि. 2 :…..
विज्ञान प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानाला, कल्पनेला वाव मिळतो. त्यातून देशाला, राज्याला नव्हे विश्र्वाला नवीन विज्ञानाची निर्मिती होते त्यामुळे विकासाला गती मिळते, असे विचार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी दिनकर जगदाळे यांनी व्यक्त केले.
जिल्हा परिषद शिक्षण विभाग व स्वामी विवेकानंद विद्यालय एम.आय.डी.सी. यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 40 व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्‌घाटन आ. विनायकराव पाटील यांच्या हस्ते झाले यावेळी जगदाळे बोलत होते. अध्यक्षस्थानी जि.प. उपाध्यक्ष अण्णासाहेब पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून सभापती कल्याणराव पाटील, वसंतराव पाटील, शिक्षक संघटनेचे धुमाळ आदी उपस्थित होते.
विज्ञानाच्या जोरावरच कोणत्याही देशाची प्रगती, विकास गतीने होतो त्यामुळे विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करणे ही काळाची गरज आहे असे बोलून दिनकर जगदाळे म्हणाले की, विज्ञान प्रदर्शनातून ज्ञान, कल्पना व जिज्ञाशा प्रवृत्तीला वाव मिळतो. विज्ञान प्रदर्शनात जिल्ह्यातील माध्यमिक आणि प्राथमिक शाळातील 132 प्रयोगाचे सादरीकरण करण्यात आले. त्यात पवनऊर्जा यंत्र, हवा शुद्धीकरण सयंत्र, ऊर्जा संसाधने व संवर्धन, अपारंपारिक ऊर्जा स्त्रोताचा प्रभावी वापर, घर्षन विद्युत, मानवी पवन संस्था यासह विविध विषयांवर प्रयोग सादरीकरण करण्यात आले.
यावेळी आ. विनायकराव पाटील, जि.प. उपाध्यक्ष अण्णासाहेब पाटील, कृषि सभापती कल्याणराव पाटील यांनीही विचार मांडले. प्रास्ताविक शिक्षणाधिकारी डॉ. गणपतराव मोरे यांनी केले. सूत्रसंचालन आर.एस. शिंदे व सौ. अंकुशे अलका तर आभार उपशिक्षणाधिकारी आर.एम. गारकर यांनी मानले.

म. पैगंबर जयंती उद्या व्याख्यान

लातूर, दि. 2 :…..हजरत मोहम्मद पैगंबर जयंतीच्या निमित्ताने दि. 4 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे जाहीर सभा व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. बेंगलोर येथील हजरत मौलाना सय्यद अन्जरशाह यांचे मार्गदर्शन होणार असून नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अजिज बागवान, महापौर अख्तर शेख, मोईज शेख, मौलाना इस्माईल कास्मी, मौलाना अली अहमद, मौलाना हाफीज अ. जब्बार, मौलाना म. जावेद मुफ्ती याकूबसाब, सय्यद शरफोद्दीन, मुफ्ती अब्दुला कास्मी आदींनी केले आहे.

प्रदेशाध्यक्षपदासाठी दानवेंच्या नावावर शिक्कामोर्तब

raosaheb danweमुंबई, दि. 2 :…..भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून अखेर केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय. आज (शुक्रवारी) मुंबईत भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत झालेल्या भाजपच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. लवकरच दानवे यांच्या नावाची अधिकृत घोषणा होण्याची औपचारिकता बाकी आहे.
विधानसभा निवडणुकीपुर्वीच जालन्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी प्रदेशाध्यक्षपदावर दावा केला होता. अखेर त्यांनी आपला शब्द खरा करून दाखवलाय. रावसाहेब दानवे यांच्या गळ्यात प्रदेशाध्यक्षपदाची माळ पडलीये. प्रदेशाध्यक्षपद आपल्याला मिळावे यासाठी रावसाहेब दानवे यांनी दिल्ली दरबारी वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन जाहीरपणे दावाही केला होता. विधानसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रिपदी निवड झाल्यानंतर प्रदेशाध्यक्षपद रिक्त झाले. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपदी कुणाची निवड होणार याची चर्चा सुरू झाली. पण मंत्रिमंडळाचा विस्तार, सेनेच्या सत्तेत सहभागामुळे प्रदेशाध्यक्षपदाची निवड लांबणीवर पडली. अखेर आज भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा मुंबईत आले असता प्रदेशाध्यक्षपदाबाबत चर्चा झाली. यावेळी दानवे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं कळतंय. रावसाहेब दानवे सध्या केंद्रात राज्यमंत्री आहेत. ग्राहक हक्क, अन्न आणि नागरी पुरवठा खातं त्यांच्याकडे आहे. रावसाहेब दानवे हे मुंडे गटाचे मानले जातात. त्यामुळेच प्रदेशाध्यक्षपद निवड करण्यात आलीये.

डॉ. वसंत गोवारीकर कालवश

gowrikarपुणे, दि. 2 :….. अवकाश संशोधन, हवामान आणि लोकसंख्या या तीन क्षेत्रात संशोधन करणारे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. वसंत गोवारीकर (81) यांचे पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये निधन झाले. मूलभूत समस्यांची जाण असणारा संशोधक अशी डॉ. गोवारीकर यांची ख्याती होती. पॉलिमर केमिस्ट्रीत त्यांनी केलेले संशोधन जगभर गाजले. डॉ. विक्रम साराभाई यांच्यासोबत भारतीय अवकाश तंत्रज्ञानाच्या प्रगतीतही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
डॉ. गोवारीकर यांच्या नेतृत्वाखाली 1983 मध्ये एसएलव्ही तीन यान ही मोहीम यशस्वी झाली होती. पंतप्रधानांचे विशेष सल्लागार म्हणून 1991 ते 1993 या काळात त्यांनी काम केले होते. त्यांनी 1994 ते 2000 दरम्यान मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्षपद भूषवले होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे ते माजी कुलगुरू होते.
अनेक पुस्तके आणि शेकडो विज्ञान निबंध त्यांच्या नावावर आहेत. आय प्रेडिक्ट हे भारतीय लोकसंख्येवरील भाष्य करणारं त्यांचं पुस्तक प्रसिद्ध आहे. पद्मश्री, फाय फाऊंडेशन पारितोषिक, नायक सुवर्णपदक, अनेक विद्यापीठांच्या डॉक्टरेट्‌स अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं होतं.

महाराष्ट्र गारठला

????????????????????????????????????????????????????????????मुंबई, दि. 2 :…..बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाचे सत्र सुरूच आहे. त्यातच भर म्हणजे, येत्या काही तासांत विदर्भात गारपिटीचे पूर्वानुमान प्रादेशिक हवामानखात्याने वर्तवले आहे. मुंबई किनाऱ्यालगतच्या प्रतिचक्रीवादळामुळे शहरात ढगाळ वातावरण असून वाऱ्यांची दिशा बदलल्याने दिवसाही गारठा जाणवत आहे.
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मराठवाड्यातील काही भागांमध्ये पावसाने हजेरी लावली होती. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पूर्व भारतात पाऊस आण्ि गारपिटीची शक्यता वर्तवण्यात येत असून या बदलांचा फटका येत्या काही दिवसांत बसण्याचे अनुमान हवामानखात्यातर्फे वर्तवण्यात येत आहे. मध्य महाराष्ट्र आण्ि मराठवाडा या भागांत अवकाळी पावसाची शक्यता असून विदर्भात गारपीट होण्याची शक्यता, प्रादेशिक हवामानखात्याचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी वर्तवली आहे.

सुभाष क्रॉकरी वर्ल्डचे शानदार उद्‌घाटन

crokriलातूर, दि. 2 :…..येथील मस्जिद रोडवर सुभाष क्रॉकरी वर्ल्डच्या तिसऱ्या शाखेचे शानदार उद्‌घाटन डॉ. अनिल राठी यांच्या हस्ते एका समारंभात करण्यात आले. सुभाष क्रॉकरी वर्ल्ड या फर्ममधून बोन चायना, क्रॉकरी, ग्लासवेअर, टेबलवेअर, मोलामाईन, थर्मोनिअर, होम अपलायन्सेस सह विविध आकर्षक वस्तू लातूरकरांसाठी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.
सुभाष क्रॉकरी वर्ल्डच्या उद्‌घाटनप्रसंगी दै. मराठवाडा नेताचे संपादक प्रा. रामेश्र्वर बद्दर, कांताप्रसाद राठी, नगरसेवक विक्रांत गोजमगुंडे, कमलकिशोर अग्रवाल, डॉ. सुरेश भट्टड, डॉ. शर्मा, कमलकिशोर अग्रवाल, जयप्रकाश विजयगोपाल अग्रवाल, नंदकिशोर पपरुनिया, प्रकाश कासट, दयानंद मित्तल, अभिमन्यू रासुरे, प्राचार्य बुके, विनोद अग्रवाल, श्रीरंग अग्रवाल, आनंदकिशोर राठी, मुकेश ब्रिजवासी, रामेश्र्वर तिवारी आदी उपस्थित होते. पाहुण्यांचे स्वागत सत्यनारायण अग्रवाल, रमेश अग्रवाल, संजय अग्रवाल, मनिष अग्रवाल, डॉ. अनुप अग्रवाल, मुकेश अग्रवाल आदींनी केले.
** सुभाष क्रॉकरी वर्ल्ड या नवीन फर्मचे उद्‌घाटन करतांना डॉ. अनिल राठी सोबत दै. मराठवाडा नेताचे संपादक प्रा. रामेश्र्वर बद्दर, विक्रांत विक्रम गोजमगुंडे, अभिमन्यू रासुरे, सत्यनारायण अग्रवाल, रमेश अग्रवाल, आतिष अग्रवाल, नंदकिशोर अग्रवाल, शशिभूषण अग्रवाल, प्रकाश कासट, विनोद अग्रवाल, संजय अग्रवाल

अस्मितादर्श साहित्य संमेलन आजपासून

Asmita darshanअस्मितादर्श साहित्य संमेलन आजपासून
संमेलनाध्यक्ष नागराज मंजुळे नांदेडात दाखल, खा.अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते उद्‌घाटन
नांदेड, दि.2 :…..येथील कै.हरीहरराव सोनुले साहित्य नगरी (कुसुम सभागृह) येथे 32 व्या अस्मितादर्श साहित्य संमेलनास उद्यापासून (दि.3) सुरूवात होणार आहे. या संमेलनाची तयारी पुर्ण झाली असून संमेलनाध्यक्ष आंतरराष्ट्रीय किर्तीचे चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे हे नांदेड शहरात दाखल झाले असून सकाळी 9.30 वा. राज्याचे माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांच्याहस्ते संमेलनाचे उद्‌घाटन होणार आहे.
दि.3 जानेवारी रोजी सकाळी 8 वा. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळयापासून संविधान ग्रंथ रॅली आयोजित केली आहे. सकाळी 9.30 वा. माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्‌घाटन होणार आहे. यावेळी अ.भा.मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष प्रा. फ. मु. शिंदे, 31 व्या अस्मितादर्श साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.कृष्णा किरवले, प्रसिद्ध समीक्षक डॉ.वासुदेव मुलाटे, डॉ.दादा मोरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
अस्मितादर्श ज्येष्ठ लेखक पुरस्कार देवून प्रा.दामोदर मोरे, डॉ. डी. बी. जगत्पुरिया व डॉ.छाया निकम व उषा अंभोरे यांना अस्मितादर्श ज्येष्ठ लेखिका पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येणार आहे. दुपारी 1 वा. दलित साहित्य हेच भारतीय साहित्य या विषयावर डॉ.ताराचंद खांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद आयोजित केला आहे. या परिसंवादामध्ये डॉ.मिलींद बागुल, डॉ.कमलाकर कांबळे, डॉ.इसादास भडके, डॉ.सतीश मस्के, डॉ.अशोक पळवेकर, डॉ. अनिल सपकाळे, डॉ.निळकंठ शेरे, डॉ.रघुनाथ केंगार हे सहभागी होणार आहेत. दुपारी 3.30 वा. बाळ अल्हाल यांच्या अध्यक्षतेखाली कथा-कथन होणार असून यामध्ये योगीराज वाघमारे, तु.लिं.कांबळे, अर्जुन व्हटकर, के.व्ही.सरवदे, आत्माराम गोडबोले, विलास सिंदगीकर, अनिता येलमाटे, संघमित्रा खंदारे आदी कथाकार सहभागी होणार आहेत. सायंकाळी 6.30 वा. दलित स्त्री मु्नती चळवळ, माझी बांधीलकी माझे लेखन या विषयावर उर्मिला पवार यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होणार आहे. या परिसंवादामध्ये डॉ.शामल गरूड, डॉ.नंदा तायवाडे, डॉ.आशा थोरात, प्रा.अर्चना हत्तेकर, प्रा.अरूणा लोखंडे, प्रा.सुशिला मुल-जाधव, डॉ.छाया निकम, डॉ.तस्निम पटेल, प्रा.आशालता कांबळे आदी सहभागी होणार आहेत. सायंकाळी 7.30 वा. प्रा.अशोक थोरात यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन होणार आहे.

बीएसएनएल मोबाईल, इंटरनेट ठप्प

BSNL_Logoलातूर, दि. 2 ः…..शुक्रवारी बीएसएनएलचे भ्रमणध्वनी अर्थात मोबाईल सकाळपासून, दुपारपर्यंत चाललेच नाहीत. अनेक नागरिकांनी बीएसएनलच्या या अकार्यक्षमतेवर बोटे मोडली. काही केल्या 94 पासून चालू होणारा क्रमांक लागत नसल्याने ग्राहकांमध्ये तीव्र असंतोष पसरला होता. या कंपनीची इंटरनेट सुविधादेखील कोलमडल्याने अनेकांना या सेवेचा फटका बसला.
दूरसंचारच्या बाबतीत ग्राहकांचा अनुभव अत्यंत वाईट असा ठरत आहे. सकाळपासून दुपारपर्यंत तरी 94 पासून चालू होणारे अर्थात बीएसएनएलचे मोबाईल क्रमांक लागत नव्हते. या क्रमांकाचे फोन लावत असताना नॉट रिचेबल, नेटवर्क नॉट अव्हेलेबल, कृपया संबंधीत ऑपरेटरशी संपर्क साधा, आपण चुकीचा क्रमांक फिरविला आहे अथवा हा क्रमांक अस्तित्वातच नाही असा मॅसेज ग्राहकांना ऐकावा लागला. शाळा, महाविद्यालय, अन्य व्यवहार, शासकीय कामकाज, व्यापार, विद्यार्थी, पत्रकार, राजकीय कार्यकर्ते एवढेच नव्हे तर आज प्रत्येक मजुराच्या हातातदेखील मोबाईल आला आहे. या प्रत्येक मोबाईल धारकारला याचा त्रास झाला. दूरसंचार कंपनीचे मोबाईल फोन लागत नसल्याने दळणवळणावर याचा परिणाम झाला. दूरसंचारच्या ग्राहकांमध्ये या प्रकाराने मोठी चिड निर्माण झाली आहे.

अमित शहा मीडिया कव्हरेजवर असमाधानी?

14-Amit-Shahनवी दिल्ली, दि. 2 :…..हिंदुत्त्व, लव्ह जिहाद आणि धर्मांतरासारख्या मुद्यांवरून विरोधकांनी सरकारला घेरले आहे. त्यामुळे भाजपला आपली प्रतिमा मलिन होत असल्याची चिंता सतावते आहे. या पार्श्वभूमीवर देशातील प्रसारमाध्यमातील कव्हरेजवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा असमाधानी असल्याचे दिसत आहे. त्यामुळे भाजपच्या पाच केंद्रीय मंत्र्यांना दररोज मीडियाशी वार्तालाप करण्याची परवानगी लवकरच मिळण्याची शक्यता आहे.

या संदर्भात अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चर्चा होणार आहे. दरम्यान, पंतप्रधान आणि भाजपच्या संसदीय बोर्डाशी चर्चा केल्यानंतरच माहिती सार्वजनिक करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मुखेडचे आ.गोविन्द मामा राठोड यांचे निधन

govind rathodनांदेड: मुखेड विधानसभा मतदारसंघातील भाजपचे नवनिर्वाचित आमदार गोविंद राठोड यांचं काल रात्री ह्रदय विकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं. रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली.

राठोड पहिल्यांदाच मुखेड विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. मुंबईत आज होणाऱ्या भाजप आमदारांच्या बैठकीसाठी गोविंद राठोड मुंबईला येत होते. देवगिरी एक्स्प्रेसने नांदेडहून मुंबईकडे प्रवास करत असताना त्यांना ह्रदय विकाराचा तीव्र झटका आला. तीव्र झटका आल्यानंतर उपचारासाठी त्यांना जलन्यातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र त्या अगोदरच त्यांची प्राणजोत मालवली.

राठोड यांनी मागीलवेळी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांचा थोड्याच मतानं त्यांचा पराभव झाला. यावेळी पहिल्यांदाच त्यांनी भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवली. अतिशय संयमी नेतृत्व अशी त्यांची ओळख राहिली आहे.

श्रीनिवासन राजीनामा द्या:कोर्ट

नवी दिल्ली

आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणातील मुख्य आरोपी गुरुनाथ मय्यप्पन याचे सासरे आणि बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांना आज जोरदार झटका बसला आहे. याप्रकरणी निष्पक्ष चौकशी होण्यासाठी श्रीनिवासन यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यायला हवा, असे सुप्रीम कोर्टाने आज खडसावून सांगितले.

srinivasanस्पॉट फिक्सिंग प्रकरणी आज न्यायालयात सुनावणी झाली असता न्यायालयाने कठोर शब्दांत श्रीनिवासन यांची कानउघाडणी केली. ‘श्रीनिवासन त्यांच्या खुर्चीला एवढे का चिकटून आहेत? जर तुम्ही स्वत:हून खुर्ची सोडणार नसाल तर आम्हाला तसा आदेश द्यावा लागेल’, असे न्यायालयाने सुनावले. याप्रकरणी पुढील सुनावणी २७ मार्च रोजी होणार आहे.

‘क्रिकेटची ‘साफसफाई’ करण्याच्या बाता तुम्ही मारत आहात पण, चिखलाची सुरूवात तुमच्यापासूनच झालेली आहे. त्यामुळे श्रीनिवासन जोपर्यंत राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत तुमचं काहीही ऐकून घेतलं जाणार नाही,’ असेही सुप्रीम कोर्टाने बीसीसीआयला निक्षून सांगितले.

न्या. ए. के. पटनायक आणि न्या. फक्कीर मोहम्मद इब्राहीम कालीफुला यांच्या दोन सदस्यीय खंडपीठापुढे याप्रकरणाची सुनावणी झाली. आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणाचा सीलबंद चौकशी अहवाल मुकुल मुद्गल यांच्या समितीने न्यायालयात दिला असून त्या अहवालाच्या अनुशंगानेच न्यायालयाने श्रीनिवासन यांची खरडपट्टी काढली. समितीचा अहवाल फारच गंभीर आहे. त्यामुळे हा अहवा खुला करणे आम्हाला उचित वाटत नाही. मात्र, श्रीनिवासन यांनी पद न सोडल्यास आम्हाला आमचा निर्णय द्यावा लागेल, असेही न्यायालयाने सुनावले.

 

‘आयएम’चा दहशतवादी अटकेत

tahsinनवी दिल्ली – भारताच्या प्रमुख शहरांत झालेल्या दहशतवादी हल्ल्यांतील मुख्य आरोपी व इंडियन मुजाहिदीनचा म्होरक्या तहसीन अख्तर ऊर्फ मोनू याला अटक करण्यात आली आहे. पश्चिम बंगालच्या काकडविट्टा येथून दिल्ली पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. ‘बॉम्बमेकर’ वकास याच्या अटकेनंतर लगेचच अख्तर जाळ्यात अडकल्याने मुजाहिदीनचे कंबरडे मोडले आहे.

वकास याच्या अटकेनंतर सैरभैर झालेला मोनू पाकिस्तानात पळून जाण्याच्या तयारीत होता. त्याआधीच त्याला बेड्या ठोकण्यात आल्या. मोनू हा एनडीएनचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या पाटणा येथील सभेत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाचा सूत्रधार होता. यासीन भटकळ याच्या अटकेनंतर इंडियन मुजाहिदीनची सर्व सूत्रे तहसीनकडे आली होती. तोच या संघटनेचा म्होरक्या होता.